ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: खेड तालुक्यातील खाडीपट्ट्यातील वीज व रस्त्यांच्या प्रश्नांवर राजवेल येथे संयुक्त बैठक; १० दिवसांत उपाययोजना करण्याचे महावितरणचे आश्वासन
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » खेड तालुक्यातील खाडीपट्ट्यातील वीज व रस्त्यांच्या प्रश्नांवर राजवेल येथे संयुक्त बैठक; १० दिवसांत उपाययोजना करण्याचे महावितरणचे आश्वासन
खेड

खेड तालुक्यातील खाडीपट्ट्यातील वीज व रस्त्यांच्या प्रश्नांवर राजवेल येथे संयुक्त बैठक; १० दिवसांत उपाययोजना करण्याचे महावितरणचे आश्वासन

Gramin Varta
Last updated: October 24, 2026 9:37 am
Gramin Varta
15 Views
Share

खेड : तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील सातत्याने विस्कळीत होणारा वीजपुरवठा, ठिकठिकाणी उभे असलेले धोकादायक वीजखांब, नादुरुस्त ट्रान्स्फॉर्मर, वाढीव वीजबिलांचा भुर्दंड आणि रखडलेली रस्त्यांची कामे यांसारख्या गंभीर समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी बुधवारी (दि. २१ ऑक्टोबर) राजवेल येथे महावितरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत ग्रामस्थांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. राजवेल येथील मेहमूद दाऊद हमदुले यांच्या निवासस्थानी सायंकाळी पार पडलेल्या या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता स्वप्नील पाटील, शाखा अभियंता नीलेश माळी यांच्यासह महावितरणचे अभियंता वेळमकर व बडगुजर आणि खाडीपट्ट्यातील सुमारे १५० प्रमुख कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या चर्चेदरम्यान वीजखांब बदलणे, ट्रान्स्फॉर्मरची दुरुस्ती करणे आणि प्रलंबित रस्त्यांचे काम सुरू करण्याबाबत प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात आले.

खाडीपट्टा विभागाला वीजपुरवठा करणारी मुख्य लाईन पूर्वी समुद्रकिनाऱ्यालगतच्या शेतजमिनींमधून नेण्यात आली होती; मात्र ही वाहिनी रस्त्याच्या कडेने खांब रोवून नेण्याचे काम सुरू असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हरकतीमुळे ते रखडले होते. या बैठकीत दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांनी समन्वय साधत रस्त्यावर व गटारात अडथळा ठरणारे खांब बाजूला हटवून रस्त्यालगत सुरक्षित ठिकाणी उभारण्यावर एकमत केले आणि थांबलेले काम तातडीने पूर्ववत करण्याचे निश्चित झाले. दरम्यान, विभागातील पन्हाळजे, होडकाड, सवणस, आमशेत, तांबे मोहल्ला यांसह विविध गावांतील आणि विशेषतः होडखाड येथील दत्तवाडी परिसरातील नादुरुस्त व धोकादायक खांब तत्काळ बदलण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पुढील १० दिवसांत या समस्यांचे निवारण करण्याचे ठोस आश्वासन दिले. याशिवाय तांबे मोहल्ला येथील नादुरुस्त ट्रान्स्फॉर्मर बदलण्यासोबतच इतर गावांमधील ट्रान्स्फॉर्मरची कामे प्राधान्याने हाती घेण्यावर चर्चा झाली.

वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर संबंधित अभियंते व वायरमन नागरिकांना वेळेत प्रतिसाद देत नसल्याबद्दल बैठकीत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. प्रत्येक गावासाठी स्वतंत्र वायरमनची नियुक्ती करावी, तांत्रिक बिघाड त्वरित दुरुस्त करावेत आणि अधिकाऱ्यांनी पन्हाळजेपर्यंतच्या ग्राहकांशी सातत्याने थेट संपर्क ठेवावा, अशी आग्रही भूमिका ग्रामस्थांनी मांडली. शिर्शी येथील एका शेतकऱ्याला दीर्घकाळापासून वीज जोडणी न मिळाल्याने शेतातील झाडांना पाणी देणे अशक्य होऊन नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणले असता, साहित्य नसल्याचे कारण सांगत वेळकाढूपणा करणाऱ्या प्रशासनाविरोधात नाराजी उमटली; यावर आवश्यक साहित्य तातडीने उपलब्ध करून वीज सुरू करण्याची मागणी करण्यात आली. तसेच स्मार्ट मीटर बसविल्यापासून भरमसाठ वाढून येणाऱ्या वीजबिलांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, मीटर बिघाडाची तपासणी आणि अतिरिक्त बिलांची दुरुस्ती कोण करणार, असा जाब नागरिकांनी विचारला. यासोबतच सकाळी ६ वाजता अजूनही अंधार असल्याने विद्यार्थी व चाकरमान्यांची गैरसोय टाळण्यासाठी पथदिवे सकाळी साडेसहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली, ज्यावर अधिकाऱ्यांनी लेखी निवेदन सादर करण्याची सूचना केली.

बैठकीत खाडीपट्ट्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेवरूनही ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला धारेवर धरले. सुसेरी ते पन्हाळजे आणि चिंचघर ते बहिरवली या मार्गांवरील रखडलेल्या कामांबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली असता, चिंचघर ते बहिरवली या साडेचार किलोमीटर रस्त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रत्यक्ष कामाला १६ नोव्हेंबरपासून सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती उपअभियंता स्वप्नील पाटील यांनी दिली.

Total Visitors :

5469304
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्रासाठी बहुजन समाज पार्टीची नवी कार्यकारिणी घोषित

Gramin Varta
2 Min Read

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय महिला संघांची घोषणा; स्मृती मानधना सर्व फॉरमॅटमध्ये नेतृत्व करणार

Gramin Varta
3 Min Read

सीजेपीचे तरुणांना शांततापूर्ण आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन

Gramin Varta
2 Min Read

कळझोंडी पंचशील बुद्ध विहारात २० ऑक्टोबर रोजी ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात होणार साजरा;भव्य मिरवणुकीचे आयोजन

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

खेड

खेड: वेरळ येथे घरफोडीचे सत्र सुरूच; २४ तासांत चार बंगले फोडले, लाखोंचा ऐवज चोरीला

2 Min Read
खेड

खेड: पत्नीच्या निधनानंतर मानसिक तणावात असलेल्या प्रौढाचा खाडीत आढळला मृतदेह

1 Min Read
खेड

खेड : लोटे येथे भरधाव कारची महिलेला धडक; डोक्याला गंभीर दुखापत

2 Min Read
खेड

Best beaches in the UK for the Perfect Sandy Getaway

Sponsored by
Sponsored by

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?