ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Gramin Varta
Last updated: September 28, 2026 7:56 am
Gramin Varta
43 Views
Share

यादीत समावेश न झालेल्या तालुक्यांची तपासणी करणार

मुंबई: राज्यात अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

यामध्ये समावेश न झालेल्या तालुक्यांची तपासणी करून ट्रिगर तीन अंतर्गत मदत देण्यात येईल, दुष्काळी परिस्थितीमध्ये मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

राज्यातील दुष्काळी परिस्थिती व शासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.

पर्जन्यमानाची तूट व अन्य घटकांनी प्रभावित झालेल्या 265 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली असून, या तालुक्यांमध्ये 12 उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेत पिकाच्या नुकसानीची मदत विहित कार्यपद्धतीची पूर्तता करून दिली जाईल अशी ग्वाही देताना मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या तालुक्यांचा समावेश झाला नाही अशा सर्व तालुक्यांची तपासणी करून ट्रिगर तीन मध्ये समावेश करण्यात येईल.

दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्याचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसार पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात येईल. राज्यातील बहुतांश प्रकल्पात पिण्याचे पाणी उपलब्ध असून जुलै ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचे आरक्षण ठेवून अतिरिक्त उपलब्ध असलेले पाणी व पाण्याच्या उपलब्धतेनुसार रब्बीसाठी देता येईल का याचाही प्राधान्याने विचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अल निनोमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा अभ्यास करण्यात येऊन फेब्रुवारी अखेरपर्यंत उच्चांक पातळी गाठण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजना प्राधान्याने पूर्ण करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना जनतेनेही सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की अनावश्यक खर्च टाळून दुष्काळग्रस्त भागांमध्ये कशी मदत करता येईल, ती सर्वांनी करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे छत्तीसगडमध्ये आलेल्या अतिवृष्टीमुळे पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पूर परिस्थितीमध्ये प्रशासनातर्फे संपूर्ण मदत देण्यात येत असून मी प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात असल्याचे सांगताना पूर परिस्थिती निवळत असून जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, जागेवरुन उठताही येईना, डॉक्टरांचा गंभीर इशारा

Gramin Varta
1 Min Read

ग्राहक चळवळीत सहभागी होण्यासाठी ग्राहक पंचायत कार्यात सहभाग घ्यावा : सत्यवान कोत्रे

Gramin Varta
2 Min Read

खेडशी परिसरात ट्रॅव्हल्सची मोकाट वासराला धडक; नागरिक, पोलिस आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तत्परतेने मुक्या जीवाला जीवदान

Gramin Varta
2 Min Read

नाटे परिसरात भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये ३ ते १३ ऑक्टोबरदरम्यान मराठी साहित्य संमेलन- मराठी भाषा मंत्री उदय सामंत

3 Min Read
महाराष्ट्र

एसआयआर प्रक्रिया रद्द करून नव्याने करा; बॅलेट पेपरसाठी सर्व पक्षांनी आंदोलन उभारावे – राज ठाकरे

2 Min Read
महाराष्ट्र

एमपीएससीचा मोठा निर्णय; राज्यसेवा मुख्य परीक्षेसह तीन महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षा पुढे ढकलल्या

2 Min Read
महाराष्ट्र

मराठवाड्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार; कोकण आणि कृष्णाखोऱ्याचे पाणी आणणार, छत्रपती संभाजीनगरात मुख्यमंत्र्यांची ग्वाही

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?