ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: राजापूर : शिक्षणाच्या बदलत्या प्रवाहावर शिक्षकांना मार्गदर्शन; हरळ येथे केंद्रस्तरीय परिषद संपन्न
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » राजापूर : शिक्षणाच्या बदलत्या प्रवाहावर शिक्षकांना मार्गदर्शन; हरळ येथे केंद्रस्तरीय परिषद संपन्न
राजापूर

राजापूर : शिक्षणाच्या बदलत्या प्रवाहावर शिक्षकांना मार्गदर्शन; हरळ येथे केंद्रस्तरीय परिषद संपन्न

Gramin Varta
Last updated: September 30, 2026 3:37 pm
Gramin Varta
40 Views
Share

राजापूर (तुषार पाचलकर) : जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा हरळ येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्रमांक ४ बुधवारी (दि. ३० सप्टेंबर) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सकाळी ११.३० ते सायंकाळी ४.३० या वेळेत झालेल्या या परिषदेत केंद्रातील शिक्षकांनी विविध शैक्षणिक व प्रशासकीय विषयांवर सखोल चर्चा करून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

परिषदेत निपुण अभियानाचा शाळानिहाय आढावा, विविध शैक्षणिक पोर्टल, शिक्षणप्रवाहातील बदल, वर्गप्रक्रियेतील सकारात्मक व सुधारात्मक बाबी, शिष्यवृत्ती परीक्षा, अध्ययन निष्पत्तीवर आधारित मासिक नियोजन, शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना व पाठपुरावा तसेच डिजिटल शैक्षणिक साधनांचा प्रभावी वापर या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी उपलब्ध शैक्षणिक उपक्रमांचा व साधनांचा प्रभावी वापर कसा करता येईल, यावरही परिषदेत भर देण्यात आला.

परिषदेच्या पहिल्या सत्रात केंद्रसमन्वयक किशोर शिनगारे यांनी निपुण अभियानाचा शाळानिहाय आढावा तसेच विविध शैक्षणिक पोर्टल आणि शिक्षणप्रवाहातील बदल याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात वर्गप्रक्रियेतील सकारात्मक व सुधारात्मक बाबी तसेच शिष्यवृत्ती परीक्षेच्या अनुषंगाने सुधाकर जाधव (रायपाटण नं. ३), दिपाली धावडे (रायपाटण नं. १) आणि शारदा रेडेकर (रायपाटण नं. ५) यांनी मार्गदर्शन केले.

तिसऱ्या सत्रात अध्ययन निष्पत्तीवर आधारित मासिक नियोजन या विषयावर धामणपे येथील किशोर चव्हाण यांनी सर्व वर्गशिक्षक व विषयशिक्षकांना मार्गदर्शन केले. चौथ्या सत्रात शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना व पाठपुरावा याबाबत परुळे नं. ३ येथील मानसी सुर्वे यांनी माहिती दिली. शाळेच्या विकास प्रक्रियेत पालक व शिक्षकांचा सहभाग वाढविण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका यावेळी स्पष्ट करण्यात आली.

पाचव्या सत्रात ‘My Gooru App’ तसेच ‘Room to Read’ उपक्रमाची माहिती देण्यात आली. शरद वाशिंबे (परुळे नं. ३) आणि सुनील भांडेकर यांनी डिजिटल साधनांचा शैक्षणिक प्रक्रियेत प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांचे अध्ययन अधिक परिणामकारक करण्याबाबत मार्गदर्शन केले. याशिवाय प्रशासकीय कामकाज, मासिक कामाचे संकलन आणि अहवाल लेखन आदी बाबींवरही शिक्षकांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.

परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी अहवाल लेखनाची जबाबदारी अश्विनी माने, मासिक काम संकलनाची जबाबदारी परमेश्वर धुळे आणि आभार प्रदर्शनाची जबाबदारी रंगराव चौगुले यांनी पार पाडली. फोटो व व्हिडिओ शूटिंगचे काम शरद वाशिंबे व सुनील भांडेकर यांनी केले. या शिक्षण परिषदेमुळे शिक्षकांना अध्यापन पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्यासोबतच विविध शैक्षणिक उपक्रम, डिजिटल साधने आणि प्रशासकीय कामकाजाचा प्रभावी वापर करण्यासाठी उपयुक्त दिशा मिळाली. शिक्षकांनी परिषदेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध विषयांवरील चर्चेत सक्रिय सहभाग घेतला.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदल, २४ नेत्यांना नवीन जबाबदाऱ्या

Gramin Varta
2 Min Read

खेड आणि पूर्णगड येथून दोन २१ वर्षीय तरुणींचे गूढ अपहरण; गुन्हा दाखल

Gramin Varta
2 Min Read

परशुराम घाटातील सवतसडा धबधब्यानजीक भीषण अपघात; ट्रेलर पलटी होऊन राजस्थानच्या चालकाचा जागीच मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

संगमेश्वर : देवळे येथे गणेशोत्सवासाठी  गावी आलेल्या चाकरमान्यांची पाण्यासाठी वणवण

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

राजापूर

अनुस्कुरा घाटात ब्रेक फेल झाल्याने टेम्पो पलटी; २० प्रवाशांचा थोडक्यात बचाव

1 Min Read
राजापूर

Tech-Powered Future Updates on the Frontlines of Change

Sponsored by
राजापूर

जामदा प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग; प्रकल्पग्रस्तांना मोबदला वाटप सुरू

2 Min Read
राजापूर

राजापूर: जामदा धरण पुनर्वसनात १ हजार बोगस घरांचा संशय; SIT चौकशीची मनसेची मागणी

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?