ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: घाटीवळे आणि करंजारीत एकाच रात्री पाच घरे फोडली; चोरट्यांच्या सुळसुळाटामुळे परिसरात तीव्र घबराट
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » घाटीवळे आणि करंजारीत एकाच रात्री पाच घरे फोडली; चोरट्यांच्या सुळसुळाटामुळे परिसरात तीव्र घबराट
संगमेश्वर

घाटीवळे आणि करंजारीत एकाच रात्री पाच घरे फोडली; चोरट्यांच्या सुळसुळाटामुळे परिसरात तीव्र घबराट

Gramin Varta
Last updated: October 26, 2026 7:00 pm
Gramin Varta
1.7k Views
Share

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील देवरुख पोलीस ठाण्याच्या अखत्यारीतील घाटीवळे आणि करंजारी परिसरात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री धुमाकूळ घालत तब्बल पाच घरे फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांच्या या वाढत्या सुळसुळाटामुळे दोन्ही गावांत सध्या भीतीचे सावट पसरले आहे. घाटीवळे गावातील मुसलमान वाडी येथील अब्दुल रहमान फोडकर, इकबाल उमर फोडकर आणि अब्दुल मज्जिद शिरगावकर या तिघांच्या बंद घरांना लक्ष्य करून चोरट्यांनी कुलपे तोडत आतील ऐवज लंपास केला.

घाटीवळे येथे हातसफाई केल्यानंतर चोरट्यांनी तेथून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गालगत वसलेल्या करंजारी गावावर मोर्चा वळवला. महामार्गाला लागूनच असलेल्या चंद्रकांत शिवराम भुर्के यांच्या बंद घरावर तसेच बाबा वळंजु यांच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारला. बाबा वळंजु हे काही कामानिमित्त बाहेर गेले असताना ही संधी साधून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. या दोन्ही ठिकाणांहून सुमारे बावन्न हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे.

विशेष म्हणजे बाबा वळंजु यांच्या घराचे कुलूप तोडून चोरी केल्यानंतर, चोरट्यांनी पुरावा नष्ट करण्याच्या आणि कोणाला संशय येऊ नये या हेतूने त्याच कडी-कोंड्याला स्वतःचे दुसरे कुलूप ठोकून तेथून पोबारा केला. महामार्गालगतच्या घरांवरही अशा प्रकारे धाडसी चोऱ्या झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे. या संपूर्ण घटनेची रीतसर माहिती साखरपा पोलिसांना देण्यात आली असून, या प्रकारामुळे घाटीवळे आणि करंजारी परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे. पोलिसांनी या भागात तातडीने गस्त वाढवून संशयित चोरट्यांचा छडा लावावा, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.

Total Visitors :

5468475
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

‘दिशा सालियनला कधीही भेटलो नाही, खोट्या प्रचाराने झुकणार नाही’; सीबीआयच्या एफआयरनंतर आदित्य ठाकरेंचे विरोधकांना सडेतोड उत्तर

Gramin Varta
3 Min Read

सहा महिन्यांत साडेतीन कोटींचे उत्पन्न देणारे संगमेश्वर रोड रेल्वे स्थानक चार एक्स्प्रेसच्या थांब्यांसाठी प्रतीक्षेत; रेल्वे बोर्डाच्या मंजुरीकडे प्रवाशांचे लक्ष

Gramin Varta
2 Min Read

आरोग्य शिबिरांसह वृक्षारोपणाने उद्यापासून रत्नागिरीत ‘सेवा संकल्प अभियाना’ला सुरुवात

Gramin Varta
3 Min Read

रत्नागिरी: वाढत्या डिजेलच्या दरामुळे मत्स्य व्यवसाय संकटात

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर : पांचाबे येथे आढळला कुजलेला नर बिबट्याचा मृतदेह आढळला

2 Min Read
संगमेश्वर

रोमहर्षक सामन्यात मातब्बर रत्नागिरीला नमवून दादासाहेब सरफरे विद्यालयाचा ऐतिहासिक विजय; १७ वर्षांखालील जिल्हास्तरीय कबड्डीत पटकावले विजेतेपद

2 Min Read
संगमेश्वर

दाभोळेत भक्तिमय वातावरणात गणरायाला भावपूर्ण निरोप

1 Min Read
संगमेश्वर

देवरुख: इन्स्टाग्रामवरून आलेली संशयास्पद एपीके फाईल डाऊनलोड करणे पडले महागात; तरुणाची ५५ हजारांची ऑनलाईन फसवणूक

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?