ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: संगमेश्वर : पांचाबे येथे आढळला कुजलेला नर बिबट्याचा मृतदेह आढळला
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » संगमेश्वर : पांचाबे येथे आढळला कुजलेला नर बिबट्याचा मृतदेह आढळला
संगमेश्वर

संगमेश्वर : पांचाबे येथे आढळला कुजलेला नर बिबट्याचा मृतदेह आढळला

Gramin Varta
Last updated: September 29, 2026 6:57 pm
Gramin Varta
1 View
Share

संगमेश्वर : तालुक्यातील मौजे पांचाबे गायकवाडवाडी येथे रस्त्याच्या बाजूला एका नर बिबट्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सोमवारी (दि. २८ सप्टेंबर) ही घटना उघडकीस आली. कुंचाबे येथील स्थानिक नागरिक अविनाश भिकाजी टाकळे यांनी रस्त्यालगत मृतदेह पाहताच तात्काळ संगमेश्वर वन विभागाला दूरध्वनीवरून याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

प्राथमिक पाहणीनुसार या नर बिबट्याचा मृत्यू साधारण ९ ते १० दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रदीर्घ कालावधीमुळे मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत होता. यानंतर कडवई येथील पशुधन विकास अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेहाची वैद्यकीय तपासणी केली. हा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला असावा, असा प्राथमिक निष्कर्ष त्यांनी नोंदवला. वैद्यकीय सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर शासकीय नियमावलीनुसार घटनास्थळीच लाकडाची चिता रचून बिबट्याच्या अवयवांवर अग्निसंस्कार करण्यात आले आणि सर्व अवशेष पूर्णपणे नष्ट करण्यात आले.

सदर कारवाई चिपळूण-रत्नागिरीच्या विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड आणि रत्नागिरीचे परिक्षेत्र वनाधिकारी विक्रम गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली. या मोहिमेत संगमेश्वर-देवरुखचे वनपाल सागर गोसावी, आरवलीचे वनरक्षक सूरज तेली, साखरपाचे वनरक्षक सहयोग कराडे, फुणगुसचे वनरक्षक आकाश कडूकर, कुटगिरीच्या पोलिस पाटील तसेच प्राणीमित्र प्रणित टाकळे आणि शंकर जागुष्टे सहभागी झाले होते.

दरम्यान, ग्रामीण भागात कोणताही वन्यजीव संकटात अथवा मृतावस्थेत आढळल्यास नागरिकांनी त्वरित वन विभागाच्या ‘१९२६’ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संगमेश्वर-देवरुखचे वनपाल सागर गोसावी यांनी केले आहे.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दहावी-बारावीच्या परीक्षांचे बिगुल वाजले; राज्य मंडळाकडून संभाव्य तारखांचा कालावधी जाहीर

Gramin Varta
1 Min Read

काजिर्डातील जामदा प्रकल्पाच्या भूसंपादनाला वेग; बुडीत क्षेत्रातील ७५ हेक्टर जमिनीची संयुक्त मोजणी पूर्ण, शेतकऱ्यांना लवकरच मोबदला

Gramin Varta
2 Min Read

ज्योतिषशास्त्राच्या आचार्य परीक्षेत चैत्राली मुळ्ये-जोशी महाराष्ट्रात प्रथम

Gramin Varta
2 Min Read

देशातील पहिल्या ‘स्पेस पार्क’साठी माचाळ,माथेरानची पाहणी; १८ महिन्यांत ५ उपग्रह सोडण्याचा राज्याचा मानस : उद्योगमंत्री उदय सामंत

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

दाभोळेत भक्तिमय वातावरणात गणरायाला भावपूर्ण निरोप

1 Min Read
संगमेश्वर

कोकणातील उद्योग-रोजगाराच्या प्रश्नांवर विचार मांडण्याची संधी

3 Min Read
संगमेश्वर

१५२ वर्षांची अखंड परंपरा! २५ घरांचा एकच बाप्पा

3 Min Read
संगमेश्वर

चार महिन्याच्या चिमुकलीला उघड्यावर सोडून स्वप्नील गेला; बापाच्या मायेसाठी लेकीची नजर भिरभिरतेय…

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?