ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: चार महिन्याच्या चिमुकलीला उघड्यावर सोडून स्वप्नील गेला; बापाच्या मायेसाठी लेकीची नजर भिरभिरतेय…
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » चार महिन्याच्या चिमुकलीला उघड्यावर सोडून स्वप्नील गेला; बापाच्या मायेसाठी लेकीची नजर भिरभिरतेय…
संगमेश्वर

चार महिन्याच्या चिमुकलीला उघड्यावर सोडून स्वप्नील गेला; बापाच्या मायेसाठी लेकीची नजर भिरभिरतेय…

Gramin Varta
Last updated: September 14, 2026 7:11 pm
Gramin Varta
75 Views
Share

संगमेश्वर सायले येथे गणपती डेकोरेशन दरम्यान स्वप्निल कानालाचा मृत्यू, 4 महिन्यापूर्वीच आईचा मृत्यू

देवरुख : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर आलेला गणेशोत्सव… घराघरांत आनंदाचे वातावरण… बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू असतानाच संगमेश्वर तालुक्यातील सायले गावावर काळाने असा घाला घातला. एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा आधारच हिरावला. गणपतीच्या डेकोरेशनची आणि साफसफाईची कामे करत असताना विजेचा जबर धक्का बसून स्वप्निल श्रीकांत कानाल (२५) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या चार महिन्यांची चिमुकली मुलगी आणि दुसरी चार वर्षांची मुलगी मागे ठेवून स्वप्निल निघून गेल्याने संपूर्ण गाव सुन्न झाले आहे.

केवळ चार महिन्याच्या चिमुकलीच्या डोक्यावरच वडिलांच्या मायेचं छप्पर हरपलेय, बापाच्या मायेसाठी अजून शब्दही न उमटवू शकणाऱ्या या चिमुकलीकडे पाहताना गावकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत.  गणेशोत्सवाच्या आनंदावर दुःखाची काळी छाया पसरली.

विशेष म्हणजे, अवघ्या चार महिन्यांपूर्वीच स्वप्निल यांच्या आईचे निधन झाले होते. आईच्या निधनाचे दुःख ताजे असतानाच आता तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने कानाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लागोपाठ आलेल्या या दोन आघातांनी कुटुंब अक्षरशः हादरून गेले आहे.

स्वप्निल रोजगाराच्या निमित्ताने मुंबई येथे वास्तव्यास होता. महाराष्ट्राच्या लाडक्या गणेशोत्सवाचा आनंद आपल्या कुटुंबासोबत आणि गावातील मित्रांसोबत साजरा करण्यासाठी तो अत्यंत उत्साहाने शनिवारीच आपल्या मूळ गावी सायले येथे आला होता. मात्र, गावात येऊन अवघे काही तास उलटत नाहीत तोच नियतीने त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर घाला घातला.

रविवारी सकाळी घरात बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू होती. मखर सजवणे, विद्युत रोषणाईची व्यवस्था करणे आणि घराची साफसफाई करण्याची लगबग सुरू होती. याच कामात स्वप्निलही सहभागी झाला होता. घराची साफसफाई करत असताना अनावधानाने त्याला विजेचा जबर धक्का बसला. विजेचा झटका इतका तीव्र होता की, स्वप्निल जागीच जमिनीवर कोसळला आणि गंभीर अवस्थेत बेशुद्ध झाला.

हा प्रकार लक्षात येताच घरातील सदस्य आणि शेजाऱ्यांनी तातडीने धावपळ सुरू केली. स्वप्निलला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, विजेचा धक्का इतका प्राणघातक ठरला की, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.

स्वप्निलच्या मृत्यूची बातमी गावात पसरताच प्रत्येक घरात हळहळ व्यक्त झाली. काही वेळापूर्वी बाप्पाच्या स्वागतासाठी सजलेले घर क्षणार्धात शोकाकुल झाले. चार महिन्यांच्या चिमुकलीला वडिलांचा चेहरा पुन्हा कधीच दिसणार नाही, तर चार वर्षांच्या मुलीच्या डोक्यावरचा पित्याचा हात कायमचा निघून गेला आहे. या विचारानेच सायले गावातील प्रत्येकाचे मन हेलावून गेले आहे. आनंदासाठी आलेला गणेशोत्सव एका कुटुंबासाठी मात्र आयुष्यभराची वेदना देऊन गेला.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

नाटे परिसरात भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

Gramin Varta
1 Min Read

मुंबई पोलिसांनी मनोज जरांगेंचा दुसरा अर्जही फेटाळला

Gramin Varta
3 Min Read

जमीन संपादन व मोबदला वाटपात गैरव्यवहार; एसआयटी चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रक्रिया थांबवा : मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी रेल्वेस्थानकावर एटीव्हीएम यंत्र दाखल; प्रवाशांची तिकीट खिडकीवरील लांबलचक रांगांमधून कायमची सुटका

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

Unraveling the Complexities of the Human Mind and Behavior

7 Min Read
संगमेश्वर

AI Unleashed Exploring the Future of Machine Learning and Robotics

7 Min Read
संगमेश्वर

Navigating the Cosmos to Uncover the Mysteries of the Universe

7 Min Read
संगमेश्वर

साखरपा बसस्थानकात एसटीच्या चाकाखाली तरुण सापडला; पायावरून चाक गेले

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?