ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: लांजा: लिफ्ट देण्याच्या बहाण्याने ६० वर्षीय महिलेचे ९० हजारांचे मंगळसूत्र लुटले
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Sunday, Oct 4, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » लांजा: लिफ्ट देण्याच्या बहाण्याने ६० वर्षीय महिलेचे ९० हजारांचे मंगळसूत्र लुटले
लांजा

लांजा: लिफ्ट देण्याच्या बहाण्याने ६० वर्षीय महिलेचे ९० हजारांचे मंगळसूत्र लुटले

Gramin Varta
Last updated: September 30, 2026 8:45 am
Gramin Varta
1.5k Views
Share

लांजा : तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथे लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका ६० वर्षीय महिलेला दुचाकीवर बसवून नंतर ‘फोटो काढतो’ असे सांगत तिच्या गळ्यातील सुमारे ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून अज्ञात भामट्याने पोबारा केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे वेरवली परिसरात खळबळ उडाली असून, लांजा पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

वेरवली खुर्द डोळेवाडी येथील रहिवासी सरिता दिनकर बाणे (वय ६०) या मंगळवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास वेरवली बुद्रुक येथील दिलीप मुळे यांच्या घरी नेहमीप्रमाणे घरकामासाठी पायी जात होत्या. त्या वेरवली खुर्द शाळा क्रमांक १ च्या पुढील वळणाजवळ पोहोचल्या असता पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या एका अनोळखी इसमाने त्यांना आवाज देत, “आजी कुठे चालला आहात, तुम्हाला पुढे सोडतो,” असे सांगितले. अनोळखी व्यक्तीने आपल्याला लिफ्ट देण्याच्या उद्देशाने मदत केली असल्याचे समजून बाणे या त्याच्या दुचाकीवर बसल्या.

संबंधित इसमाने त्यांना मुळे यांच्या घराच्या गेटपासून सुमारे १०० मीटर अंतरावर उतरवले. त्यानंतर बाणे या पायी चालत मुळे यांच्या घराच्या गेटजवळ पोहोचून आत जात असतानाच तो इसम पुन्हा मोटारसायकलवरून त्यांच्या मागोमाग तेथे आला. त्याने “आजी थांबा, तुमचा फोटो काढतो,” असे सांगून मोबाईलचा कॅमेरा त्यांच्या चेहऱ्याजवळ नेला. महिला काही समजून घेण्याच्या आतच त्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे १५ ग्रॅम वजनाचे, दोन पदरी सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने खेचून तोडले. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता त्याने मोटारसायकलवरून भरधाव वेगाने घटनास्थळावरून पलायन केले.

या घटनेत सुमारे ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीस गेले आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या बाणे यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यांच्या फिर्यादीवरून लांजा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरातील उपलब्ध माहितीच्या आधारे अज्ञात आरोपीचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू असून, पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय मारळकर करीत आहेत.

Total Visitors :

5435557
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरीत २७ सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिन उत्साहात साजरा होणार

Gramin Varta
2 Min Read

राज्यातील शाळांमध्ये २८ हजारांहून अधिक शिक्षकेतर पदे भरण्यास मंजुरी; नवीन नियम जाहीर

Gramin Varta
2 Min Read

चिपळूण: पोट फुगून अचानक प्रकृती बिघडली; चिमुकलीचा रुग्णालयात मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

‘स्कील इज फ्युचर’; तंत्रज्ञानाच्या युगात युवकांनी कौशल्ये सातत्याने अपग्रेड करावीत: जिल्हाधिकारी मनुज जिंदल

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

लांजा

लांजा : दारूच्या नशेत विहिरीत पडून प्रौढाचा मृत्यू

3 Min Read
लांजा

पत्रकार प्रविण कांबळे लिखित-दिग्दर्शित ‘नाडा’ एकांकिकेने मुंबईकरांची मने जिंकली

2 Min Read
लांजा

लांज्यात एन.एम.एम.एस. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात;५५० विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन; मोफत प्रश्नसंचाचे वाटप

3 Min Read
लांजा

लांजातील उद्योजक शिवाजी कोत्रे यांच्याकडून घरातच पर्यावरणपुरक पध्दतीने श्रींचे भावपूर्ण विसर्जन

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?