ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: आरवलीत दुचाकीला भरधाव कारची जोरदार धडक; चालक फरार, कार सीसीटीव्हीत कैद
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » आरवलीत दुचाकीला भरधाव कारची जोरदार धडक; चालक फरार, कार सीसीटीव्हीत कैद
संगमेश्वर

आरवलीत दुचाकीला भरधाव कारची जोरदार धडक; चालक फरार, कार सीसीटीव्हीत कैद

Gramin Varta
Last updated: September 19, 2026 10:49 am
Gramin Varta
29 Views
Share

आरवली (प्रतिनिधी) : कोंडिवरे ते आरवली असा दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या जमीर युसूफ डिंगणकर (रा. कोंडिवरे, ता. संगमेश्वर) यांना आरवली येथे भरधाव कारने जोरदार धडक दिल्याची घटना घडली. अपघातानंतर कार न थांबवता चालकाने घटनास्थळावरून वाहनासह पलायन केले. या अपघातात डिंगणकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मिरज येथे उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जमीर डिंगणकर हे दुचाकीवरून कोंडिवरेहून आरवलीच्या दिशेने जात असताना भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, डिंगणकर रस्त्यावर फेकले गेले. अपघातानंतर कार चालकाने जखमी व्यक्तीला मदत करण्यासाठी थांबण्याऐवजी वाहन वेगाने पळवून नेले.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमी डिंगणकर यांना मदत केली. तसेच माखजन पोलीस दूरक्षेत्राला घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. फरार कारचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरात नाकाबंदी सुरू केली.

दरम्यान, अपघात करणारी कार एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असल्याने पोलिसांच्या तपासाला महत्त्वाचा धागा मिळाला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून फरार वाहनाचा शोध सुरू असून चालकाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या जमीर डिंगणकर यांना उपचारासाठी प्रथम डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना मिरज येथे हलविण्यात आले आहे. अपघातानंतर चालकाने घटनास्थळी न थांबता पलायन केल्याने परिसरात संताप व्यक्त होत असून फरार चालकाचा तातडीने शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Total Visitors :

5427497
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

देवदर्शनानंतर मुंबईला परतणाऱ्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात;चौघांचा जागीच मृत्यू, सात जखमी

Gramin Varta
2 Min Read

दोन महिन्यांची मेहनत; संगमेश्वरात खातू बंधूंनी साकारली ‘जुनी मुंबई ते नवी मुंबई’!

Gramin Varta
2 Min Read

आरवलीत दुचाकीला भरधाव कारची जोरदार धडक; चालक फरार, कार सीसीटीव्हीत कैद

Gramin Varta
2 Min Read

पोलिसांच्या सीसीटीव्ही खांबात वीजप्रवाह उतरल्याने २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू; संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

संगमेश्वर : देवळे येथे गणेशोत्सवासाठी  गावी आलेल्या चाकरमान्यांची पाण्यासाठी वणवण

2 Min Read
संगमेश्वर

गणेशोत्सवात साहिल आंबवकरने साकारला शिमगा आणि गणेशोत्सवाचा अनोखा देखावा

2 Min Read
संगमेश्वर

Inside Amazon’s Bold Vision for the Future of Shipping

7 Min Read
संगमेश्वर

देवरुख : पालकर फाऊंडेशनमधील ५० हजार २०० रुपयांची रोकड लंपास

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?