ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: आंबेड बुद्रुक येथे महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी मोफत शिबिर संपन्न; अंतरा फाउंडेशन आणि कृषी विभागाचा संयुक्त उपक्रम
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » आंबेड बुद्रुक येथे महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी मोफत शिबिर संपन्न; अंतरा फाउंडेशन आणि कृषी विभागाचा संयुक्त उपक्रम
संगमेश्वर

आंबेड बुद्रुक येथे महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी मोफत शिबिर संपन्न; अंतरा फाउंडेशन आणि कृषी विभागाचा संयुक्त उपक्रम

Gramin Varta
Last updated: October 10, 2026 8:29 am
Gramin Varta
91 Views
Share

संगमेश्वर (दिनेश आंब्रे) : महाराष्ट्र महिला शेतकरी सबलीकरण अधिनियम २०२६ च्या पार्श्वभूमीवर महिलांना शेतकरी म्हणून हक्काची ओळख मिळवून देण्यासाठी आणि त्यांना शासकीय योजनांचे लाभ सहजतेने उपलब्ध व्हावेत या हेतूने आंबेड बुद्रुक येथे विशेष मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अंतरा फाउंडेशन, रत्नागिरी आणि कृषी विभाग, देवरुख यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या उपक्रमाचा परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. महिलांचे आर्थिक व सामाजिक सबलीकरण घडवून आणणे हा या मोहिमेचा मूळ उद्देश असून, या प्रमाणपत्राच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील महिलांना नवसंजीवनी मिळणार असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

या शिबिरात कृषी विभाग देवरुखचे मंडळ अधिकारी प्रभाकर कांबळे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करताना घ्यावयाची खबरदारी, आवश्यक कागदपत्रे तसेच अर्ज मंजूर झाल्यानंतर शासनाकडून प्राप्त होणाऱ्या विविध सेवा व लाभांविषयी सविस्तर तांत्रिक माहिती दिली. अंतरा फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. नुपुरा मुळ्ये यांनी महिला शेतकऱ्यांच्या हक्कांवर प्रकाश टाकत कृषीपूरक उद्योग व व्यवसाय करणाऱ्या कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकतात, याविषयी सखोल मार्गदर्शन केले.

शिबिर यशस्वी करण्यासाठी अंतरा फाउंडेशनच्या उपाध्यक्षा सौ. सरिता आंबेकर, सौ. अपर्णा शिगवण आणि सौ. मधुरा मुळ्ये यांनी मोलाचे सहकार्य केले. याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रभाकर गुरव, प्रकाश गुरव, संजय शिगवण, सलाउद्दीन बोट यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ व लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांना कृषी क्षेत्रात स्वतंत्र स्थान व अधिकार मिळवून देणारा हा उपक्रम ग्रामीण भागातील महिलांसाठी दिशादर्शक ठरला आहे.

Total Visitors :

5469359
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

समुद्रात मध्यरात्री थरार: ‘ऑपरेशन निशाचर’ अंतर्गत रत्नागिरी मत्स्यव्यवसाय विभागाचा दणका; रायगडची अवैध एलईडी नौका अंजर्ले समुद्रात जेरबंद

Gramin Varta
2 Min Read

शालेय पोषण आहार स्वयंपाकी आणि मदतनिसांच्या वाढीव मानधनासाठी ७४ कोटींचा निधी वितरित

Gramin Varta
2 Min Read

गणेशोत्सवानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास होणार सुकर; गृहराज्यमंत्र्यांच्या पुढाकारातून ‘खेड-दिवा’ मेमू स्पेशल धावणार मोफत

Gramin Varta
2 Min Read

कडवईचे माजी सरपंच वसंत उजगावकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

देवरुख पोलीस ठाण्याच्या राजाला भक्तिमय वातावरणात भावपूर्ण निरोप

1 Min Read
संगमेश्वर

संगमेश्वर : मुलगा व पत्नीच्या निधनाच्या मानसिक तणावातून लोवले फटकरेवाडी येथे वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

2 Min Read
संगमेश्वर

सोनवी नदीत अनधिकृत खोदाई आणि वांद्रीत बेकायदा उत्खनन; महामार्गाच्या ठेकेदार कंपनीचा तब्बल १८ कोटींचा दंड थकीत

2 Min Read
संगमेश्वर

संगमेश्वर : नायरी येथे सुनेच्या मारहाणीत जखमी झालेल्या ९१ वर्षांच्या आजींची अखेर मृत्यूशी झुंज संपली

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?