ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: सोनवी नदीत अनधिकृत खोदाई आणि वांद्रीत बेकायदा उत्खनन; महामार्गाच्या ठेकेदार कंपनीचा तब्बल १८ कोटींचा दंड थकीत
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » सोनवी नदीत अनधिकृत खोदाई आणि वांद्रीत बेकायदा उत्खनन; महामार्गाच्या ठेकेदार कंपनीचा तब्बल १८ कोटींचा दंड थकीत
संगमेश्वर

सोनवी नदीत अनधिकृत खोदाई आणि वांद्रीत बेकायदा उत्खनन; महामार्गाच्या ठेकेदार कंपनीचा तब्बल १८ कोटींचा दंड थकीत

Gramin Varta
Last updated: September 24, 2026 8:19 am
Gramin Varta
61 Views
Share
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 39;

संगमेश्वर (विशेष प्रतिनिधी): मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आरवली ते तळेकांटे या टप्प्याचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर शासकीय महसूल बुडवून पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. संगमेश्वर तालुक्यातील माभळे येथील गणेश विसर्जन घाटासमोरील सोनवी नदीपात्रात जलसंपदा विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेताच कंपनीने तब्बल पाच हजार घनमीटर गाळाचा बेकायदेशीर उपसा केला. प्रतिघनमीटर २१६ रुपये शासकीय रॉयल्टी भरणे कायदेशीररीत्या बंधनकारक असताना महामार्गाच्या कामाचे कारण पुढे करत कंपनीने शासनाचा एक रुपयाचाही महसूल जमा केलेला नाही. अनधिकृत खोदाईमुळे एका व्यक्तीचा बळी गेल्यानंतर आता या संपूर्ण गैरप्रकाराबाबतच्या प्रशासकीय कारवाईला वेग आला आहे.

दुसऱ्या बाजूला, महामार्गाच्या कामाला खडीचा पुरवठा करण्यासाठी या ठेकेदार कंपनीने वांद्री येथे क्रशर प्रकल्प उभारला होता. तेथेही नियमांचे उघड उल्लंघन करत तब्बल ५९ हजार ९१० ब्रासचे बेकायदेशीर दगड उत्खनन करण्यात आले. या मोठ्या प्रमाणावरील चोरीच्या उत्खननाची दखल घेत जिल्हा खनिकर्म विभागाने फेब्रुवारी २०२६ मध्ये संबंधित कंपनीला तीन कोटी ५९ लाख ४३ हजार रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली होती. मात्र, प्रशासनाच्या या दंडात्मक नोटिसीला कंपनीने केराची टोपली दाखवत रक्कम भरण्यास टाळाटाळ केली.

शासनाच्या ३ मे २०२१ रोजीच्या अधिकृत अध्यादेशानुसार, दंडाची रक्कम एका महिन्याच्या विहित मुदतीत न भरल्यास ती मूळ रकमेच्या पाच पटीने वाढवण्याची स्पष्ट कायदेशीर तरतूद आहे. या नियमानुसार संबंधित ठेकेदार कंपनीवरील थकीत दंडाचा आकडा आता थेट १७ कोटी ९७ लाख ३० हजार रुपये म्हणजेच तब्बल १८ कोटींच्या घरात पोहोचला आहे. संबंधित दोन्ही शासकीय विभागांनी या प्रचंड दंडाच्या रकमेला दुजोरा दिला आहे. इतकी प्रचंड रक्कम थकीत असताना आणि कंपनी प्रशासकीय यंत्रणेला उघडपणे न जुमानता काम करत असतानाही संबंधित अधिकारीवर्गाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, या थकीत दंडावर पुढील कठोर कारवाई करण्यासाठीचा सविस्तर प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात आला असून कारवाईची पुढील दिशा काय असेल याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

हिऱ्यात साक्षात विघ्नहर्त्याचे रूप; सुरतमधील ६१८.२७ कॅरेटचा अद्भूत रफ डायमंड दर्शनासाठी खुला, मूल्य कोट्यवधींच्या घरात

Gramin Varta
2 Min Read

मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा टोलवसुलीविरोधात जनआक्रोश समितीची उच्च न्यायालयात धाव; जनहित याचिका करणार दाखल 

Gramin Varta
2 Min Read

दापोलीत मुलाचा आई-वडिलांवर जीवघेणा हल्ला; कुऱ्हाड व काचेच्या बाटलीने मारहाण

Gramin Varta
2 Min Read

सिंधुदुर्गात पहिल्या स्थलांतरित पाहुण्याचे आगमन; चौकुळच्या निसर्गरम्य पट्ट्यात देखण्या ‘युरोपियन रोलर’चे दर्शन

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

संगमेश्वर : देवळे येथे गणेशोत्सवासाठी  गावी आलेल्या चाकरमान्यांची पाण्यासाठी वणवण

2 Min Read
संगमेश्वर

देवरुख : रानगव्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या स्वप्नील पेडामकरच्या कुटुंबाला वनविभागाची १० लाखांची मदत

2 Min Read
संगमेश्वर

संघर्षातून नेतृत्वाचा झंझावात उभा करणारे बापू शेट्ये; सामाजिक बांधिलकी, राजकीय प्रवास आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाचा प्रेरणादायी प्रवास

4 Min Read
संगमेश्वर

आरवलीत दुचाकीला भरधाव कारची जोरदार धडक; चालक फरार, कार सीसीटीव्हीत कैद

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?