ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: दापोलीत मुलाचा आई-वडिलांवर जीवघेणा हल्ला; कुऱ्हाड व काचेच्या बाटलीने मारहाण
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » दापोलीत मुलाचा आई-वडिलांवर जीवघेणा हल्ला; कुऱ्हाड व काचेच्या बाटलीने मारहाण
दापोली

दापोलीत मुलाचा आई-वडिलांवर जीवघेणा हल्ला; कुऱ्हाड व काचेच्या बाटलीने मारहाण

Gramin Varta
Last updated: September 23, 2026 8:41 pm
Gramin Varta
515 Views
Share

जालगाव पांगारवाडीतील धक्कादायक घटना; संशयित मुलाला पोलिसांनी घेतले ताब्यात

दापोली : तालुक्यातील जालगाव पांगारवाडी येथे मुलानेच आपल्या आई-वडिलांवर कुऱ्हाड आणि काचेच्या बाटलीच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवार, २३ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात मधुकर आग्रे आणि अनिता आग्रे हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुनील आग्रे (वय ४०) याने आपल्या वडील मधुकर आग्रे यांच्या डोक्यावर व हातावर कुऱ्हाडीने हल्ला केला. तसेच आई अनिता आग्रे यांच्या डोक्यावर काचेच्या बाटलीच्या सहाय्याने मारहाण केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार मधुकर आग्रे यांच्या राहत्या घरातच घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

हल्ल्यात मधुकर आग्रे आणि अनिता आग्रे यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी दुखापत झाली आहे. घटनेनंतर दोन्ही जखमींना तातडीने उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून, दुखापतीचे गांभीर्य लक्षात घेता पुढील उपचारांसाठी त्यांना रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

भरदिवसा राहत्या घरातच आई-वडिलांवर हल्ला झाल्याची माहिती परिसरात पसरताच जालगाव पांगारवाडी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची दखल घेतली. पोलिसांनी सुनील आग्रे याला ताब्यात घेतले असून घटनेचा तपास सुरू केला आहे.

दरम्यान, या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला की अन्य कोणत्या कारणामुळे हल्ला करण्यात आला, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. घटनास्थळाचा पंचनामा तसेच अन्य आवश्यक तपासाची प्रक्रिया सुरू असून, पोलिसांच्या तपासानंतर या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

शेतकरी मदत केंद्र सुरू करून दुष्काळसदृश परिस्थितीची तातडीने पाहणी करा; शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांचे आवाहन

Gramin Varta
1 Min Read

World Independently and Embracing the Freedom of Solo Travel

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

‘दिशा सालियनला कधीही भेटलो नाही, खोट्या प्रचाराने झुकणार नाही’; सीबीआयच्या एफआयरनंतर आदित्य ठाकरेंचे विरोधकांना सडेतोड उत्तर

Gramin Varta
3 Min Read

चिपळूण: तिवरे-फणसवाडीत जमिनीवरील अनधिकृत घराच्या वादातून राडा; वृद्धेला दमदाटी करणाऱ्या तिघांविरुद्ध चिपळूण पोलिसांत गुन्हा

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

दापोली

दापोलीतील एक दिवसाच्या नवजात बालकाचा डेरवण येथे उपचारादरम्यान मृत्यू

1 Min Read

Hello world!

0 Min Read
दापोली

दापोलीतील बीएसएनएल कार्यालय फोडून ७ हजारांची डीसी केबलची चोरी

1 Min Read
दापोली

हर्णे समुद्रकिनारी मृतावस्थेत आढळले खवले मांजर

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?