राजापूर / तुषार पाचलकर: राजापूर तालुक्यात भारतीय जनता पक्षाकडून संघटनात्मक बांधणीवर विशेष भर दिला जात असून गावागावांत पक्ष विस्तार करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात सुरू असलेल्या या मोहिमेला मोठे यश मिळत असून कोंडसर खुर्द येथील शेडेकरवाडीतील प्रमुख ग्रामस्थांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. जिल्हा सरचिटणीस तथा उपसभापती अभिजित गुरव यांच्या नेतृत्वावर आणि केंद्र व राज्य शासनाच्या विकासकामांवर विश्वास व्यक्त करत हा पक्षप्रवेश पार पडल्याने कोंडसर खुर्द परिसरात भाजपची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे.
स्थानिक पातळीवरील प्रलंबित विकासकामांचा पाठपुरावा आणि भक्कम स्थानिक नेतृत्वाची गरज या मुद्द्यांना प्राधान्य देत शेडेकरवाडी परिसरातील नागरिकांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. या पक्षप्रवेशामध्ये आकांक्षा हेमंत शेडेकर, हेमंत गणपत शेडेकर, प्रकाश गोविंद शेडेकर, कोमल प्रकाश शेडेकर, सावित्री गोविंद शेडेकर, समीर सूर्यकांत शेडेकर, शंकर कृष्णा तळये, महेश कृष्णा तळये, साईनाथ राजाराम वारीक, प्रवीण पांडुरंग शेडकर, महेश महादेव दळवे, केशव विष्णू पड्यार, मनोज मधुकर शेडेकर, स्वप्नील भिकाजी शेडेकर, सदानंद तुकाराम शेडेकर, संतोष बाळू शेडेकर, शांताराम सदू शेडेकर, किरण पांडुरंग कोबळी, अनंत गोवाळ शेडेकर, अनंत बाळू शेडेकर, संजना संतोष शेडेकर, सुशिला शिवा शेडेकर, वैशाली विलास शेडेकर, राजाराम गोविंद पड्यार, मनिषा मधुकर शेडेकर, कार्तिकी केशव पड्यार, आर्या स्वप्नील शेडेकर यांच्यासह परिसरातील अनेक ग्रामस्थांचा समावेश आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी सर्व नवप्रविष्टांचे पक्षात स्वागत केले.
याप्रसंगी भाजप मंडल अध्यक्ष मोहन घुमे, ओबीसी आघाडीचे अध्यक्ष संदीप तेरवणकर, ज्येष्ठ नेते बाळ दाते, भाई फणसे, वरद गोरे, संतोष नांदगावकर, मनीष नांदगावकर, संजय पड्यार, संदेश भोसले आणि घनश्याम तळये यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गावागावांत नागरिकांशी थेट संवाद साधून समस्या जाणून घेणे आणि शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यावर पक्षाचा भर असून आगामी काळात संघटनात्मक बांधणी अधिक व्यापक केली जाईल, असा विश्वास या वेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या पक्षप्रवेशामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.





