ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: संघर्षातून नेतृत्वाचा झंझावात उभा करणारे बापू शेट्ये; सामाजिक बांधिलकी, राजकीय प्रवास आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाचा प्रेरणादायी प्रवास
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » संघर्षातून नेतृत्वाचा झंझावात उभा करणारे बापू शेट्ये; सामाजिक बांधिलकी, राजकीय प्रवास आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाचा प्रेरणादायी प्रवास
संगमेश्वर

संघर्षातून नेतृत्वाचा झंझावात उभा करणारे बापू शेट्ये; सामाजिक बांधिलकी, राजकीय प्रवास आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाचा प्रेरणादायी प्रवास

Gramin Varta
Last updated: September 15, 2026 10:57 am
Gramin Varta
23 Views
Share

साखरपा : सर्वसामान्य कुटुंबातून वाटचाल सुरू करत कष्ट, जिद्द, संयम आणि माणसे जोडण्याच्या वृत्तीच्या जोरावर सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे बापू शेट्ये यांचा आज वाढदिवस. संघर्षातून उभे राहिलेले नेतृत्व, सर्वसामान्यांशी असलेली घट्ट नाळ आणि कोणतेही पद असो, जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने धावून जाण्याची भूमिका यामुळे बापू शेट्ये यांचा जीवनप्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

साखरपा केंद्र शाळा क्रमांक १ येथे शिक्षण घेत असतानाच कबड्डी आणि क्रिकेटची आवड त्यांनी जोपासली. शालेय जीवनात शिक्षकांचे मार्गदर्शन, दहीहंडी, शिमगा तसेच विविध सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग यामुळे त्यांचा समाजाशी संपर्क वाढत गेला. लोकांमध्ये मिसळणे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि सामूहिक उपक्रमांना हातभार लावणे हीच वृत्ती पुढे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख बनली.

वयाच्या २७व्या वर्षी दुबईहून कॅमेरा मिळाल्यानंतर त्यांनी व्हिडिओग्राफी व्यवसायात पदार्पण केले. तालुक्यात या व्यवसायाची सुरुवात करणाऱ्यांमध्ये त्यांचा अग्रक्रम राहिला. त्यापूर्वी कोल्ड्रिंक व्यवसाय आणि कॅसेट लायब्ररीच्या माध्यमातून त्यांनी व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. काळानुसार बदल स्वीकारत नव्या संधींचा शोध घेण्याची त्यांची वृत्ती त्यांच्या व्यावसायिक आणि सामाजिक प्रवासात कायम दिसून आली.

बापू शेट्ये यांच्या व्यक्तिमत्त्वावर नानासाहेब शेट्ये यांच्या विचारांचा आणि कार्याचा मोठा प्रभाव राहिला. त्यांच्याकडून मिळालेली प्रेरणा, सामाजिक दृष्टिकोन आणि समाजासाठी काहीतरी करण्याची भावना यामुळे बापू शेट्ये यांच्या मनातील सामाजिक बांधिलकी अधिक दृढ झाली.

सन १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. त्या काळात विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा प्रभाव असतानाही २००३ मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. त्या काळातील विधानसभा क्षेत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आलेले एकमेव जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांचा विजय विशेष चर्चेचा ठरला. या विजयाने त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीला नवी दिशा मिळाली.

साखरपा परिसरासह विविध गावांमधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. विकासकामे, स्थानिक प्रश्न आणि सर्वसामान्यांच्या अडचणी यांना प्राधान्य देत त्यांनी आपल्या कार्याची वाटचाल सुरू ठेवली. पद कोणतेही असो, जनतेच्या प्रश्नांसाठी उपलब्ध राहण्याची भूमिका त्यांनी कायम जपली. याच कार्यपद्धतीमुळे राजकीय क्षेत्रात त्यांची ‘अजातशत्रू व्यक्तिमत्त्व’ अशी ओळख निर्माण झाली.

कोंडगाव गावचे पहिले थेट सरपंच म्हणून निवडून येण्याचा मानही त्यांना मिळाला. या पदाच्या माध्यमातून गावकऱ्यांची थेट सेवा करण्याची संधी मिळाल्याचे ते सांगतात. जिल्हा परिषद सदस्य, थेट सरपंच, विविध राजकीय पदे तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून काम करताना मिळालेल्या अनुभवाचा उपयोग त्यांनी परिसरातील विकासकामांसाठी करण्याचा प्रयत्न केला.

“तोंडावर साखर आणि डोक्यात बर्फ असला की यश नक्की मिळते,” हे बापू शेट्ये यांच्या यशाचे साधे पण प्रभावी सूत्र आहे. माणसांशी प्रेमाने वागणे, प्रतिकूल परिस्थितीतही संयम न सोडणे आणि कोणताही निर्णय घेताना शांतपणे विचार करणे, या गुणांनाच ते आपल्या यशामागचे खरे गमक मानतात.

त्यांच्या जीवनप्रवासात कुटुंबीय आणि मित्रपरिवाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे. पत्नी, मुले, भाऊ तसेच असंख्य मित्रांच्या सहकार्यामुळेच आजवरचा प्रवास शक्य झाल्याचे ते आवर्जून सांगतात. उदयजी सामंत, अण्णा सामंत, किरण सामंत, विष्णुशेठ रामाणे यांच्यासह अनेक सहकाऱ्यांकडून मिळालेली प्रेरणा आणि साथ आपल्या जीवनप्रवासात मोलाची ठरल्याचेही ते मान्य करतात.

आगामी काळात परिसरातील अद्याप जीर्णोद्धार न झालेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार व्हावा, ही त्यांची मनापासून इच्छा आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवातून मिळालेली ऊर्जा भविष्यातही समाजोपयोगी कामांसाठी वापरण्याचा त्यांचा निर्धार आहे.

वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत असताना बापू शेट्ये यांनी तरुणांसह समाजातील प्रत्येकाला कष्टाचे महत्त्व अधोरेखित करणारा साधा संदेश दिला आहे—“कष्ट करा, तुम्हाला नक्की यश मिळेल.”

संघर्षाच्या वाटेवरून मार्गक्रमण करताना माणसे जोडत राहणे, संकटाच्या काळात संयम राखणे आणि समाजाच्या प्रश्नांसाठी सातत्याने उभे राहणे, या गुणांच्या जोरावर बापू शेट्ये यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!

Total Visitors :

5427497
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरीत ७० वर्षीय महिला घरातून बेपत्ता; पोलिसांत तक्रार दाखल

Gramin Varta
1 Min Read

लांजा शहरासह तालुक्यात गणरायाचे वाजतगाजत आगमन; भक्तिमय वातावरणात गणेशोत्सवाला सुरुवात

Gramin Varta
1 Min Read

महाराष्ट्राचा ‘आदर्श नोंदणी पॅटर्न’ आता देशभरात लागू होणार; केंद्राकडून प्रत्येक कार्यालयासाठी ५० लाखांचे अनुदान जाहीर

Gramin Varta
3 Min Read

‘दिशा सालियनला कधीही भेटलो नाही, खोट्या प्रचाराने झुकणार नाही’; सीबीआयच्या एफआयरनंतर आदित्य ठाकरेंचे विरोधकांना सडेतोड उत्तर

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात समाजसेवा मंडळाचा स्वच्छता उपक्रम; ३३ सेवेकऱ्यांचे श्रमदान

1 Min Read
संगमेश्वर

चार महिन्याच्या चिमुकलीला उघड्यावर सोडून स्वप्नील गेला; बापाच्या मायेसाठी लेकीची नजर भिरभिरतेय…

3 Min Read
संगमेश्वर

सोनवी नदीत अनधिकृत खोदाई आणि वांद्रीत बेकायदा उत्खनन; महामार्गाच्या ठेकेदार कंपनीचा तब्बल १८ कोटींचा दंड थकीत

2 Min Read
संगमेश्वर

कोकणातील उद्योग-रोजगाराच्या प्रश्नांवर विचार मांडण्याची संधी

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?