ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: कोकणातील उद्योग-रोजगाराच्या प्रश्नांवर विचार मांडण्याची संधी
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » कोकणातील उद्योग-रोजगाराच्या प्रश्नांवर विचार मांडण्याची संधी
संगमेश्वर

कोकणातील उद्योग-रोजगाराच्या प्रश्नांवर विचार मांडण्याची संधी

Gramin Varta
Last updated: September 3, 2026 7:31 am
Gramin Varta
4 Views
Share

गाव विकास समिती कडून छत्रपती संभाजी महाराज जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी : कोकणातील उद्योग आणि रोजगाराच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष वेधण्यासाठी गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा यांच्या वतीने ‘छत्रपती संभाजी महाराज जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात आली आहे. संघटन प्रमुख सुहास खंडागळे आणि अध्यक्ष उदय गोताड यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही ही स्पर्धा घेण्यात येत असून, कोकणाच्या उद्योग-रोजगाराच्या भवितव्याबाबत तरुणाईसह नागरिकांनी आपले विचार मांडावेत, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.यंदाच्या स्पर्धेसाठी “कोकणात उद्योग व रोजगार न वाढण्याची कारणे” हा विषय देण्यात आला आहे. कोकणात नैसर्गिक साधनसंपत्ती, समुद्रकिनारा, पर्यटन, शेती, मत्स्यव्यवसाय तसेच कुशल मनुष्यबळ उपलब्ध असतानाही अपेक्षित प्रमाणात औद्योगिक विकास आणि रोजगारनिर्मिती का झाली नाही, याचा चिकित्सक आढावा स्पर्धकांना निबंधातून मांडता येणार आहे.

निबंधासाठी विशेषतः “कोकणात उद्योग व रोजगार न वाढण्याची कारणे” मांडताना,राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, कोकणविरोधी उद्योग धोरण आणि उद्योगविरोधी कोकणी मानसिकता या तीन मुद्द्यांचा विचार करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

उद्योग उभारणीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, परवानगी प्रक्रिया, स्थानिक पातळीवरील अडथळे, पर्यावरण आणि विकास यातील समतोल, स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी तसेच उद्योगांसाठी आवश्यक असलेले अनुकूल वातावरण याबाबतही स्पर्धकांना आपले स्वतंत्र मत मांडता येणार आहे.

कोकणात मोठ्या प्रमाणावर तरुण रोजगाराच्या शोधात मुंबई, पुणे आणि अन्य शहरांकडे स्थलांतरित होत आहेत. स्थानिक पातळीवर उद्योग आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यास हे स्थलांतर काही प्रमाणात रोखता येऊ शकते. त्यामुळे उद्योगवाढीसाठी सरकार, लोकप्रतिनिधी, प्रशासन, उद्योजक आणि स्थानिक समाज यांची भूमिका काय असावी, यावरही निबंधातून भाष्य करण्याची संधी स्पर्धकांना मिळणार आहे.

या स्पर्धेसाठी १,००० शब्दांचा, शुद्ध आणि सुंदर अक्षरातील निबंध लिहिणे अपेक्षित आहे. निबंध ५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत आयोजकांकडे पाठवायचा आहे. निबंध पाठविण्याचा पत्ता सौ. दिक्षा रविंद्र खंडागळे, देवरुख कॉलेजच्या पाठीमागे, सिद्धिविनायक नगर, देवरुख, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी असा आहे.

स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. प्रथम क्रमांकासाठी ५,५५५ रुपये, तर द्वितीय क्रमांकासाठी ३,३३३ रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय एकूण पाच उत्तेजनार्थ बक्षिसेही दिली जाणार आहेत.

स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी सौ. दिक्षा खंडागळे – ९४०४१ ५८३८४ किंवा नितीन गोताड – ९३२२५१६८८६ यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.

कोकणातील उद्योग, रोजगार आणि विकासाच्या प्रश्नांवर केवळ चर्चा न करता आपल्या विचारांना शब्दरूप देण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी, तरुणांनी तसेच कोकणाच्या विकासाबाबत आस्था असलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा संघटनेच्या वतीने सरचिटणीस डॉक्टर मंगेश कांगणे यांनी केले आहे.

Total Visitors :

5427550
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

Key Narratives on the Ongoing Evolution of Digital Landscapes

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

रत्नागिरीच्या समुद्रात बेकायदेशीर एलईडी मासेमारीचा धुमाकूळ; पर्ससीन आणि पारंपरिक मच्छीमारांमधील संघर्ष पेटण्याची चिन्हे

Gramin Varta
2 Min Read

ब्रेकिंग : माभळेत गणपती विसर्जनावेळी पिता-पुत्र नदीत बुडाले; वाचवण्याच्या प्रयत्नात एका चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

Gramin Varta
1 Min Read

‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत रत्नागिरी पोलिसांची अमली पदार्थांविरोधात मोठी धडक; १६ गुन्हे दाखल करत २२ जणांना ठोकल्या बेड्या

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

देवरूख पंचायत समितीचे लिपिक रोहित राजापूरकर यांचे निधन

1 Min Read
संगमेश्वर

आरवलीच्या राजाला आज भावपूर्ण निरोप; ‘उत्कर्ष तरुण मित्र मंडळा’च्या वतीने महाप्रसाद आणि विसर्जन सोहळ्याची जय्यत तयारी

2 Min Read
संगमेश्वर

Traversing the Wonders of Earth’s Diverse and Complex Ecosystems

7 Min Read
संगमेश्वर

संगमेश्वर : बुरंबाड-सरंद येथे भरधाव मोटारसायकल घसरून तरुणाचा मृत्यू

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?