ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रोमहर्षक सामन्यात मातब्बर रत्नागिरीला नमवून दादासाहेब सरफरे विद्यालयाचा ऐतिहासिक विजय; १७ वर्षांखालील जिल्हास्तरीय कबड्डीत पटकावले विजेतेपद
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रोमहर्षक सामन्यात मातब्बर रत्नागिरीला नमवून दादासाहेब सरफरे विद्यालयाचा ऐतिहासिक विजय; १७ वर्षांखालील जिल्हास्तरीय कबड्डीत पटकावले विजेतेपद
संगमेश्वर

रोमहर्षक सामन्यात मातब्बर रत्नागिरीला नमवून दादासाहेब सरफरे विद्यालयाचा ऐतिहासिक विजय; १७ वर्षांखालील जिल्हास्तरीय कबड्डीत पटकावले विजेतेपद

Gramin Varta
Last updated: October 3, 2026 2:38 pm
Gramin Varta
144 Views
Share

संगमेश्वर : बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या दादासाहेब सरफरे विद्यालय व कला-वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, शिवने-बुरंबीच्या संघाने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या कबड्डी गटात अजिंक्यपद पटकावत संगमेश्वर तालुक्याचा झेंडा जिल्हास्तरावर फडकावला आहे. अखेरच्या काही सेकंदांपर्यंत रोमहर्षक आणि श्वास रोखून धरायला लावणाऱ्या अंतिम सामन्यात संगमेश्वरच्या संघाने बलाढ्य रत्नागिरीचा पराभव करत विभागीय स्पर्धेसाठी आपली धडक निश्चित केली.

स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत दादासाहेब सरफरे विद्यालयाने गतविजेत्या दापोली संघाला धूळ चारून अंतिम फेरीत प्रवेश केला होता, तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात खेडवर मात करत रत्नागिरी संघाने अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे अंतिम लढत अत्यंत चुरशीची होणार याचे संकेत सुरुवातीपासूनच मिळाले होते. सामन्याच्या सुरुवातीला रत्नागिरीच्या संघाने आक्रमक पवित्रा घेत सरफरे विद्यालयावर वर्चस्व राखले होते. मध्यंतरानंतर अथर्व गेल्येने केलेल्या धडाकेबाज चढायांमुळे सरफरे संघाने कमबॅक करण्याचा जोरदार प्रयत्न केला, तरीही सामना संपायला अवघी पाच मिनिटे शिल्लक असताना रत्नागिरी संघाकडे तब्बल दहा गुणांची भक्कम आघाडी होती.

रत्नागिरीच्या बाजूने झुकलेला सामना सरफरे विद्यालयाच्या खेळाडूंनी अफाट जिद्दीच्या जोरावर फिरवला. अथर्व गेल्येच्या झंझावाती चढाया, त्याला रुद्र बोथले आणि यश पड्याळ यांनी पकडीत दिलेली भक्कम साथ याच्या जोरावर सरफरे संघाने शेवटच्या पाच मिनिटांत रत्नागिरीवर लोण चढवून सामन्यात बरोबरी साधली. अखेरच्या काही सेकंदांचा खेळ शिल्लक असताना सरफरे संघाकडे निर्णायक चढाई आली. यावेळी क्रीडा शिक्षक सुहास पाब्ये यांनी दिलेला कानमंत्र शिरसावंद्य मानत अथर्व गेल्येने रणनीतीपूर्वक शांत डोक्याने पहिले १२ ते १५ सेकंद वेळ काढून घेतला. त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता विजेच्या वेगाने रत्नागिरीच्या कोर्टात खोलवर जाऊन अचूक बोनस गुण वसूल केला. हाच बोनस गुण सामन्याचा निकाल ठरवणारा ठरला आणि अवघ्या एका गुणाच्या फरकाने दादासाहेब सरफरे विद्यालयाने जिल्हा अजिंक्यपदावर आपले नाव कोरले, तर रत्नागिरीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

या अभूतपूर्व विजयानंतर विजयी संघासह मार्गदर्शक क्रीडा शिक्षक सुहास पाब्ये, सुरेंद्र कुळ्ये, सुरज जाधव आणि सुनिल पवार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशाबद्दल बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रताप नारायण देसाई, जनरल सेक्रेटरी शरद गोविंद बाईत, शाळा समिती अध्यक्ष दिनेश शामराव जाधव, संचालक सचिन सीताराम मोहिते, संस्थेचे सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य प्रकाश भानुदास विरकर, पर्यवेक्षक महावीर साठे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

मुंबई ते मडगाव दरम्यान आणखी ४ विशेष गाड्या

Gramin Varta
2 Min Read

विलवडे रेल्वे स्थानकावरील आंदोलन रेल्वे प्रशासनाच्या आश्वासना नंतर तात्पुरते स्थगित

Gramin Varta
2 Min Read

व्हीलचेअरवरून थेट आकाशात; रत्नागिरीतील नऊ दिव्यांगांचा मुंबई-गोवा अविस्मरणीय विमान प्रवास

Gramin Varta
5 Min Read

शेतकरी मदत केंद्र सुरू करून दुष्काळसदृश परिस्थितीची तातडीने पाहणी करा; शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांचे आवाहन

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

संगमेश्वर नावडी येथील सरिता कुचेकर यांचे वृद्धापकाळाने निधन; आज रात्री अंत्ययात्रा

1 Min Read
संगमेश्वर

Probing the Frontiers of Understanding and Treating Brain Disorders

7 Min Read
संगमेश्वर

कडवईचे माजी सरपंच वसंत उजगावकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

2 Min Read
संगमेश्वर

देवरुख-तेलीवाडी व भोरपवणे येथे कृषी अधिकाऱ्यांनी बांधावर उतरून नोंदवले नुकसानीचे पंचनामे

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?