देवरुख (प्रतिनिधी): संगमेश्वर तालुक्यातील देवरुख-तेलीवाडी आणि भोरपवणे परिसरातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कृषी विभागाने थेट शेतांच्या बांधावर धडक दिली. या भागातील पिकांच्या नुकसानीचे अधिकृत पंचनामे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून युद्धपातळीवर नोंदवून घेण्यात आले. नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झालेल्या बळीराजाला तात्काळ दिलासा मिळावा यासाठी हा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार तसेच माजी आमदार प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, जिल्हा परिषद गटनेते व उपाध्यक्ष प्रमोद अधटराव, अभिजित शेट्ये, तालुकाध्यक्ष रुपेश कदम आणि शहराध्यक्ष सुशांत मुळ्ये यांच्या मार्गदर्शनाखाली हा दौरा निश्चित करण्यात आला. भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते तुकाराम किर्वे आणि माजी नगरसेविका सौ. रेश्मा तुकाराम किर्वे यांच्या विशेष पुढाकारातून व प्रमुख उपस्थितीत प्रशासकीय यंत्रणेला सोबत घेऊन ही संयुक्त पाहणी करण्यात आली.
या पाहणी दरम्यान कृषी अधिकारी सौ. शिसाळ आणि सौ. वेल्ये यांनी प्रत्यक्ष शेतात उतरून करपलेल्या व नुकसानग्रस्त पिकांची बारकाईने पाहणी केली तसेच वस्तुनिष्ठ पंचनामे नोंदवून घेतले. उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधत अधिकाऱ्यांनी शासनाच्या विविध कृषी योजनांची सविस्तर माहिती दिली आणि प्रशासकीय पातळीवर सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर योग्य ती भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची ग्वाही यावेळी तुकाराम किर्वे व सौ. रेश्मा किर्वे यांनी दिली.
या संयुक्त पाहणी दौऱ्यावेळी अशोक जयराम किर्वे, शिवराम गणपत किर्वे, विजय केशव कोठावले, सुरेश विठोबा कोठावले, पांडुरंग शंकर किर्वे, धनंजय लक्ष्मण किर्वे, रवींद्र कृष्णा किर्वे, सतीश सुरेश किर्वे, कृष्णा रामचंद्र किर्वे यांच्यासह महिला शेतकरी सरस्वती सकपाळ, सुमित्रा आत्माराम किर्वे, सुरेखा सीताराम किर्वे, शारदा गंगाराम पवार, लक्ष्मी विष्णू किर्वे, मालती मुकुंद किर्वे, सुवर्णा अनंत किर्वे, अर्चना अनंत किर्वे, सविता संतोष किर्वे, स्वाती रामदास किर्वे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






