ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: दाभोळे महसूल सेवकाविरोधातील उपोषण स्थगित; चौकशीचे प्रशासनाकडून लेखी आश्वासन
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » दाभोळे महसूल सेवकाविरोधातील उपोषण स्थगित; चौकशीचे प्रशासनाकडून लेखी आश्वासन
संगमेश्वर

दाभोळे महसूल सेवकाविरोधातील उपोषण स्थगित; चौकशीचे प्रशासनाकडून लेखी आश्वासन

Gramin Varta
Last updated: September 19, 2026 1:14 pm
Gramin Varta
62 Views
Share

दाभोळे/ सिकंदर फरास : दाभोळे येथील ग्राम महसूल कार्यालयाचा कारभार आणि महसूल सेवक दिलीप मालप यांच्या कामकाजाविरोधात बाजारपेठ, दाभोळे येथील रहिवासी सचिन शामगोंडा पाटील यांनी १८ सप्टेंबरपासून तलाठी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. ‘दाभोळे तलाठी कार्यालय आहे तरी कुठे? महसूल खाते काय करतंय?’ असा संतप्त सवाल फलकाद्वारे उपस्थित करत पाटील यांनी प्रशासकीय अनास्थेकडे लक्ष वेधले होते.

महसूल विभागाशी संबंधित सामान्य नागरिकांची कामे वेळेत होत नसल्याचा तसेच दाभोळे तलाठी कार्यालयाच्या कारभारामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप आंदोलनादरम्यान करण्यात आला. या प्रकरणाची प्रशासनाने दखल घेत संगमेश्वर नायब तहसीलदारांनी १९ सप्टेंबर रोजी आंदोलनकर्त्यांना लेखी पत्र दिले. दाभोळे महसूल सेवक दिलीप मालप यांच्याविरोधातील लेखी अथवा व्हिडिओ स्वरूपातील तक्रारी २१ सप्टेंबर २०२६ रोजी प्रत्यक्ष तहसीलदारांसमोर सादर करण्याचे निर्देश या पत्रातून देण्यात आले आहेत.

दाभोळे तलाठी कार्यालयाशी संबंधित प्राप्त तक्रारींची सखोल चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने लेखी आश्वासन दिले. तसेच सुरू असलेले बेमुदत उपोषण तातडीने स्थगित करण्याचे आवाहन नायब तहसीलदारांनी केले. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर सचिन पाटील यांनी उपोषण स्थगित केले.

यावेळी पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग, महसूल विभागाचे अधिकारी तसेच दाभोळे गावातील गावकर गणपत बेलकर उपस्थित होते. आता २१ सप्टेंबर रोजी तक्रारी सादर झाल्यानंतर प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी कशा पद्धतीने केली जाते आणि चौकशीनंतर नेमकी कोणती कारवाई होते, याकडे दाभोळे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Total Visitors :

5427497
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

देवरुख : रानगव्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या स्वप्नील पेडामकरच्या कुटुंबाला वनविभागाची १० लाखांची मदत

Gramin Varta
2 Min Read

पेट्रोल, डिझेल आणि एटीएफच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्समध्ये कपात; नवे दर लागू

Gramin Varta
1 Min Read

खेड: भेलसई पुलावर मोटारसायकल कठड्यावर आदळली; एकाचा मृत्यू, दोघे जखमी

Gramin Varta
2 Min Read

गुहागर : बुलेटला धडक दिल्याने तरुण गंभीर जखमी,एसटी बस चालकावर गुन्हा

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

साखरपा बसस्थानकात महिलेच्या पर्समधून २.६५ लाखांचे दागिने लंपास

1 Min Read
संगमेश्वर

वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात समाजसेवा मंडळाचा स्वच्छता उपक्रम; ३३ सेवेकऱ्यांचे श्रमदान

1 Min Read
संगमेश्वर

गणेशोत्सवात साहिल आंबवकरने साकारला शिमगा आणि गणेशोत्सवाचा अनोखा देखावा

2 Min Read
संगमेश्वर

सोनवी नदीत अनधिकृत खोदाई आणि वांद्रीत बेकायदा उत्खनन; महामार्गाच्या ठेकेदार कंपनीचा तब्बल १८ कोटींचा दंड थकीत

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?