ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरीत मध्यरात्री भरधाव मोटारीचा थरार; थिबा पॅलेस मार्गावर वाहनासह बंगल्याच्या कंपाऊंडला जोरदार धडक
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरीत मध्यरात्री भरधाव मोटारीचा थरार; थिबा पॅलेस मार्गावर वाहनासह बंगल्याच्या कंपाऊंडला जोरदार धडक
रत्नागिरी

रत्नागिरीत मध्यरात्री भरधाव मोटारीचा थरार; थिबा पॅलेस मार्गावर वाहनासह बंगल्याच्या कंपाऊंडला जोरदार धडक

Gramin Varta
Last updated: September 22, 2026 8:51 am
Gramin Varta
372 Views
Share

रत्नागिरी : शहरातील थिबा पॅलेस रोड परिसरामध्ये रविवारी मध्यरात्री एका बेदरकार चारचाकी चालकाने घातलेल्या प्रचंड धुडगुसामुळे स्थानिकांमध्ये काही काळ तीव्र घबराट पसरली होती. हलगर्जीपणे वाहन चालवत चालकाने जिओ कंपनीचा पोल, एका बंगल्याचे मुख्य गेट, कंपाऊंड वॉल आणि रस्त्यालगत उभी असलेली दुसरी एक अल्टो कार अशा मालमत्तांना एकापाठोपाठ जोरदार धडका देऊन मोठे नुकसान केले. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात संबंधित वाहनचालकाविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, हा थरारक प्रकार २० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अमानत बंगलोसमोरील मुख्य रस्त्यावर घडला. अमानत बंगला, थिबा पॅलेस रोड येथील रहिवासी फतिन फकीर महम्मद वास्ता यांनी याप्रकरणी पोलिसांकडे रीतसर फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, संशयित आरोपी सचिन नाना बुलाखे हा आपल्या ताब्यातील एमएच ०२ डी झेड ५९४१ क्रमांकाची चारचाकी गाडी मथुरा हॉटेलकडून चंद्रशेखर डेअरीच्या दिशेने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे हाकत घेऊन जात होता.

दरम्यान, वाहनावरील ताबा सुटल्याने या कारने सुरुवातीला रस्त्यावरील जिओ कंपनीच्या पोलला जोरदार धडक दिली. त्यानंतर गाडी थेट तक्रारदाराच्या बंगल्याचे गेट व कंपाऊंड वॉलवर आदळली. हा अनियंत्रित थरार इथेच न थांबता पुढे जाऊन रस्त्यावर असलेल्या एमएच ४३ एएन ९९९७ क्रमांकाच्या अल्टो कारलाही या वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात अल्टो कार मालकाची कोणतीही तक्रार नसली, तरी बंगल्याचे आणि खांबाचे मोठे नुकसान केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२४(४) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. रात्री १२:५१ वाजता या घटनेची नोंद करून पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी तक्रारदाराला न्यायालयात दाद मागण्याची समज देण्यात आली असून, पोलीस हवालदार जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Total Visitors :

5469300
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दाभोळ प्रकल्पातील वापरात नसलेली २०० हेक्टर जमीन मूळ शेतकऱ्यांना परत करा

Gramin Varta
2 Min Read

किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त २२ वर्षीय तरुणीचा दापोलीत उपचारादरम्यान मृत्यू

Gramin Varta
2 Min Read

पत्रकार प्रविण कांबळे लिखित-दिग्दर्शित ‘नाडा’ एकांकिकेने मुंबईकरांची मने जिंकली

Gramin Varta
2 Min Read

Exploring Intelligent Solutions for a Smart Approach to Skincare

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

कोकण रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी; चार ट्रेनचा सुपरफास्ट दर्जा रद्द होणार, तिकीट दरात होणार कपात

3 Min Read
रत्नागिरी

मालगुंड येथे आधुनिक मराठी कवितेचे जनक कविवर्य केशवसुत यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन

1 Min Read
रत्नागिरी

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी रत्नागिरीत ५ ऑक्टोबरला काँग्रेसचा मूक मोर्चा; ‘व्होट चोरी’च्या आरोपावरून रणशिंग फुंकले

2 Min Read
रत्नागिरी

चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्रासाठी बहुजन समाज पार्टीची नवी कार्यकारिणी घोषित

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?