ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: पत्रकार प्रविण कांबळे लिखित-दिग्दर्शित ‘नाडा’ एकांकिकेने मुंबईकरांची मने जिंकली
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » पत्रकार प्रविण कांबळे लिखित-दिग्दर्शित ‘नाडा’ एकांकिकेने मुंबईकरांची मने जिंकली
लांजा

पत्रकार प्रविण कांबळे लिखित-दिग्दर्शित ‘नाडा’ एकांकिकेने मुंबईकरांची मने जिंकली

Gramin Varta
Last updated: September 18, 2026 10:53 am
Gramin Varta
29 Views
Share

लांजा/अरबाज नेवरेकर : लांजा तालुक्यातील युवा पत्रकार, लेखक व कलावंत प्रविण कांबळे लिखित व दिग्दर्शित ‘नाडा’ या समाजप्रधान मराठी एकांकिकेचे मुंबईत प्रभावी सादरीकरण झाले. कलारंग थिएटर्स, लांजा या संस्थेच्या कलाकारांनी सादर केलेल्या या एकांकिकेला रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मुंबईतील टिळकनगर येथील महाराष्ट्र ऐक्यवर्धक मंडळाच्या वतीने आयोजित स्व. सौ. शांताबाई जोग राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत १६ सप्टेंबर रोजी ‘नाडा’चे सादरीकरण करण्यात आले. सामाजिक, शैक्षणिक तसेच उपेक्षित घटकांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवत मानवी समाजातील अनिष्ट रूढी, प्रथा-परंपरांविरोधात भाष्य करणाऱ्या या एकांकिकेने प्रेक्षकांना विचार करण्यास प्रवृत्त केले.

पत्रकारितेबरोबरच कथा, कविता आणि राज्यनाट्य स्पर्धेसाठी दोन अंकी नाटकाच्या लेखनाचा अनुभव असलेल्या प्रविण कांबळे यांनी ‘नाडा’चे लेखन केले असून दिग्दर्शनासोबतच अभिनयाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. लांजा तालुक्यातील ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांनी एकांकिकेत भूमिका साकारल्या.

भारत पालवकर, मिथुन कांबळे, सायली भोरे, सलोनी जाधव, चेतन जाधव, विलास कोटकर, संदीप धनावडे यांच्यासह बालकलाकार अर्णव जाधव व समृद्धी पालवकर यांनी भूमिका केल्या. कलाकारांच्या अभिनयाला तांत्रिक टीमची भक्कम साथ लाभली. पार्श्वसंगीत प्रसिद्ध नाट्यसंगीतकार प्रदीप कांबळे, प्रकाशयोजना दयानंद चव्हाण, नेपथ्य विलास कोटकर, विशाल जाधव व सूरज वाडेकर, तर वेशभूषा क्रांती पालवकर यांनी सांभाळली.

एकांकिकेच्या सुरुवातीपासूनच कथानकाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. मध्यंतराकडे जाताना निर्माण होणारा भावनिक ताण आणि शेवटच्या टप्प्यातील परिणामकारक मांडणी यामुळे ‘नाडा’ने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला. सादरीकरणानंतर मुंबईतील अनेक मान्यवर व रसिक प्रेक्षकांनी कलाकारांची भेट घेऊन संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.

प्रविण कांबळे यांच्या लेखन, दिग्दर्शन व अभिनयातील योगदानाचे पत्रकारिता, साहित्य आणि नाट्य क्षेत्रातून कौतुक होत आहे. या उपक्रमासाठी डॉ. संजय बापेरकर, सत्यवान पावसकर, अशोक कदम, संतोष जाधव, अजय कांबळे, दाजी गडहिरे, अनिरुद्ध कांबळे, हनुमंत कदम, सचिन जाधव, संतोष पालवकर आणि सुधीर कोचिरकर यांचे सहकार्य लाभले.

Total Visitors :

5427497
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

खेडशी परिसरात ट्रॅव्हल्सची मोकाट वासराला धडक; नागरिक, पोलिस आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तत्परतेने मुक्या जीवाला जीवदान

Gramin Varta
2 Min Read

मंडणगड: हातात चाकू घेऊन गावात दहशत निर्माण करणाऱ्यावर गुन्हा

Gramin Varta
1 Min Read

रिचार्जमध्ये ‘डेटा’चा भार कमी होणार आता फक्त कॉलिंगसाठी स्वतंत्र रिचार्ज

Gramin Varta
2 Min Read

गणेशोत्सवाच्या बंदोबस्तातही चिपळूण पोलिसांची कर्तव्यतत्परता; रिक्षाचालकाचा हरवलेला मोबाईल शोधून केला सुपूर्द

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

लांजा

एकल महिलांच्या सर्वेक्षणाला १८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

1 Min Read
लांजा

खेरवसे जाधववाडीत बिबट्याच्या वावराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; तातडीने कॅमेरा ट्रॅप लावून उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची वनविभागाकडे मागणी

1 Min Read
लांजा

विलवडे रेल्वे स्थानकावरील आंदोलन रेल्वे प्रशासनाच्या आश्वासना नंतर तात्पुरते स्थगित

2 Min Read
लांजा

लांजा : दारूच्या नशेत विहिरीत पडून प्रौढाचा मृत्यू

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?