ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: NMMS परीक्षेत १०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या यशाचे उद्दिष्ट; लांज्यात उद्या शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » NMMS परीक्षेत १०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या यशाचे उद्दिष्ट; लांज्यात उद्या शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळा
लांजा

NMMS परीक्षेत १०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या यशाचे उद्दिष्ट; लांज्यात उद्या शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळा

Gramin Varta
Last updated: October 3, 2026 6:31 pm
Gramin Varta
70 Views
Share

कै. काकासाहेब सरफरे व्याख्यानमाला व मुख्याध्यापक संघाचा संयुक्त उपक्रम; तज्ज्ञांचे मार्गदर्शन व मोफत प्रश्नसंच वाटप

लांजा (अरबाज नेवरेकर): ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागावी आणि राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत (NMMS) जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना यश संपादन करता यावे, या उद्देशाने लांजा येथे विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कै. काकासाहेब सरफरे स्मृती व्याख्यानमाला आणि लांजा तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा रविवार, ४ ऑक्टोबर रोजी आयोजित केली आहे.

न्यू इंग्लिश स्कूल, लांजा येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही दिवसभर चालणारी कार्यशाळा संपन्न होणार आहे. ग्रामीण भागातील प्रतिभावान आणि होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने कै. काकासाहेब सरफरे स्मृती व्याख्यानमालेच्या वतीने सातत्याने विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम हाती घेतले जातात. याच परंपरेचा भाग म्हणून यंदा लांजा तालुक्यातील किमान १०० हून अधिक विद्यार्थ्यांना NMMS परीक्षेच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवून देण्याचा ठोस संकल्प मुख्याध्यापक संघाने केला असून, या उपक्रमासाठी स्थानिक उद्योजक सुबोध सरफरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण तयारीसाठी कोल्हापूर येथील अनुभवी व तज्ज्ञ अभ्यासकांची विशेष उपस्थिती या कार्यशाळेत लाभणार आहे. यामध्ये गणित विषयासाठी विलास पाटील, बुद्धिमत्ता चाचणीसाठी रवि मोळे, समाजशास्त्र विषयासाठी प्रकाश गोते आणि विज्ञान विषयाचे सखोल मार्गदर्शन कृष्णा पाटील करणार आहेत. ही तज्ज्ञ मंडळी विद्यार्थ्यांना परीक्षेचे स्वरूप, वेळेचे अचूक नियोजन, कठीण प्रश्न सोडविण्याच्या सोप्या क्लृप्त्या आणि महत्त्वाच्या घटकांची तयारी याविषयी मार्गदर्शन करतील.

याच कार्यशाळेदरम्यान परीक्षार्थींना सरावासाठी उपयुक्त ठरणाऱ्या आदर्श प्रश्नसंचाचे मोफत वाटपही केले जाणार आहे. तालुक्यातील NMMS परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि संबंधित शाळांच्या मार्गदर्शक शिक्षकांनी या एकदिवसीय सखोल कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक दत्ताजी कदम आणि उद्योजक सुबोध सरफरे यांनी केले आहे.

Total Visitors :

5435607
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

कोकण रेल्वे मार्गाचे येत्या ५ वर्षांत दुपदरीकरण पूर्ण करणार; दररोज धावणार १०० हून अधिक गाड्या

Gramin Varta
2 Min Read

चिपळूणमध्ये किरकोळ कारणावरून जावई व सासऱ्याला भररस्त्यात बेदम मारहाण; कोळकेवाडीतील चार जणांवर गुन्हा दाखल

Gramin Varta
2 Min Read

दुष्काळग्रस्त यादीबाहेरील शेतकऱ्यांनाही मदत देणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Gramin Varta
3 Min Read

रत्नागिरी शासकीय रुग्णालयात ACL लिगामेंटची दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया; खासगी रुग्णालयातील लाखोंचा खर्च वाचला

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

लांजा

विलवडे रेल्वे स्थानकावरील आंदोलन रेल्वे प्रशासनाच्या आश्वासना नंतर तात्पुरते स्थगित

2 Min Read
लांजा

खेरवसे जाधववाडीत बिबट्याच्या वावराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; तातडीने कॅमेरा ट्रॅप लावून उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची वनविभागाकडे मागणी

1 Min Read
लांजा

लांजा एसटी वर्कशॉपमध्ये पोलिसांचा ‘सेवा संकल्प’; कर्मचाऱ्यांनी घेतली सायबर सुरक्षेची शपथ

2 Min Read
लांजा

हर्दखळे ग्रामपंचायतीतील कथित गैरप्रकारांवरून लांजा BDO संशयाच्या भोवऱ्यात; किरण चव्हाण यांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना थेट जाब

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?