ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: कोकण रेल्वे मार्गाचे येत्या ५ वर्षांत दुपदरीकरण पूर्ण करणार; दररोज धावणार १०० हून अधिक गाड्या
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Saturday, Sep 26, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » कोकण रेल्वे मार्गाचे येत्या ५ वर्षांत दुपदरीकरण पूर्ण करणार; दररोज धावणार १०० हून अधिक गाड्या
रत्नागिरी

कोकण रेल्वे मार्गाचे येत्या ५ वर्षांत दुपदरीकरण पूर्ण करणार; दररोज धावणार १०० हून अधिक गाड्या

Gramin Varta
Last updated: September 26, 2026 7:59 am
Gramin Varta
79 Views
Share

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी आणि मालवाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दुपदरीकरणाच्या कामाला गती देण्याचा मोठा निर्णय घेतला असून येत्या पाच वर्षांत हे काम पूर्ण केले जाईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी दिली. दुपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरून दररोज १०० पेक्षा जास्त प्रवासी व मालवाहू गाड्या धावतील, ज्यामुळे कोकणातील पर्यटनासह स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

सध्या कोकण रेल्वेच्या एकूण ७४१ किलोमीटर मार्गापैकी ९० टक्क्यांहून अधिक मार्ग एकेरी असल्याने गाड्यांना क्रॉसिंगसाठी ताटकळत राहावे लागते. या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात २६३ किलोमीटर अंतराचे ‘पॅच डब्लिंग’ (तुकड्या-तुकड्यांचे दुपदरीकरण) हाती घेण्यात येणार आहे. यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून मंगळूर ते गोवा आणि गोवा ते वैभववाडी या टप्प्यांमधील तांत्रिक सर्वेक्षण सध्या वेगाने प्रगतीपथावर आहे. दुपदरीकरणाच्या मार्गातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नव्या बोगद्यांची निर्मिती केली जाणार आहे. यात प्रामुख्याने पेडणे (गोवा) आणि जुने गोवे येथे नव्या रेल्वे बोगद्यांचे काम हाती घेतले जाईल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने आवश्यक निधी मंजूर केल्याने कामाला मोठा वेग मिळणार आहे.

नवीन बोगदे आणि आधुनिक ट्रॅकमुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित तसेच विश्वासार्ह होईल, गाड्यांचा वेग वाढून प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होईल. यामुळे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तिन्ही राज्यांतील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून व्यापार, उद्योग आणि पर्यटनाला मोठी चालना मिळेल. दुसरीकडे मालवाहतुकीला बळ देण्यासाठी कोलाड ते सुरतकल दरम्यान चालवल्या जाणाऱ्या ‘रो-रो’ सेवेचाही विस्तार केला जाणार आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यापासून या रो-रो सेवेच्या फेऱ्या १२ वरून थेट ४६ पर्यंत वाढवण्यात येणार असून एका फेरीत ५७ टन वजनाची अवजड वाहने वाहून नेण्याची क्षमता असेल. दरम्यान, रोखे बाजारातून उभारलेल्या कर्जाचा ३०० कोटी रुपयांचा शेवटचा हप्ता २२ सप्टेंबर रोजी फेडण्यात आला असून कोकण रेल्वे आता पूर्णपणे कर्जमुक्त झाली आहे; तसेच पुढील पाच वर्षांत ३०० कोटींपेक्षा जास्त वार्षिक नफा मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचेही संतोषकुमार झा यांनी स्पष्ट केले.

Total Visitors :

5428557
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

World Independently and Embracing the Freedom of Solo Travel

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

कोयना खोऱ्यात मध्यरात्री भूकंपाचे पाच सौम्य धक्के

Gramin Varta
2 Min Read

दापोलीतील एक दिवसाच्या नवजात बालकाचा डेरवण येथे उपचारादरम्यान मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

नीट पेपरफुटी प्रकरण: लातूरच्या मोटेगावकर कुटुंबाला जबर धक्का; आदित्य मोटेगावकरवर दोन वर्षांची कडक बंदी

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरीत हेरॉईनसदृश अंमली पदार्थासह दोघे ताब्यात; १ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त

2 Min Read
रत्नागिरी

गणपतीपुळे मंदिरातील भाद्रपदी गणेशोत्सवाची महाप्रसादाने सांगता; सुमारे २१०० भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

1 Min Read
रत्नागिरी

‘सेवा संकल्प अभियाना’ने तीन वर्षांच्या चिमुरडीला दिले नवे आयुष्य; दुभंगलेले ओठ आणि टाळूवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत मध्यरात्री भरधाव मोटारीचा थरार; थिबा पॅलेस मार्गावर वाहनासह बंगल्याच्या कंपाऊंडला जोरदार धडक

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?