ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: टेक्सासमध्ये हनुमान मूर्तीवरून वाद; भारतीय-अमेरिकन समुदायाकडून तीव्र विरोध
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » टेक्सासमध्ये हनुमान मूर्तीवरून वाद; भारतीय-अमेरिकन समुदायाकडून तीव्र विरोध
देश-विदेश

टेक्सासमध्ये हनुमान मूर्तीवरून वाद; भारतीय-अमेरिकन समुदायाकडून तीव्र विरोध

Gramin Varta
Last updated: September 24, 2026 7:47 am
Gramin Varta
3 Views
Share

दिल्ली: अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय-अमेरिकन समुदाय राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. विशेषतः हिंदू धर्म आणि त्यांच्या श्रद्धेविषयी करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे हा मुद्दा चर्चेत आहे.

टेक्सासमध्ये भगवान हनुमानांची ९० फूट उंच मूर्ती हटवण्याची भाषा एका पुराणमतवादी यूट्यूबरने केल्यानंतर हा वाद आणखी चिघळला असून, त्याच्यावर तीव्र टीका होत आहे.

टेक्सासमधील शुगर लँड येथील अष्टलक्ष्मी मंदिरात ही मूर्ती स्थापित करण्यात आली असून, तिचे नाव ‘स्टॅच्यू ऑफ युनियन’ आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून ही मूर्ती वादाच्या केंद्रस्थानी आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही समर्थकांनी या मूर्तीला गैर-ख्रिश्चन ठरवले होते.मात्र, या चर्चेला वांशिक भेदभावाचा रंग तेव्हा मिळाला, जेव्हा यूट्यूबर आणि ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ कार्यकर्ता जेसी ह्यूजेस यांनी ‘एक्स’वर या मूर्तीचा फोटो शेअर केला. त्यासोबत त्यांनी लिहिले की, “जेव्हा आम्ही जिंकू, तेव्हा ही मूर्ती पाडून टाकू.”

ह्यूजेस यांच्या या पोस्टनंतर हिंदू संघटना आणि विचारवंतांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. अमेरिकन लष्कराचे माजी सैनिक रुचिर बक्षी यांनी त्यांच्या या वक्तव्याला देशद्रोही आणि हिंदू धर्मासाठी धोका असल्याचे म्हटले. स्वतःला अमेरिकन-हिंदू म्हणून संबोधताना बक्षी यांनी अमेरिकेत हिंदूंविरोधात वाढत असलेल्या द्वेषाबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, अमेरिकेतील अन्य कोणत्याही समुदायाच्या प्रार्थनास्थळाची केवळ त्यांच्या श्रद्धेचा द्वेष करता म्हणून तोडफोड करणे, हा थेट हिंदू धर्मासाठी धोका आहे.ते पुढे म्हणाले की, अमेरिकेत जिंकण्याचा अर्थ हिंदू मंदिरे पाडणे असा असेल, तर ज्या देशासाठी मी लढलो तो देश तुम्हाला नको आहे. तुमच्यासारखे नसलेल्या लोकांना लक्ष्य करण्याचा परवाना तुम्हाला हवा आहे.

बक्षी यांच्या या वक्तव्याला ‘कोऍलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका’ आणि टेक्सासमधील अमेरिकन लष्कराचे आणखी एक माजी सैनिक तसेच राजकीय विश्लेषक कार्ल व्हेलेस यांनीही पाठिंबा दिला.’कोऍलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका’ने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, “या प्लॅटफॉर्मवर उघडपणे होत असलेली धार्मिक कट्टरता पाहून आम्हीही तुमच्याइतकेच हैराण आहोत. त्याविरोधात तुमच्यासोबत लढताना आम्हाला अभिमान वाटतो.”

टेक्सास हे अनेक दशकांपासून रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला राहिले आहे. १९९४ पासून या राज्यात कोणत्याही प्रमुख पदावर डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार निवडून आलेला नाही. या राज्यात पाच लाखांहून अधिक भारतीय-अमेरिकन नागरिक राहतात.टेक्सासमध्ये रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व आहे. राज्यपालपद, सर्व प्रमुख कार्यकारी पदे तसेच राज्याच्या विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांवर या पुराणमतवादी पक्षाचे नियंत्रण आहे.

टेक्सासमधील निवडणूक प्रचारादरम्यान स्थलांतरितांविरोधातील वक्तव्ये हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा व्हाइट हाऊसमध्ये परतल्यानंतर अशा वक्तव्यांमध्ये आणखी वाढ झाल्याचे सांगितले जाते.

Total Visitors :

5427414
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

Bluetooth Technology Work in Tandem for Indoor Positioning System

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

हर्णै बंदर परिसरात ‘स्वच्छता ही सेवा अभियान’ उत्साहात संपन्न; समुद्रकिनारा प्लास्टिकमुक्त करत पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

Gramin Varta
2 Min Read

आंबोली धबधब्यावर पर्यटकांच्या अंगावर अचानक पडला साप; चिमुकला थोडक्यात बचावला

Gramin Varta
2 Min Read

बीआयएसने सोन्याच्या हॉलमार्किंग शुल्कात ७५ रुपयांपर्यंत केली वाढ, नवीन दर लागू

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

देश-विदेश

राज्यसभेच्या 11 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीची घोषणा; 16 ऑक्टोबरला मतदान

2 Min Read
देश-विदेश

“शिवसेनेसारखा वाद लांबवू नका!” तृणमूलच्या नाव-चिन्हावर सुप्रीम कोर्ट कडक; निवडणूक आयोगाला सोमवारपर्यंत ‘टाइमलाइन’ देण्याचे आदेश

3 Min Read
देश-विदेश

IRCTCचा मोठा दणका! ९ कोटींहून अधिक संशयास्पद खात्यांवर कारवाई; रेल्वे तिकीट काळाबाजाराला लगाम

3 Min Read
देश-विदेश

भारताचा जपानवर ८ विकेट्सनी दणदणीत विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?