ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: IRCTCचा मोठा दणका! ९ कोटींहून अधिक संशयास्पद खात्यांवर कारवाई; रेल्वे तिकीट काळाबाजाराला लगाम
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » IRCTCचा मोठा दणका! ९ कोटींहून अधिक संशयास्पद खात्यांवर कारवाई; रेल्वे तिकीट काळाबाजाराला लगाम
देश-विदेश

IRCTCचा मोठा दणका! ९ कोटींहून अधिक संशयास्पद खात्यांवर कारवाई; रेल्वे तिकीट काळाबाजाराला लगाम

Gramin Varta
Last updated: September 15, 2026 3:21 pm
Gramin Varta
18 Views
Share

नवी दिल्ली : ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंगमधील गैरप्रकार, बनावट यूजर आयडी आणि तिकीटांचा काळाबाजार रोखण्यासाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात IRCTCने मोठी कारवाई केली आहे. आतापर्यंत तब्बल ९ कोटींहून अधिक यूजर खात्यांवर कारवाई करण्यात आली असून, यामध्ये ३ कोटी ४ लाख खाती कायमस्वरूपी निष्क्रिय करण्यात आली आहेत. तर संशयास्पद हालचाली आढळलेल्या ६.३३ कोटी खात्यांना तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे.

IRCTCच्या माहितीनुसार, बनावट ई-मेल पत्ते आणि मोबाइल क्रमांकाच्या आधारे मोठ्या प्रमाणात यूजर आयडी तयार करून रेल्वे तिकीट बुकिंग प्रणालीचा गैरवापर केला जात असल्याचे निदर्शनास आले होते. आरक्षण सुरू होताच अशा खात्यांमधून मोठ्या प्रमाणावर तिकिटे बुक केली जात होती. त्यानंतर मागणी वाढलेल्या सणासुदीच्या आणि सुट्टीच्या काळात ही तिकिटे प्रवाशांना जादा दराने विकली जात असल्याचे आढळून आले.

या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी IRCTCने तिकीट बुकिंग प्रक्रियेत सुरक्षेचे नियम अधिक कठोर केले आहेत. अॅडव्हान्स रिझर्व्हेशन विंडो सुरू झाल्यानंतर पहिल्या दहा मिनिटांत अधिकृत एजंटना तिकीट बुक करता येणार नाही. सकाळी ८ ते ८.१० या कालावधीत ही मर्यादा लागू राहणार आहे. त्याचबरोबर अॅडव्हान्स बुकिंगच्या काळात तिकीट आरक्षित करण्यासाठी वापरकर्त्यांची ओळख पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे.

बनावट सॉफ्टवेअर आणि बॉटच्या माध्यमातून होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील बुकिंगवरही IRCTCने नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली आहे. अॅंटी-बॉट प्रणाली आणि कंटेंट डिलिव्हरी नेटवर्कसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून, त्यामुळे स्वयंचलित पद्धतीने होणाऱ्या संशयास्पद बुकिंगमध्ये ५५ ते ६५ टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, सणासुदीच्या काळात रेल्वे तिकीट बुकिंगला मोठी मागणी असल्याचे यंदाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. ७ सप्टेंबर रोजी IRCTCच्या वेबसाइटवर एका दिवसात २० लाखांहून अधिक तिकिटांचे बुकिंग झाले. यंदाच्या वर्षातील हा एका दिवसातील सर्वाधिक बुकिंगचा आकडा ठरला आहे. यापूर्वी १९ ऑगस्ट २०२५ रोजी एका दिवसात १८.४० लाख तिकिटे बुक करण्याचा विक्रम नोंदवला गेला होता.

तिकीट बुकिंगमधील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी IRCTCने गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेदरम्यान १६ हजार ४१ संशयास्पद ई-मेल डोमेन ब्लॉक करण्यात आले आहेत. तसेच सायबर क्राईम पोर्टलवर संशयास्पद ४.२१ लाख पीएनआरशी संबंधित ५९२ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांवर नियंत्रण आणण्यासोबतच सामान्य प्रवाशांना आरक्षणाची सुविधा अधिक पारदर्शक आणि सुरक्षित पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा IRCTCचा प्रयत्न असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. विशेषतः गणेशोत्सव, दिवाळी आणि अन्य सणांच्या काळात तिकीटांना मोठी मागणी असताना या उपाययोजनांमुळे बनावट बुकिंग आणि बॉटच्या गैरवापराला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

मुंबईतील कोस्टल रोडवर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

Gramin Varta
2 Min Read

टेक्सासमध्ये हनुमान मूर्तीवरून वाद; भारतीय-अमेरिकन समुदायाकडून तीव्र विरोध

Gramin Varta
3 Min Read

शहरात वाढलेल्या एका Gen Z तरुणाच्या नजरेतून गाव, माणसं आणि ‘घर’ शोधणाऱ्या ‘मॅगझिन’चा टीझर प्रदर्शित

Gramin Varta
3 Min Read

नळपाणी योजनांची धुरा महिला बचत गटांच्या हाती; रत्नागिरी जिल्हा परिषदेचा पथदर्शी प्रयोग, शंभर टक्के पाणीपट्टी वसुलीने रचला आदर्श

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

देश-विदेश

हिऱ्यात साक्षात विघ्नहर्त्याचे रूप; सुरतमधील ६१८.२७ कॅरेटचा अद्भूत रफ डायमंड दर्शनासाठी खुला, मूल्य कोट्यवधींच्या घरात

2 Min Read
देश-विदेश

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी ४८ तासांचा इशारा; एसआयआर मुद्यावरून ‘कॉक्रोच जनता पक्ष’ आक्रमक

2 Min Read
देश-विदेश

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६: भारतीय महिला हॉकी संघाने इंडोनेशियाचा १७-१ ने उडवला धुव्वा

3 Min Read
देश-विदेश

भारताचा जपानवर ८ विकेट्सनी दणदणीत विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?