ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: संगमेश्वर तालुका शालेय कबड्डी स्पर्धेत आठल्ये-सप्रे-पित्रेच्या मुलांचा झेंडा; मुलींना उपविजेतेपद
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » संगमेश्वर तालुका शालेय कबड्डी स्पर्धेत आठल्ये-सप्रे-पित्रेच्या मुलांचा झेंडा; मुलींना उपविजेतेपद
संगमेश्वर

संगमेश्वर तालुका शालेय कबड्डी स्पर्धेत आठल्ये-सप्रे-पित्रेच्या मुलांचा झेंडा; मुलींना उपविजेतेपद

Gramin Varta
Last updated: September 28, 2026 3:24 pm
Gramin Varta
157 Views
Share

देवरूख : संगमेश्वर तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या १९ वर्षांखालील मुलांच्या संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले, तर मुलींच्या संघाने उपविजेतेपद मिळवत महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी एका मानाच्या तुऱ्याची भर घातली. शिवाजी माध्यमिक विद्यालय, कोसुंब येथे झालेल्या या स्पर्धेत विजेत्या मुलांच्या संघाची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

स्पर्धेतील पहिल्या सामन्यात आठल्ये-सप्रे-पित्रेच्या संघाने भाईशा घोसाळकर कनिष्ठ महाविद्यालय, कडवईच्या संघाचा पराभव केला. त्यानंतरच्या सामन्यात पैसाफंड कनिष्ठ महाविद्यालय, संगमेश्वरच्या संघावर मात करत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात दादासाहेब सरफरे कनिष्ठ महाविद्यालय, बुरंबीच्या संघासमोर दमदार खेळाचे प्रदर्शन करत आठल्ये-सप्रे-पित्रेच्या संघाने विजय मिळवून तालुकास्तरीय विजेतेपदावर नाव कोरले.

विजेत्या संघात रुतिक जाधव, देवदास पोवार, प्रणव गोमाणे, सुजल निवळकर, अनिकेत नवेले, कर्णधार उत्कर्ष रावणंग, यश घवाळी, उपकर्णधार पार्थ गिड्ये, प्रेम शिंदे, सुजल खानविलकर, केतन साळवी आणि सर्वेश भेरे यांचा समावेश आहे. या स्पर्धेत उत्कर्ष रावणंग आणि सर्वेश भेरे यांनी आपल्या खेळाने विशेष प्रभाव पाडला.

मुलींच्या संघानेही स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत उपविजेतेपद मिळवले. या संघात अक्षरा कांबळे, ईश्वरी गुरव, जान्हवी चव्हाण, सिद्धी जाधव, मृणाली कांगणे, कर्णधार श्रुती किंजळे, सानिका सनगले, उपकर्णधार शामल पातेरे, वैदेही कान्हेरे, रिद्धी सुवरे, भक्ती शिवगण आणि भूमी कोटकर यांचा सहभाग होता. शामल पातेरे हिने स्पर्धेत चमकदार खेळ करत संघाच्या कामगिरीत महत्त्वाची भूमिका बजावली.

महाविद्यालयाच्या दोन्ही संघांना क्रीडा प्रशिक्षक संजय इंदुलकर यांचे मार्गदर्शन लाभले, तर प्रा. देवयानी जोशी यांनी व्यवस्थापिकेची जबाबदारी सांभाळली. या यशाबद्दल संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, सुजाता प्रभूदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, जिमखाना विभागप्रमुख प्रा. विजय मुंडेकर, प्रा. प्रवीण जोशी, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. अभिनव पातेरे तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी आणि उपविजेत्या संघाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ४४१.४३ कोटींच्या १०० टक्के खर्चाला मंजुरी

Gramin Varta
5 Min Read

खेड: कळंबणी बुद्रुक येथे बंद घराची खिडकी फोडून घरफोडी; टीव्हीसह स्वयंपाकाची भांडी पळवली

Gramin Varta
1 Min Read

मराठवाड्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार; कोकण आणि कृष्णाखोऱ्याचे पाणी आणणार, छत्रपती संभाजीनगरात मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Gramin Varta
3 Min Read

सोन्याच्या दरातील घसरणीला ब्रेक; महिन्याच्या पहिल्याच दिवशी भावात वाढ

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

देवरुख : सायबर फसवणुकीतील रक्कम स्वीकारून दुसऱ्याला ट्रान्स्फर करणाऱ्यावर गुन्हा

2 Min Read
संगमेश्वर

संगमेश्वर : देवळे येथे गणेशोत्सवासाठी  गावी आलेल्या चाकरमान्यांची पाण्यासाठी वणवण

2 Min Read
संगमेश्वर

साखरपा बसस्थानकात महिलेच्या पर्समधून २.६५ लाखांचे दागिने लंपास

1 Min Read
संगमेश्वर

देवरुख: आंबव हनुमान स्टॉपजवळ गांजा सेवन करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?