ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: कोकणात तीन दशके अविरत आरोग्यसेवा देणाऱ्या चिपळूणच्या डॉ. यतीन व डॉ. वैशाली जाधव दाम्पत्याला ‘आरोग्यरत्न’ पुरस्कार जाहीर
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » कोकणात तीन दशके अविरत आरोग्यसेवा देणाऱ्या चिपळूणच्या डॉ. यतीन व डॉ. वैशाली जाधव दाम्पत्याला ‘आरोग्यरत्न’ पुरस्कार जाहीर
चिपळूण

कोकणात तीन दशके अविरत आरोग्यसेवा देणाऱ्या चिपळूणच्या डॉ. यतीन व डॉ. वैशाली जाधव दाम्पत्याला ‘आरोग्यरत्न’ पुरस्कार जाहीर

Gramin Varta
Last updated: November 4, 2026 9:10 am
Gramin Varta
1 View
Share

चिपळूण : महानगरांमध्ये उपलब्ध असणाऱ्या मोठ्या संधींना बाजूला ठेवून आपल्याच जन्मभूमीत दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचा संकल्प घेतलेल्या चिपळूण येथील प्रसिद्ध त्वचाविकार व लेसर तज्ज्ञ डॉ. यतीन जाधव आणि भूलतज्ज्ञ तसेच औद्योगिक आरोग्य चिकित्सक डॉ. वैशाली जाधव यांना एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या मानाच्या ‘आरोग्यरत्न’ पुरस्काराने गौरविले जाणार आहे. गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ त्यांनी आरोग्य क्षेत्रासोबतच सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक पटलावर बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

डॉ. यतीन जाधव यांनी त्वचाविकार, सौंदर्यशास्त्र आणि लेसर उपचारांचे उच्च शिक्षण मुंबई, दिल्लीसह विदेशातून पूर्ण केले. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा लाभ स्थानिक कोकणवासीयांना मिळावा या हेतूने त्यांनी चिपळुणात ‘स्प्रिंग स्किन क्लिनिक अँड लेसर इन्स्टिट्यूट’ची उभारणी करून आरोग्य क्षेत्रात नवीन मानदंड प्रस्थापित केले. याशिवाय अपरांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातूनही त्यांचे आरोग्यविषयक कार्य सातत्याने सुरू आहे. दुसरीकडे, भूलतज्ज्ञ म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या डॉ. वैशाली जाधव यांनी औद्योगिक स्वास्थ्य चिकित्सक म्हणून कामगारांच्या आरोग्यविषयक प्रश्नांवर प्रभावी काम करत कोकणातील वैद्यकीय सेवेत महत्त्वाचे योगदान दिले आहे.

वैद्यकीय क्षेत्राव्यतिरिक्त समाजकारणातही या दाम्पत्याचा सहभाग मोठा राहिला आहे. डॉ. यतीन जाधव हे लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, सांजसोबत प्रतिष्ठान, आपलं चिपळूण, एकता विकास मंच, विभा अरविंद ग्रंथालय, अखिल भारतीय बालकुमार साहित्य परिषद, राज्य आपत्ती व्यवस्थापन समिती, इंडियन मेडिकल असोसिएशन (महाराष्ट्र राज्य) तसेच ‘टच’ यांसारख्या अनेक संस्थांच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत आहेत. या सर्व उपक्रमांमध्ये डॉ. वैशाली जाधव यांची त्यांना मोलाची साथ लाभत आहे. आपल्या मातीतील माणसांची सेवा करण्यासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या या दाम्पत्याच्या कार्याची अधिकृत पत्राद्वारे दखल घेत वाहिनीने हा पुरस्कार जाहीर केला असून, या गौरवार्ह यशामुळे चिपळूणसह संपूर्ण कोकण परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Total Visitors :

5469303
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

नाटे परिसरात भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

Gramin Varta
1 Min Read

दापोली अर्बन बँकेचे संचालक माधव शेट्ये यांचा अमेरिकन विद्यापीठाकडून डॉक्टरेटने गौरव

Gramin Varta
3 Min Read

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारकडे आग्रही, प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करू – शरद पवार

Gramin Varta
4 Min Read

गोकुळच्या ४९२ दूध संस्थांचे सभासदत्व रद्द करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

चिपळूण

जिल्हा नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत चिपळूण भाजप तालुकाध्यक्ष उदय घाग यांचा तडकाफडकी राजीनामा

2 Min Read
चिपळूण

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी जिल्हा परिषद ठामपणे पाठीशी; अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांची ग्वाही

3 Min Read
चिपळूण

चिपळूण नगरपरिषदेच्या मटण व मच्छी मार्केट इमारतीचा होणार कायापालट; नूतनीकरणाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

1 Min Read
चिपळूण

चिपळूण नगरपरिषदेची भव्य ‘सेवा ज्योत यात्रा’ बाईक रॅली उत्साहात; शहरवासीयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?