ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: गोकुळच्या ४९२ दूध संस्थांचे सभासदत्व रद्द करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » गोकुळच्या ४९२ दूध संस्थांचे सभासदत्व रद्द करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
महाराष्ट्र

गोकुळच्या ४९२ दूध संस्थांचे सभासदत्व रद्द करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Gramin Varta
Last updated: September 17, 2026 8:03 am
Gramin Varta
17 Views
Share

कोल्हापूर: गोकुळ दूध संघाच्या ४९२ दूध संस्थांचे सभासदत्व रद्द करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. या संस्थांचे सभासदत्व व कायदेशीर वैधतेबाबत उच्च न्यायालयाने याआधी नोंदवलेले निष्कर्ष कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे गेल्या सहा महिन्यांचा संघर्ष फळाला आला, अशी प्रतिक्रिया गोकुळ दूध संघाच्या सभासद संस्था प्रतिनिधींनी व्यक्त केली.

इस्पुर्ली ता. करवीर येथील श्री. राम सहकारी दूध संस्था व कोगील ता. करवीर येथील श्री. काडसिद्धेश्वर सहकारी दूध संस्था यांनी याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांनी ४९२ संस्थांच्या पात्रतेच्या दिलेल्या निकालाला आव्हान देण्यात आले होते. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. नरसिंहा व न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांनी दि. तीन सप्टेंबर २०२६ रोजीच्या निकालात नोंदविलेले निष्कर्ष कायदेशीर व बरोबर असल्याचा निर्वाळाही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे या सर्व संस्थांच्या सभासदत्वाचा आणि पर्यायाने मतदानाचाही मार्ग आता मोकळा झालेला आहे.

या न्यायालयीन लढाईतील एक प्रमुख याचिकाकर्ता असलेल्या श्री. विठ्ठलाई सहकारी महिला दूध संस्था , करंजफेनच्या अध्यक्षा सौ. पल्लवी अनुपम वागरे म्हणाल्या, आम्हा सर्व दूध संस्थांना मतदार यादीतून काढून टाकण्याचाच अदृश्य शक्तीचा घाट होता. त्यासाठी प्रचंड खटाटोप, कुटील आणि कपट कारस्थाने रचली जात होती. अनेकवेळा वकीलपत्रावर सह्या करण्यासाठी, प्रतिज्ञापत्रे करण्यासाठी, शपथपत्रे करण्यासाठी गेली सहा महिने आम्ही प्रचंड त्रासातून चाललो आहोत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे एकदाचे या त्रासातून आम्ही मोकळे झालो. कारण; सर्वोच्च न्यायालयाने आम्हा संस्थांच्या विरोधातील ही याचिका फेटाळून आम्हाला दिलासा दिला आहे. न्यायदेवतेचे आभार आणि सत्यमेव जयते!

सुनावणीवेळी ४९२ सहकारी दूध संस्थांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अभिषेक मनु सिंघवी, ॲड. पी. एस. पटवालिया, ॲड. आनंद लांडगे, ॲड. भूषण मंडलिक, ॲड. पृथ्वीराज पाटील यांनी काम पाहिले. श्री. राम सहकारी दूध संस्था, इस्पुर्ली यांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. विकास सिंग यांनी बाजू मांडली.

Total Visitors :

5427529
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

संगमेश्वर तालुका प्राथमिक शिक्षक संघाची सहविचार सभा उत्साहात

Gramin Varta
2 Min Read

एसटीच्या ताफ्यात २०० अत्याधुनिक व्होल्वो बसेस

Gramin Varta
4 Min Read

थिबापॅलेस परिसरात मुलाला पळवून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेने संशयित ताब्यात

Gramin Varta
2 Min Read

नायर रुग्णालयाच्या कॅन्टीनसह सात नामांकित आस्थापनांचे परवाने निलंबित; अन्न व औषध प्रशासनाचा दणका

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

रोजगार महाकुंभ महाराष्ट्रला नवी बळकटी; राज्य कौशल्य विकास सोसायटी-सृजन ट्रस्टमध्ये सामंजस्य करार

3 Min Read
महाराष्ट्र

शहरात वाढलेल्या एका Gen Z तरुणाच्या नजरेतून गाव, माणसं आणि ‘घर’ शोधणाऱ्या ‘मॅगझिन’चा टीझर प्रदर्शित

3 Min Read
महाराष्ट्र

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘द वन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

1 Min Read
महाराष्ट्र

दुभंगलेले ओठ व टाळू असलेल्या बालकांना मिळणार मोफत सर्वसमावेशक उपचार

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?