ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: नायर रुग्णालयाच्या कॅन्टीनसह सात नामांकित आस्थापनांचे परवाने निलंबित; अन्न व औषध प्रशासनाचा दणका
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » नायर रुग्णालयाच्या कॅन्टीनसह सात नामांकित आस्थापनांचे परवाने निलंबित; अन्न व औषध प्रशासनाचा दणका
महाराष्ट्र

नायर रुग्णालयाच्या कॅन्टीनसह सात नामांकित आस्थापनांचे परवाने निलंबित; अन्न व औषध प्रशासनाचा दणका

Gramin Varta
Last updated: September 18, 2026 9:29 am
Gramin Varta
22 Views
Share

मुंबई : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या आरोग्याशी होणारी खेळखंडोबा रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईत धडक तपासणी मोहीम राबवत सात बड्या अन्न आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित केले आहेत. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर सुरू झालेल्या या कारवाईच्या सत्रात थेट मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयातील कॅन्टीनवरही गंडांतर आले आहे. रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि नागरिकांच्या जिवाशी सुरू असलेली हेळसांड आणि अन्न सुरक्षा नियमांचे उघड उल्लंघन समोर आल्यानंतर प्रशासनाने नायरच्या कॅन्टीनचा परवाना निलंबित करण्याचा कठोर निर्णय घेतला.

कुलाब्यातील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध ऑलिम्पिया कॉफी हाऊसमध्ये ग्राहकांच्या तक्रारींनंतर अचानक टाकलेल्या छाप्यादरम्यान धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार उघडकीस आला. या ठिकाणी चक्क मूत्रालयाजवळ अन्नसाठा करून ठेवल्याचे पथकाच्या निदर्शनास आले, तर स्वयंपाकघर आणि भांडी घासण्याच्या जागेत अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले होते. तपासणीदरम्यान रेफ्रिजरेटरमध्ये मांसाहारी रक्ताचे डाग आढळले असून, कच्चे शाकाहारी व मांसाहारी पदार्थ एकत्रच कोंबून ठेवल्याचे निष्पन्न झाले. धक्कादायक बाब म्हणजे, तिथे अन्न हाताळणाऱ्या ३५ कर्मचाऱ्यांपैकी तब्बल ३४ जणांकडे आवश्यक अन्न सुरक्षा प्रशिक्षणाचा अभाव असल्याचे उघड झाले आहे.

या मोहिमेत केवळ हॉटेल्सच नव्हे, तर ऑनलाइन अन्न पुरवठा करणाऱ्या यंत्रणांनाही चाप लावण्यात आला असून चेंबूर येथील ‘ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या क्विक-कॉमर्स डिलिव्हरी सेंटरवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय घाटकोपरमधील विश्वास स्वीट्स अँड स्नॅक्स आणि ए-१ जनरल अँड ड्राय फ्रूट्स, वरळीचे मिलन पंजाब तसेच मालाड पूर्वेतील सद्गुरू स्वीट्स या आस्थापनांचे परवानेही अन्न सुरक्षेच्या मानकांचे उल्लंघन केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहेत. या सर्व आस्थापनांवर अन्न सुरक्षा कायद्यान्वये पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया गतिमान करण्यात आली असून, नियम धाब्यावर बसवून ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा एफडीए प्रशासनाने दिला आहे.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

जयगड-नांदिवडे मार्गावर बेदरकारपणे क्रेन चालवणे भोवले; उत्तर प्रदेशातील चालकावर जयगड पोलिसांत गुन्हा दाखल

Gramin Varta
1 Min Read

महाराष्ट्राच्या लोककलेचा तेजस्वी तारा निखळला; ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन

Gramin Varta
2 Min Read

पेट्रोल, डिझेल आणि एटीएफच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्समध्ये कपात; नवे दर लागू

Gramin Varta
1 Min Read

मुंबई-गोवा महामार्ग १७ वर्षांनंतरही रखडलेलाच; खर्च ५,५०० कोटींनी वाढून १६,९०९ कोटींवर

Gramin Varta
4 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

रायगड – भीषण अपघातात दुचाकीचा अक्षरशः चुराडा; तरुण रक्तबंबाळ

1 Min Read
महाराष्ट्र

वंदे मातरम याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस

1 Min Read
महाराष्ट्र

देवदर्शनानंतर मुंबईला परतणाऱ्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात;चौघांचा जागीच मृत्यू, सात जखमी

2 Min Read
महाराष्ट्र

शहरात वाढलेल्या एका Gen Z तरुणाच्या नजरेतून गाव, माणसं आणि ‘घर’ शोधणाऱ्या ‘मॅगझिन’चा टीझर प्रदर्शित

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?