देवरूख : संगमेश्वर (देवरूख) पंचायत समितीमध्ये लिपिक म्हणून कार्यरत असलेले रोहित रजनीकांत राजापूरकर यांचे सोमवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने देवरूख परिसरासह मित्रपरिवार आणि परिचितांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
रोहित राजापूरकर हे पंचायत समितीमध्ये लिपिक पदावर कार्यरत होते. शांत, मनमिळावू आणि सुस्वभावी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. आपल्या प्रेमळ स्वभावामुळे त्यांनी मोठा मित्रपरिवार जोडला होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर आजारपणामुळे उपचार सुरू होते. मात्र, सोमवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या निधनाची वार्ता देवरूख परिसरात समजताच मित्रपरिवार, सहकारी आणि परिचितांमध्ये शोककळा पसरली. त्यांच्या अकाली निधनाने अनेकांना धक्का बसला असून मित्रपरिवारातून भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करण्यात येत आहे. राजापूरकर यांची अंत्ययात्रा मंगळवारी सकाळी ९ वाजता त्यांच्या राहत्या घरातून निघणार आहे.





