ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास हायकोर्टाची मनाई
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास हायकोर्टाची मनाई
देश-विदेश

सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास हायकोर्टाची मनाई

Gramin Varta
Last updated: September 23, 2026 8:24 am
Gramin Varta
41 Views
Share

धार्मिक मिरवणुकांतील ध्वनी प्रदूषणावर कठोर निर्देश;नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश

दिल्ली: धार्मिक सण, उत्सव आणि मिरवणुकांदरम्यान होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी घातली आहे.

ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासह संबंधित ध्वनीवर्धक उपकरणे जप्त करण्याचे निर्देशही न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर आज दोनवेळा सुनावणी झाली. न्यायालयाने काल या प्रकरणाची सुमोटो दखल घेत राज्य सरकारला आपली भूमिका मांडण्याचे निर्देश दिले होते.

सुनावणीदरम्यान राज्य सरकारने न्यायालयाला सांगितले की, मिरवणुकांना परवानगी देण्यात येते; मात्र ध्वनिक्षेपकांच्या वापरासाठी स्वतंत्रपणे नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. ध्वनिक्षेपकांचा वापर निर्धारित ध्वनीमर्यादेच्या अधीन राहूनच करता येईल, असे सरकारने स्पष्ट केले. तसेच मिरवणुकीदरम्यान लेसर लाईटचा वापर आणि फटाके फोडण्यास परवानगी नसल्याचेही सरकारकडून न्यायालयात सांगण्यात आले.

रुग्णालये आणि शाळांसह धार्मिक स्थळांचाही शांतता क्षेत्रांमध्ये समावेश असल्याची माहिती राज्य सरकारने न्यायालयाला दिली. गणपती मंडपांचाही शांतता क्षेत्रात समावेश होऊ शकतो; मात्र त्यासाठी संबंधित ठिकाणाची अधिकृत यादीत नोंद करणे आवश्यक असल्याचे सरकारने स्पष्ट केले.ढोल-ताशा पथकांमध्ये हातोड्याने वाजवण्यात येणाऱ्या सिलेंडरच्या वापरावरही न्यायालयाने बंदी घातली आहे. तसेच मंडळांना देण्यात आलेली परवानगी ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परवानगी प्रदर्शित केली नसल्यास ध्वनिक्षेपक लावता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

भविष्यात परवानगी देताना अनामत रक्कम घेण्याचाही विचार करावा आणि नियमांचे उल्लंघन झाल्यास ती रक्कम जप्त करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत.

“नियम स्पष्ट असताना तक्रारी का येतात?”

ध्वनी प्रदूषण आणि पर्यावरणासंदर्भातील नियम स्पष्ट असतानाही ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारी का येतात आणि हे थांबवणार कसे, असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला.मुंबईत ९१ पोलीस ठाणी असून प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरारी पथकांमार्फत कारवाई केली जाते, अशी माहिती राज्य सरकारने न्यायालयाला दिली. कायद्यानुसार नियमांचे उल्लंघन करणारी उपकरणे जप्त करण्याची तरतूद असल्याचेही सरकारने स्पष्ट केले.

सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने पंढरपूरच्या वारीचा संदर्भ दिला. वारीमध्ये हजारो भाविक सहभागी होतात आणि टाळ वाजवले जातात; मात्र त्यातून ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

Total Visitors :

5427412
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरीत सागरी सीमा मंचातर्फे स्वच्छ सागर अभियान

Gramin Varta
3 Min Read

Embracing Change Key Milestones in the Current Evolution Era

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

गणपतीसाठी कोकण गाठताना चाकरमान्यांची परीक्षा; रेल्वे गाड्या ११ ते १२ तास उशिराने, प्रवाशांचा संताप

Gramin Varta
2 Min Read

दोन महिन्यांची मेहनत; संगमेश्वरात खातू बंधूंनी साकारली ‘जुनी मुंबई ते नवी मुंबई’!

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

देश-विदेश

IRCTCचा मोठा दणका! ९ कोटींहून अधिक संशयास्पद खात्यांवर कारवाई; रेल्वे तिकीट काळाबाजाराला लगाम

3 Min Read
देश-विदेश

झहीर खान यांची चेन्नई सुपर किंग्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती

2 Min Read
देश-विदेश

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६: भारतीय महिला हॉकी संघाने इंडोनेशियाचा १७-१ ने उडवला धुव्वा

3 Min Read
देश-विदेश

बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणाली तीव्र; आजपासून तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?