ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरीत सागरी सीमा मंचातर्फे स्वच्छ सागर अभियान
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरीत सागरी सीमा मंचातर्फे स्वच्छ सागर अभियान
रत्नागिरी

रत्नागिरीत सागरी सीमा मंचातर्फे स्वच्छ सागर अभियान

Gramin Varta
Last updated: September 19, 2026 8:50 am
Gramin Varta
12 Views
Share

रत्नागिरी : सागरी सीमा मंचातर्फे दि. १९ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर या कालावधीत दक्षिण रत्नागिरीतील रत्नागिरी व राजापूर तालुक्यांमधील एकूण २० विविध समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छ सागर अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

समुद्र हा कोकणच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. रत्नागिरी जिल्ह्याची अर्थव्यवस्था, मच्छीमारी, पर्यटन, स्थानिक संस्कृती आणि हजारो कुटुंबांची उपजीविका समुद्राशी जोडलेली आहे. त्यामुळे समुद्र आणि समुद्रकिनारा स्वच्छ ठेवणे ही केवळ पर्यावरणाची बाब नसून सामाजिक, आर्थिक आणि भविष्यातील पिढ्यांशी संबंधित जबाबदारी आहे. याच भूमिकेतून सागरी सीमा मंचाच्या पुढाकाराने विविध सामाजिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था, मच्छीमार, युवक आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागातून स्वच्छ सागर अभियान राबविण्यात येत आहे.

सप्टेंबर महिन्यातील तिसऱ्या शनिवारी जागतिक किनारपट्टी स्वच्छता दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने कोस्ट गार्ड व भारत सरकारच्या संबंधित मंत्रालयांच्या माध्यमातून देशभर किनारपट्टी स्वच्छता अभियान राबविले जाते. सन 2022 पासून सीमा जागरण मंचाच्या माध्यमातून देशभर हा उपक्रम राबविला जात असून, कोकण प्रांतात सागरी सीमा मंच व सहयोगी संस्था या अभियानाला व्यापक जनसहभागाचे स्वरूप देत आहेत.

‘स्वच्छ सागर’ म्हणजे केवळ समुद्रकिनाऱ्यावर पडलेला कचरा उचलणे नव्हे. कचरा समुद्रात जाण्यापूर्वीच रोखणे, त्याचे योग्य वर्गीकरण करणे, पुनर्वापर व पुनर्चक्रण वाढवणे आणि नागरिकांच्या दैनंदिन वर्तनात सकारात्मक बदल घडवणे, ही या अभियानाची मूळ संकल्पना आहे. समुद्र स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी केवळ शासनाची किंवा एखाद्या स्वयंसेवी संस्थेची नाही. मच्छीमार, स्थानिक नागरिक, महिला, युवक, विद्यार्थी, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, पर्यटक, ग्रामपंचायत, नगरपालिका आणि सामाजिक व पर्यावरण संस्थांनी एकत्र येऊन ही जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे.

रत्नागिरी शहरातील भाट्ये समुद्रकिनारी 19 सप्टेंबर रोजी कोस्ट गार्ड व शासनाच्या विविध विभागांच्या सहभागातून अभियान स्वतंत्रपणे राबविण्यात येणार आहे. यात मंचाचा सक्रिय सहभाग असेल, तर सागरी सीमा मंच विविध संस्थांच्या गौरी-गणपती विसर्जनानंतरच्या दुसऱ्या दिवशी, २० सप्टेंबर रोजी मांडवी किनाऱ्यावर स्वच्छता अभियान होणार आहे.

तसेच अनंतचतुर्दशीनंतर २६ सप्टेंबर रोजी पांढरासमुद्र, नांदिवडे व संदखोल (जयगड), वरवडे, मालगुंड, गणपतीपुळे, आरे, काळबादेवी, मिऱ्या-शिवलकरवाडी, मिऱ्या-पाटीलवाडी, कुर्ली, वायंगणी, रनपार, गणेशगुळे, पूर्णगड, गावखडी तसेच राजापूर तालुक्यातील वेत्ये, कशेळी, आंबोळगड आणि नाटे या ठिकाणी स्थानिक ग्रामपंचायती, विविध महाविद्यालये, शाळा, सामाजिक संस्था व मंडळांच्या सहभागातून एकूण 20 विविध समुद्रकिनाऱ्यांवर या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

या अभियानासाठी समुद्र स्वच्छतेच्या विषयात काम करणाऱ्या समाजातील विविध व्यक्तींची समिती स्थापन करण्यात आली असून या स्वच्छता अभियान समिती प्रमुख संजीव लिमये, स्वच्छता अभियान सहप्रमुख सुहास ठाकूरदेसाई आहेत. याबरोबरच अभियान राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक समुद्रकिनाऱ्यासाठी ‘किनारा (बीच) प्रमुख’ निश्चित करण्यात आले आहेत.

“कचरा समुद्रात जाऊ देऊ नका” हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. केवळ एक दिवस किनारा स्वच्छ करून हा प्रश्न सुटणार नाही. कचरा समुद्रात जाण्यापासून रोखण्यासाठी नागरिकांच्या सवयींमध्ये बदल घडवणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे, सिंगल व एकूणच प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि समुद्रकिनाऱ्याबाबत आपली सामूहिक जबाबदारी ओळखणे ही या अभियानाची पुढील दिशा आहे.

Total Visitors :

5427461
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

सावर्डे-नायशी फाट्यावर एसटी बसची कारला धडक; मुलगी किरकोळ जखमी, चालकाविरोधात गुन्हा दाखल

Gramin Varta
1 Min Read

The Must-Have Application of the Year Charts with Innovation

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

देशातील हायकोर्टांमध्ये 65 लाखांहून अधिक प्रकरणे प्रलंबित; न्यायासाठी नागरिक अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत

Gramin Varta
2 Min Read

विलवडे रेल्वे स्थानकावरील उपोषणाच्या पार्श्वभूमीवर लांजा पोलिसांची संघर्ष समितीसोबत बैठक

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

मजगावच्या इब्जी कुटुंबाचा शैक्षणिक वारसा कायम; तीन डॉक्टरांनंतर सलमा इब्जीचे नर्सिंग क्षेत्रात यश

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत भव्य सेमीकंडक्टर पार्कची घोषणा; जपानच्या ‘हिटाची’ आणि अमेरिकेच्या ‘केएलए’ कंपन्यांशी जागतिक करार

2 Min Read
रत्नागिरी

मिरकरवाडा बंदरातील मोडकळीस आलेल्या विनावापर नौका हटवण्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंत मुदत

1 Min Read
रत्नागिरी

शिपाई पदाची भरती प्रक्रिया रखडली; अंतिम मुदतीनंतर ६८ दिवस उलटूनही नियुक्ती नाही

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?