ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरीत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा भव्य मूक मोर्चा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरीत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा भव्य मूक मोर्चा
रत्नागिरी

रत्नागिरीत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा भव्य मूक मोर्चा

saurabhsalvi262@gmail.com
Last updated: September 2, 2026 7:44 am
saurabhsalvi262@gmail.com
5 Views
Share

रत्नागिरी: जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील मौजे शिवरे येथे ग्रामसभेदरम्यान झालेल्या अमानुष हल्ल्यामुळे व त्रासामुळे ग्रामपंचायत अधिकारी स्व. पी. एन. पाटील यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेच्या तीव्र निषेधार्थ आणि दोषींवर तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या प्रमुख मागणीसाठी रत्नागिरी जिल्हा ग्रामपंचायत युनियन अधिकारी संघटनेच्या वतीने भव्य मूक मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. १८ ऑगस्टपासून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी ग्रामसभा कामकाजावर बहिष्कार टाकला असून, मंगळवारी सकाळच्या सुमारास जिल्ह्यातील तब्बल ५६७ ग्रामपंचायत अधिकारी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरले. युनियनचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र महाडिक आणि जिल्हा सरचिटणीस संजय दळवी यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद कार्यालयातून निघालेला हा विराट मूक मोर्चा जयस्तंभ मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

मोर्च्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. शिवरे येथील घटनेतील दोषींवर तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करून हा संपूर्ण खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी आग्रही मागणी अधिकाऱ्यांनी लावून धरली आहे. यासोबतच वर्षभरात वारंवार होणाऱ्या १० ते १२ ग्रामसभांऐवजी कायद्यात तातडीने आवश्यक दुरुस्ती करावी आणि वर्षातून केवळ एकच आर्थिक नियोजन व आढावा ग्रामसभा ठेवण्याची कायदेशीर तरतूद करण्यात यावी, असा महत्त्वाचा मुद्दा निवेदनात मांडण्यात आला.

ग्रामसभेत त्रयस्थ व्यक्तींकडून होणाऱ्या अनधिकृत व्हिडिओ चित्रीकरणावर आणि त्याद्वारे होणाऱ्या बदनामीवर कायदेशीर बंदी घालून कडक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात याव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. याशिवाय संवेदनशील, वादग्रस्त व मोठ्या ग्रामसभांसाठी प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त पुरवावा तसेच महसूल, कृषी, आरोग्य, समाजकल्याण यांसारख्या इतर विभागांच्या विशेष ग्रामसभांची प्रशासकीय व आयोजनाची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभागांवरच सोपवण्यात यावी, या मागण्यांचाही निवेदनात स्पष्ट उल्लेख करून अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.

Total Visitors :

5427529
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

चिपळूण नगरपरिषदेसमोर वाहतुकीला अडथळा; पोलिस कर्मचाऱ्याशी हुज्जत घातल्याप्रकरणी गुन्हा

Gramin Varta
1 Min Read

दहावी-बारावीच्या परीक्षांचे बिगुल वाजले; राज्य मंडळाकडून संभाव्य तारखांचा कालावधी जाहीर

Gramin Varta
1 Min Read

Latest Trends and Insights in Shaping Industries for the Future

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

कनकाडीतील ‘जल जीवन’ योजनेतील भ्रष्टाचाराविरोधात संगमेश्वर पंचायत समितीसमोर ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण सुरू

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

नळपाणी योजनांची धुरा महिला बचत गटांच्या हाती; रत्नागिरी जिल्हा परिषदेचा पथदर्शी प्रयोग, शंभर टक्के पाणीपट्टी वसुलीने रचला आदर्श

3 Min Read
रत्नागिरी

थिबापॅलेस परिसरात मुलाला पळवून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेने संशयित ताब्यात

2 Min Read
रत्नागिरी

मांडवी समुद्रकिनाऱ्यावर ‘कोकण सागर तट स्वच्छता अभियान’ संपन्न;2.5 टन कचरा संकलित

3 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत पावसाळा संपण्यापूर्वीच उन्हाचा कडाका; ऐन सप्टेंबरमध्ये ‘ऑक्टोबर हीट’चे चटके

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?