ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरीतील झाडगाव येथे जुन्या वादातून रिक्षाचालकावर प्राणघातक हल्ला; लोखंडी फाईट व लाथाबुक्क्यांनी मारहाण करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरीतील झाडगाव येथे जुन्या वादातून रिक्षाचालकावर प्राणघातक हल्ला; लोखंडी फाईट व लाथाबुक्क्यांनी मारहाण करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी

रत्नागिरीतील झाडगाव येथे जुन्या वादातून रिक्षाचालकावर प्राणघातक हल्ला; लोखंडी फाईट व लाथाबुक्क्यांनी मारहाण करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

Gramin Varta
Last updated: October 28, 2026 10:31 am
Gramin Varta
550 Views
Share

रत्नागिरी: रत्नागिरी शहरानजीकच्या झाडगाव येथील योजक कंपनीजवळ भररस्त्यात जुन्या वैमनस्यातून रिक्षा अडवून चालकाला शिवीगाळ करत लोखंडी फाईटने गंभीर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात रिक्षाचालक गंभीर जखमी झाले असून मारहाण करणाऱ्या दोघा संशयित तरुणांविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुरुगवाडा येथील रहिवासी असलेले ५० वर्षीय रिक्षाचालक शेखर चंद्रकांत भोगले हे २७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास आपली ऑटो रिक्षा (क्र. एमएच ०८ एक्यू ५९८८) घेऊन पांढरा समुद्र नाका ते खालची आळी झाडगाव या मुख्य रस्त्यावरून जात होते. ते योजक कंपनीजवळ पोहोचले असता, त्यांच्याच वाडीत राहणाऱ्या राहुल राजेंद्र पिलणकर याने आपली दुचाकी (क्र. एमएच ०८/९०९९) अचानक त्यांच्या रिक्षासमोर आडवी मारून गाडी अडवली. त्यानंतर “तू माझी इज्जत काढतोस का?” असा जाब विचारत राहुलने रिक्षाचालकाला अश्लील शिवीगाळ सुरू केली. वाद वाढत गेल्यावर राहुल पिलणकर आणि त्याचा साथीदार स्वेजस राजेश पिलणकर (वय २६, रा. मुरुगवाडा) या दोघांनी शेखर भोगले यांना रिक्षातून खाली ओढून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

या मारहाणीदरम्यान स्वेजस पिलणकर याने आपल्या हातातील लोखंडी फाईटने भोगले यांच्या उजव्या डोळ्याच्या वर भुवईजवळ तसेच पाठीवर जोरदार प्रहार करून त्यांना रक्तबंबाळ केले. त्याचवेळी राहुल पिलणकर याने त्यांच्या कानाजवळ आणि तोंडावर हाताच्या मुठींनी सपासप ठोसे मारून गंभीर दुखापत केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. जखमी शेखर भोगले यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार करण्यात आले.

या प्रकरणी जखमी शेखर भोगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी संशयित आरोपी स्वेजस राजेश पिलणकर आणि राहुल राजेंद्र पिलणकर या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३(५) नुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ४३९/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.

Total Visitors :

5468436
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

चिपळूण: स्वातंत्र्याच्या अमृतकाळातही तिवरे-गंगेचीवाडी मोबाईल नेटवर्कपासून वंचित; गावात जिओ टॉवर उभारण्याची ग्रामस्थांची आक्रमक मागणी

Gramin Varta
2 Min Read

मिरकरवाडा बंदरातील मोडकळीस आलेल्या विनावापर नौका हटवण्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंत मुदत

Gramin Varta
1 Min Read

पुढील वर्षीचे जिल्हा साहित्य संमेलन सत्कोंडीत होणार; महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांची घोषणा

Gramin Varta
2 Min Read

नवऱ्याने कॅप्सूलमधून खाऊ घातले ब्लेडचे तुकडे; न्यायालयात साक्ष फिरवली तरी नवरा ठरला दोषी

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि सुरक्षेसाठी रत्नागिरी जिल्हा सज्ज; विविध उपक्रमांसह ‘१४५६७’ हेल्पलाईनचा लाभ घेण्याचे आवाहन

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यात प्राधान्य कुटुंब योजनेसाठी नोव्हेंबरचा धान्य कोटा मंजूर; १० लाखांहून अधिक लाभार्थ्यांना मिळणार लाभ

3 Min Read
रत्नागिरी

कोकण रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी; चार ट्रेनचा सुपरफास्ट दर्जा रद्द होणार, तिकीट दरात होणार कपात

3 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत मावशीच्या लिव्ह-इन पार्टनरकडून अल्पवयीन भाचीवर अत्याचार; आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?