ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि सुरक्षेसाठी रत्नागिरी जिल्हा सज्ज; विविध उपक्रमांसह ‘१४५६७’ हेल्पलाईनचा लाभ घेण्याचे आवाहन
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि सुरक्षेसाठी रत्नागिरी जिल्हा सज्ज; विविध उपक्रमांसह ‘१४५६७’ हेल्पलाईनचा लाभ घेण्याचे आवाहन
रत्नागिरी

ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि सुरक्षेसाठी रत्नागिरी जिल्हा सज्ज; विविध उपक्रमांसह ‘१४५६७’ हेल्पलाईनचा लाभ घेण्याचे आवाहन

Gramin Varta
Last updated: October 1, 2026 8:24 am
Gramin Varta
50 Views
Share

रत्नागिरी: जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्यात ज्येष्ठांच्या सन्मानार्थ, कल्याणासाठी आणि सर्वांगीण सुरक्षेसाठी समाजकल्याण विभागासह विविध यंत्रणांच्या वतीने व्यापक प्रबोधनात्मक उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. समाजातील प्रत्येक घटकामध्ये ज्येष्ठांप्रती आदराची व कृतज्ञतेची भावना रुजवण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला असून, अडचणीच्या काळात ज्येष्ठांनी शासनाच्या ‘१४५६७’ या राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांकाचा आधार घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सोनटक्के यांनी केले आहे.

नव्या पिढीला ज्येष्ठांचे महत्त्व आणि मूल्यांची ओळख व्हावी या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ‘आजोबा-आजी, शिक्षक व मुले’ (GPTM) विशेष बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. यासोबतच शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांमार्फत पदपथ व प्रभातफेऱ्या काढून सामाजिक जनजागृती केली जाणार असून, विद्यार्थ्यांना ज्येष्ठांचा आदर करण्याची सामूहिक शपथही दिली जाणार आहे.

आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीने जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने खेडशी येथील ‘माहेर संस्था’ तसेच लांजा तालुक्यातील कुर्वे येथील ‘भाकर संस्था’ संचलित वृद्धाश्रमांमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिरे राबवली जात आहेत. याशिवाय, वाढत्या सायबर फसवणुकीपासून संरक्षण मिळण्यासाठी आणि कायदेविषयक हक्कांची जाणीव करून देण्यासाठी पोलीस व विधी विभागाच्या वतीने विशेष मार्गदर्शन सत्रे घेतली जाणार आहेत. या सत्रांतून ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे हक्क आणि शासकीय कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

Total Visitors :

5468407
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

सहा महिन्यांत साडेतीन कोटींचे उत्पन्न देणारे संगमेश्वर रोड रेल्वे स्थानक चार एक्स्प्रेसच्या थांब्यांसाठी प्रतीक्षेत; रेल्वे बोर्डाच्या मंजुरीकडे प्रवाशांचे लक्ष

Gramin Varta
2 Min Read

चिपी-नवी मुंबई-चिपी हवाई प्रवासासाठी १०० टक्के व्यवहार्यता तफावत निधी देण्यास मान्यता

Gramin Varta
1 Min Read

संगमेश्वर : बुरंबीचे सुपुत्रराजेंद्र घोगळे यांची जळगाव येथे मुख्य न्यायदंडाधिकारीपदी नियुक्ती

Gramin Varta
2 Min Read

ग्रामसभेच्या आराखड्यांतून दुष्काळमुक्तीचा ध्यास; राजापूर उपविभागाची अनोखी मोहीम

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

दिवाळीसाठी रत्नागिरी विभागाकडून एसटीच्या जादा २६ फेऱ्या

3 Min Read
रत्नागिरी

पावस येथील ‘कामावर जातो’ सांगून निघालेला २८ वर्षीय तरुण बेपत्ता; अपहरणाचा संशय, अज्ञाताविरुद्ध गुन्हा

1 Min Read
रत्नागिरी

अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यात भूजल पातळी ५.२२ मीटरने घटली; राजापूर, संगमेश्वरला सर्वाधिक फटका बसल्याने भीषण पाणीटंचाईची चाहूल

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?