ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: दिवाळीसाठी रत्नागिरी विभागाकडून एसटीच्या जादा २६ फेऱ्या
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » दिवाळीसाठी रत्नागिरी विभागाकडून एसटीच्या जादा २६ फेऱ्या
रत्नागिरी

दिवाळीसाठी रत्नागिरी विभागाकडून एसटीच्या जादा २६ फेऱ्या

Gramin Varta
Last updated: November 9, 2026 8:27 am
Gramin Varta
16 Views
Share

रत्नागिरी: दिवाळीत प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन एसटीच्या रत्नागिरी विभागाने येत्या २१ नोव्हेंबरपर्यंत लांब व मध्यम पल्ल्याच्या विविध मार्गांवर दररोज २६ जादा फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

दिवाळीनिमित्त मुंबई, पुणे, सोलापूर, नाशिक, बीड, धुळे, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये जाणाऱ्या आणि तेथून कोकणात येणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड असते. ही गर्दी सुरळीत हाताळण्यासाठी नियमित फेऱ्यांबरोबरच या २६ दैनंदिन जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

या सर्व फेऱ्यांचे संगणकीय आरक्षण सुरू करण्यात आले असून प्रवाशांना बसस्थानकावरील आरक्षण खिडकीवर, अधिकृत खासगी एजंटमार्फत अथवा एसटीच्या मोबाइल ॲपवरून आगाऊ तिकीट आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

जादा फेऱ्यांचा मार्ग आणि वेळांचे नियोजन असे :

दापोली ते छत्रपती संभाजीनगर पहाटे ५.३०, परतीच्या वेळी स. ६.३०

दापोली ते परळी पहाटे ५.००, परतीच्या वेळी स. ६.३०

खेड ते चिंचवड दुपारी १३.३० परतीसाठी रात्री २२.३०)

खेड ते विरार रात्री २०.३०, परतीसाठी रात्री २०.३०

खेड ते बोरिवली दुपारी १५.००, परतीसाठी दुपारी १५.००

खेड ते बोरिवली रात्री २२.१५, परतीसाठी रात्री २२.१५

खेड ते नांदेड पहाटे ५.३०, परतीसाठी स. १०.००

खेड ते बीड संध्याकाळी १८.००, परतीसाठी दुपारी १२.३०

चिपळूण ते पुणे (ताम्हाणी मार्गे) पहाटे ५.३०, परतीसाठी दुपारी १३.००

चिपळूण ते स्वारगेट दुपारी १२.००, परतीसाठी रात्री २२.००

चिपळूण ते ठाणे स. ९.३०, परतीसाठी रात्री २१.३०

चिपळूण ते मुंबई स. ११.३०, परतीसाठी रात्री २२.३०

चिपळूण ते बोरिवली स. ९.००, परतीसाठी रात्री २०.४५

चिपळूण ते बोरिवली स. १०.३०, परतीसाठी रात्री २१.३०

देवरूख ते स्वारगेट (चिपळूण मार्गे) स. ९.३०, परतीसाठी रात्री २१.१५

देवरूख ते नाशिक (पुणे मार्गे) स. ११.००, परतीसाठी स. ८.३०

रत्नागिरी ते पंढरपूर स. ६.४५, परतीसाठी रात्री १९.३०

रत्नागिरी ते पंढरपूर सायंकाळी १९.३०, परतीसाठी स. ६.४५

रत्नागिरी ते पुणे (कोल्हापूर मार्गे) पहाटे ५.१५, परतीसाठी रात्री १९.००

रत्नागिरी ते पुणे सायंकाळी १९.००, परतीसाठी पहाटे ५.१५)

लांजा ते कोल्हापूर (रत्नागिरी मार्गे) स. १०.४५, परतीसाठी सायंकाळी १६.३०

लांजा ते धाराशिव संध्याकाळी १७.००, परतीसाठी सायंकाळी १६.००

लांजा ते बोरिवली स. ६.३०, परतीसाठी पहाटे ५.००

राजापूर – रत्नागिरी ते कोल्हापूर स. ७.४५ , परतीसाठी दुपारी १५.३०

मंडणगड ते छत्रपती संभाजीनगर (पुणे मार्गे) स. ७.४५, परतीसाठी स. ८.४५

मंडणगड ते बोरिवली दुपारी १२.००, परतीसाठी रात्री २०.३०

एसटी महामंडळाने १ ऑक्टोबर २०२६ पासून महिला प्रवाशांना तिकिटातील सवलतीचा लाभ घेण्यासाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ अनिवार्य केले होते. मात्र, सणासुदीच्या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून ही अनिवार्य अट शिथिल करण्यात आली आहे. आजपासून हा निर्णय लागू करण्यात आला असून, आता ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत महिला सवलतधारक प्रवाशांना कार्डशिवायही सवलतीचा लाभ घेता येणार आहे.

दिवाळीच्या काळात प्रवाशांची गर्दी विभागून सुरक्षित व वेळेवर प्रवास व्हावा, यासाठी प्रवाशांनी आगाऊ आरक्षण करून महामंडळाच्या या जादा फेऱ्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी रत्नागिरी विभागाचे विभाग नियंत्रक अश्वजित जानराव यांनी केले आहे.

Total Visitors :

5468405
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

चिपळूण तालुक्यातील पेढे येथून पश्चिम बंगालचा तरुण बेपत्ता; शोध घेण्याचे पोलिसांचे आवाहन

Gramin Varta
1 Min Read

गुहागरच्या असगोली समुद्रकिनाऱ्यावर परदेशी पाहुण्या ‘फ्लेमिंगो’चे मनमोहक दर्शन;वनविभागाकडून ‘ई-बर्ड’वर अधिकृत नोंद

Gramin Varta
2 Min Read

देवरूख नगरपंचायतीच्या घनकचरा प्रकल्पातील दुर्गंधीविरोधात कांजिवरावासीय आक्रमक; कचऱ्याच्या घंटागाडीसह नगरपंचायतीवर धडक

Gramin Varta
2 Min Read

लांजा:धुंदरे मावळतवाडीत ‘मिशन बंधारे’ उपक्रमांतर्गत बंधाऱ्याची उभारणी

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरी एमआयडीसीच्या पाच धरणांमध्ये मुबलक साठा; उद्योग अन् लगतच्या गावांची उन्हाळ्यातील पाण्याची चिंता मिटली

2 Min Read
रत्नागिरी

जिंदाल कामगारांची पगारवाढ, गॅस टर्मिनल स्थलांतरासाठी २ नोव्हेंबरला सामूहिक आमरण उपोषण; प्रहार संघटना, शेतकरी व मच्छीमारांचा इशारा

3 Min Read
रत्नागिरी

ऑक्टोबर हीटचा तडाखा; रत्नागिरीसह कोकणाला तीव्र उकाड्याचा ‘येलो अलर्ट’

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी: कोळंबेतील डोहात बुडून कल्याणच्या दोन क्रिकेटपटूंचा मृत्यू; क्रिकेट सामना संपल्यानंतर पोहण्याचा मोह ठरला जीवघेणा

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?