ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरी एमआयडीसीच्या पाच धरणांमध्ये मुबलक साठा; उद्योग अन् लगतच्या गावांची उन्हाळ्यातील पाण्याची चिंता मिटली
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरी एमआयडीसीच्या पाच धरणांमध्ये मुबलक साठा; उद्योग अन् लगतच्या गावांची उन्हाळ्यातील पाण्याची चिंता मिटली
रत्नागिरी

रत्नागिरी एमआयडीसीच्या पाच धरणांमध्ये मुबलक साठा; उद्योग अन् लगतच्या गावांची उन्हाळ्यातील पाण्याची चिंता मिटली

Gramin Varta
Last updated: November 9, 2026 8:38 am
Gramin Varta
38 Views
Share

रत्नागिरी  : वाढत्या उन्हाळ्याच्या तीव्रतेत पाणीसंकटाची चाहूल लागत असतानाच रत्नागिरीतील मिरजोळे आणि उद्यमनगर औद्योगिक क्षेत्रासह लगतच्या ग्रामपंचायतींसाठी अत्यंत दिलासादायक वृत्त समोर आले आहे. लांजा व रत्नागिरी तालुक्यातून वाहणाऱ्या काजळी नदीवरील पाच प्रमुख धरणांमध्ये सध्या मुबलक पाणीसाठा उपलब्ध असून आगामी मे ते जून महिन्यापर्यंत उद्योग आणि नागरिकांना पाणीटंचाईची झळ बसू नये, या दृष्टीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) प्रशासनाने चोख नियोजन आखले आहे.

काजळी नदीपात्रात एमआयडीसीच्या वतीने घाटीवळे, अंजणारी, असोडे, निवसर आणि हरचेरी या पाच ठिकाणी छोटी धरणे उभारण्यात आली आहेत. या सर्व जलप्रकल्पांची मिळून एकूण साठवण क्षमता २५.३७ लाख क्युबिक मीटर (घनमीटर) आहे. नुकत्याच झालेल्या कामांमुळे हरचेरी येथे जुन्या धरणाखाली नवीन बंधारा बांधण्यात आला असून, असोडे येथील धरणाचे कामही नव्याने पूर्ण करण्यात आले आहे. या सुधारणांमुळे परिसरातील एकूण पाणीसाठ्यात लक्षणीय भर पडली आहे. पावसाळा संपल्यानंतर वाहून जाणारे पाणी कार्यक्षमतेने अडवण्यासाठी एमआयडीसीकडून दरवर्षी या धरणांवर प्लेट आणि माती टाकून साठवण क्षमता वाढवली जाते. या वाढीव साठ्यासाठी तसेच पुढील पाच ते सहा महिने जलसाठ्याच्या देखरेखीसाठी सुरक्षारक्षक तैनात करण्याकामी प्रशासनाकडून सुमारे १७ ते १८ लाख रुपयांचा वार्षिक खर्च केला जातो.

पाच धरणांमधील एकूण २५.३७ लाख क्युबिक मीटर साठ्यापैकी मृत साठा (डेड स्टोरेज) वगळता २२.७७२ लाख क्युबिक मीटर पाणी थेट दैनंदिन व औद्योगिक वापरासाठी उपलब्ध झाले आहे. धरणनिहाय स्थिती पाहता, अंजणारी धरणामध्ये सर्वाधिक म्हणजे ७.४४ लाख क्युबिक मीटर साठा जमा आहे. त्याखालोखाल हरचेरीमध्ये ६.६६ लाख, घाटीवळेमध्ये ३.२६२ लाख, निवसरमध्ये २.७१ लाख आणि असोडे धरणामध्ये २.७ लाख क्युबिक मीटर पाणी उपलब्ध आहे. काही दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे घाटीवळे धरण पूर्णक्षमतेने भरले आहे, तर असोडे व अंजणारी धरणांतील पाणीपातळीत दरवर्षीच्या तुलनेत काहीशी घट नोंदवण्यात आली असली, तरी उपलब्ध साठ्याच्या काटेकोर व्यवस्थापनामुळे मे अखेरीपर्यंत पाणीटंचाई जाणवू दिली जाणार नाही, असा ठाम विश्वास एमआयडीसी प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Total Visitors :

5469136
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

लांजा भाजीमार्केट परिसरात सुरू असलेल्या हायटेक जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ९२ हजार ४१० रुपयांच्या मुद्देमालासह एकावर गुन्हा

Gramin Varta
2 Min Read

डीजे, फटाक्यांना फाटा देत पारंपरिक नृत्यांच्या गजरात ‘जैतापूरच्या राजा’ला भावपूर्ण निरोप; महिलांचे लेझीम अन् १० फुटी कोंबडा नृत्य ठरले मुख्य आकर्षण

Gramin Varta
3 Min Read

दापोली चॅम्पियन लीगच्या पहिल्या हंगामावर ‘आय के स्पोर्ट्स’चा कब्जा; ‘बीटीएफ स्टुडिओ’चा ३-० ने पराभव

Gramin Varta
2 Min Read

सरकारी रुग्णालयांतील औषधांची होणार गुणवत्ता तपासणी; बनावट औषध रोखण्यासाठी आठ परिमंडळांना अत्याधुनिक तपासणी उपकरणे

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील स्मशानभूमीची धूपप्रतिबंधक भिंत कोसळली

2 Min Read
रत्नागिरी

राजस्थान रॉयल्सचे रोमी भिंडर आणि आलोक चित्रे उद्या रत्नागिरीत

2 Min Read
रत्नागिरी

दुष्काळी परिस्थितीवर प्रशासन सज्ज; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवेदनशीलतेने पंचनामे करा : पालकमंत्री उदय सामंत

5 Min Read
रत्नागिरी

जयगड : दुचाकी कठड्याला धडकून दरीत कोसळली; अपघातात चालकाचा मृत्यू, दोन तरुण जखमी

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?