ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: लांजा भाजीमार्केट परिसरात सुरू असलेल्या हायटेक जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ९२ हजार ४१० रुपयांच्या मुद्देमालासह एकावर गुन्हा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » लांजा भाजीमार्केट परिसरात सुरू असलेल्या हायटेक जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ९२ हजार ४१० रुपयांच्या मुद्देमालासह एकावर गुन्हा
लांजा

लांजा भाजीमार्केट परिसरात सुरू असलेल्या हायटेक जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ९२ हजार ४१० रुपयांच्या मुद्देमालासह एकावर गुन्हा

Gramin Varta
Last updated: November 5, 2026 9:56 am
Gramin Varta
194 Views
Share

लांजा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या लांजा भाजीमार्केट परिसरातील एका गाळ्यात सुरू असलेल्या हायटेक जुगार अड्ड्यावर लांजा पोलिसांनी ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी धडक कारवाई केली. या धाडसी कारवाईत पोलिसांनी संगणकीय साहित्य, टीव्ही संच, रोकड आणि जुगाराच्या साहित्यासह एकूण ९२ हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, या प्रकरणी एका संशयिताविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. मितेश प्रकाश गावडे (वय ४०, रा. फ्लॅट नं. १०३, एलिना अपार्टमेंट, मधलीवाडी, ऑक्टेल कंपनीसमोर, मिरजोळे, ता. जि. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, मुंबई-गोवा हायवेलगत मुकुंद वडापाव स्टॉलशेजारील भाजीमार्केट भागात असलेल्या मुकुंद भिवा वाघधरे यांच्या मालकीच्या गाळ्यात शासनाची कोणतीही अधिकृत परवानगी नसताना अनधिकृतपणे जुगार अड्डा चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांना पैशांची बाजी लावून ‘फन टार्गेट’ आणि ‘लकी १२ कार्ड’ यांसारखे ऑनलाइन जुगाराचे प्रकार खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे महिला पोलीस शिपाई प्रतीक्षा नितेश राणे यांच्या पथकाने ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून दोन ३२ इंची टीव्ही, डेल आणि लेनोव्हा कंपनीचे सीपीयू, दोन इप्सॉन प्रिंटर, एचपी की-बोर्ड, माऊस, दोन बारकोड स्कॅनर, कुलर तसेच जुगाराच्या तीन पावत्या आणि ६ हजार ८१० रुपयांची रोख रक्कम असा एकूण ९२ हजार ४१० रुपयांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम ४(१)(अ), ४(१)(क) आणि १२(अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्याला भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम ३५(३) नुसार नोटीस बजावण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विलास धाकू जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Total Visitors :

5468552
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप; सलग पाच दिवस बँका बंद राहण्याची शक्यता, SBI कडून ग्राहकांना महत्त्वाची सूचना

Gramin Varta
2 Min Read

खेडमधील महाडनाका येथून प्रौढाचे गूढ अपहरण

Gramin Varta
1 Min Read

मंगळुरू एक्सप्रेसमधून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी उघड; ठाणे रेल्वे स्थानकात अटेंडंटकडून ७१ हजारांचा अवैध मद्यसाठा जप्त

Gramin Varta
2 Min Read

‘कोकणाची’ संस्कृती,परंपरा आणि मातीच्या नात्याला सुरेल मानवंदना

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

लांजा

साटवलीतील मुस्लिमवाडी, बौद्धवाडी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण!

2 Min Read
लांजा

लांजा येथील ७८ वर्षीय महिलेची ६० लाखांची सायबर फसवणूक; पोलीस अधिकारी असल्याचे भासवून अटकेची धमकी

2 Min Read
लांजा

लांजातील मरयंबी मुकादम यांची ११६ व्या वर्षी प्राणज्योत मालवली

1 Min Read
लांजा

लांजा येथे सेवा संकल्प अभियानातून नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?