ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मंगळुरू एक्सप्रेसमधून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी उघड; ठाणे रेल्वे स्थानकात अटेंडंटकडून ७१ हजारांचा अवैध मद्यसाठा जप्त
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Saturday, Sep 26, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मंगळुरू एक्सप्रेसमधून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी उघड; ठाणे रेल्वे स्थानकात अटेंडंटकडून ७१ हजारांचा अवैध मद्यसाठा जप्त
कोकण

मंगळुरू एक्सप्रेसमधून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी उघड; ठाणे रेल्वे स्थानकात अटेंडंटकडून ७१ हजारांचा अवैध मद्यसाठा जप्त

Gramin Varta
Last updated: September 26, 2026 7:58 am
Gramin Varta
19 Views
Share

ठाणे: परराज्यातून रेल्वेमार्गे होणाऱ्या अवैध मद्यतस्करीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी मोठी कारवाई करत मंगळुरू एक्सप्रेसमधून उतरलेल्या एका रेल्वे अटेंडंटला रंगेहाथ बेड्या ठोकल्या. ठाणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ८ वर रचलेल्या सापळ्यात आरोपी शिवम छनबस मठपती याच्याकडून ७१ हजार ५६० रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या नामांकित विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला. प्रवाशांच्या सेवेसाठी मिळालेल्या पदाचा गैरवापर करून स्वतःच्या मोठ्या बॅगांमधून ही बेकायदा वाहतूक करणाऱ्या या आरोपीला न्यायालयाने एक दिवसाची उत्पादन शुल्क कोठडी सुनावली आहे.

मंगळुरू एक्सप्रेसमधून गोव्यातील विदेशी दारूची मोठी खेप ठाण्यात उतरवली जाणार असल्याची गुप्त माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या गस्ती पथकाला मिळाली होती. त्यानुसार गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरू एक्सप्रेस दुपारी सव्वा बाराच्या सुमारास फलाटावर येताच, दोन संशयास्पद मोठ्या बॅगा घेऊन उतरणाऱ्या इसमाला अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. चौकशीअंती तो रेल्वे अटेंडंट असल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्या बॅगांची झडती घेतली असता, केवळ गोव्यात विक्रीसाठी परवानगी असलेल्या महागड्या विदेशी मद्याच्या बाटल्यांचा मोठा साठा आढळून आला.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, कोकण विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार आणि ठाणे अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक तथा निरीक्षक आनंद पवार यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली. आरोपीविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा अवैध साठा गोव्यातून नेमका कोठून भरण्यात आला, ठाण्यात तो कोणाला पुरवला जाणार होता आणि यामागे मोठे आंतरराज्यीय रॅकेट कार्यरत आहे का, या दिशेने तपास यंत्रणेने सखोल चौकशी सुरू केली आहे.

Total Visitors :

5428564
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

देवरुख : रानगव्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या स्वप्नील पेडामकरच्या कुटुंबाला वनविभागाची १० लाखांची मदत

Gramin Varta
2 Min Read

राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये ३ ते १३ ऑक्टोबरदरम्यान मराठी साहित्य संमेलन- मराठी भाषा मंत्री उदय सामंत

Gramin Varta
3 Min Read

‘दिशा सालियनला कधीही भेटलो नाही, खोट्या प्रचाराने झुकणार नाही’; सीबीआयच्या एफआयरनंतर आदित्य ठाकरेंचे विरोधकांना सडेतोड उत्तर

Gramin Varta
3 Min Read

शिपाई पदाची भरती प्रक्रिया रखडली; अंतिम मुदतीनंतर ६८ दिवस उलटूनही नियुक्ती नाही

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

कोकण

देशातील पहिल्या ‘स्पेस पार्क’साठी माचाळ,माथेरानची पाहणी; १८ महिन्यांत ५ उपग्रह सोडण्याचा राज्याचा मानस : उद्योगमंत्री उदय सामंत

3 Min Read
कोकण

रायगड- भरधाव वाहनाच्या धडकेत वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू

1 Min Read
कोकण

कोकणातल्या ‘या’ गावात माणसांसाठी नव्हे तर चक्क गिधाडांसाठी गेल्या २४ वर्षांपासून डीजेला बंदी

3 Min Read
कोकण

कोकणच्या किनारपट्टी विकासाला राज्य सरकारचे बळ; बंदरे आणि पोहोच रस्त्यांसाठी १७० कोटींचा निधी मंजूर, सागरी वाहतूक गतिमान होणार

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?