ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मुंबई-गोवा महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; महाडजवळ दीड कोटींची गोवा बनावटीची व्हिस्की जप्त, ट्रकसह चालकाला बेड्या
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मुंबई-गोवा महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; महाडजवळ दीड कोटींची गोवा बनावटीची व्हिस्की जप्त, ट्रकसह चालकाला बेड्या
कोकण

मुंबई-गोवा महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; महाडजवळ दीड कोटींची गोवा बनावटीची व्हिस्की जप्त, ट्रकसह चालकाला बेड्या

Gramin Varta
Last updated: September 22, 2026 8:24 am
Gramin Varta
51 Views
Share

महाड/रायगड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून ट्रकमधून छुप्या मार्गाने केली जाणारी गोवा बनावटीच्या दारूची कोट्यवधी रुपयांची आंतरराज्य तस्करी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सतर्क पथकाने महाडजवळ उघडकीस आणली आहे. केंबुर्ली गावच्या हद्दीत मध्यरात्री रचलेल्या सापळ्यात सुमारे १ कोटी ५० लाख रुपये किमतीचा ‘रॉयल ब्लू व्हिस्की’ या मद्याचा भलामोठा साठा जप्त करण्यात आला असून, दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक ताब्यात घेत चालकाला जागेवरच अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोव्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या एका संशयित ट्रकमधून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर विदेशी मद्याची तस्करी होणार असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांच्या पथकाने महाड तालुक्यातील केंबुर्ली गावच्या हद्दीत महामार्गावर चोख नाकेबंदी करत सापळा लावला. मिळालेल्या वर्णनाचा ट्रक महाड परिसरात येताच पथकाने त्याला अडवून चौकशी केली असता, सुरुवातीला चालकाने पोलिसांना उडवाउडवीची आणि दिशाभूल करणारी उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने संशय बळावल्याने ट्रकची कसून तपासणी केली असता, त्यात शिताफीने लपवून ठेवलेले गोवा बनावटीच्या दारूचे शेकडो बॉक्स पाहून अधिकाऱ्यांचे डोळे पांढरे झाले.

या कारवाईदरम्यान उत्पादन शुल्क विभागाने सुमारे दीड कोटी रुपयांचे ‘रॉयल ब्लू व्हिस्की’चे बॉक्स आणि तस्करीसाठी वापरलेला ट्रक असा एकूण मुद्देमाल हस्तगत केला आहे. घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आलेल्या ट्रकचालकाची कसून चौकशी सुरू असून, गोव्यातून निघालेला हा मद्यसाठा मुंबईत नेमका कोणाला पोहोचवला जाणार होता आणि या मोठ्या आंतरराज्य रॅकेटमागे नेमके कोण सूत्रधार आहेत, याचा सखोल तपास अधिकारी करत आहेत. भर महामार्गावर केलेल्या या धाडसी कारवाईमुळे रायगडसह कोकणातील दारू तस्कर व माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

शहरात वाढलेल्या एका Gen Z तरुणाच्या नजरेतून गाव, माणसं आणि ‘घर’ शोधणाऱ्या ‘मॅगझिन’चा टीझर प्रदर्शित

Gramin Varta
3 Min Read

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या तपासाची धुरा ‘गोल्ड मेडलिस्ट’ सीमा पाहूजा यांच्याकडे; सीबीआयकडून जुन्या कागदपत्रांची नव्याने झाडाझडती सुरू

Gramin Varta
3 Min Read

११,५०० फुटांवर रत्नागिरीचा झेंडा; अभिजित पड्याळ यांची लडाख मॅरेथॉन ५ तास २२ मिनिटांत पूर्ण

Gramin Varta
2 Min Read

चिपळूण : खेर्डी एमआयडीसीतील फर्निचर कारखान्याला भीषण आग; लाखोंचे नुकसान

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

कोकण

किल्ले रायगड रोपवे सेवा तात्पुरती ठप्प; प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त

2 Min Read
कोकण

देशातील पहिल्या ‘स्पेस पार्क’साठी माचाळ,माथेरानची पाहणी; १८ महिन्यांत ५ उपग्रह सोडण्याचा राज्याचा मानस : उद्योगमंत्री उदय सामंत

3 Min Read
कोकण

मुंबई-गोवा महामार्ग १७ वर्षांनंतरही रखडलेलाच; खर्च ५,५०० कोटींनी वाढून १६,९०९ कोटींवर

4 Min Read
कोकण

कोकणातल्या ‘या’ गावात माणसांसाठी नव्हे तर चक्क गिधाडांसाठी गेल्या २४ वर्षांपासून डीजेला बंदी

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?