ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरी: शिरगावात अज्ञात चारचाकीच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी; धडक देऊन चालक पसार
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरी: शिरगावात अज्ञात चारचाकीच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी; धडक देऊन चालक पसार
रत्नागिरी

रत्नागिरी: शिरगावात अज्ञात चारचाकीच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी; धडक देऊन चालक पसार

Gramin Varta
Last updated: October 11, 2026 2:49 pm
Gramin Varta
176 Views
Share

रत्नागिरी : रत्नागिरी ते साखरतर मार्गावर शिरगाव गडगेवाडी परिसरात रस्त्याच्या कडेने पायी चालणाऱ्या एका ५२ वर्षीय व्यक्तीला भरधाव चारचाकी वाहनाने समोरासमोर जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला असून, धडक दिल्यानंतर चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र मोहन नागवेकर (वय ५२, रा. शिरगाव गडगेवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ६ ऑक्टोबर रोजी रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास रवींद्र नागवेकर हे शिरगाव गडगेवाडी बसस्थानक ते श्रद्धा पेट्रोल पंपाच्या दिशेने रस्त्याच्या कडेने पायी चालत जात होते. त्यावेळी रत्नागिरीहून साखरतरच्या दिशेने जाणाऱ्या एका चारचाकी वाहनाच्या (क्रमांक एम.एच. ०८ – २७६९, उर्वरित पूर्ण क्रमांक अज्ञात) चालकाने रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता वाहन भरधाव, अविचाराने आणि निष्काळजीपणे चालवले. सदर वाहनाने रस्त्यावरून चालणाऱ्या नागवेकर यांना जोरदार धडक दिली. या धडकेमुळे नागवेकर रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांच्या डोक्याला, पायाला तसेच शरीरावर इतर ठिकाणी गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या. अपघातानंतर जखमीला वैद्यकीय उपचारासाठी मदत करण्याऐवजी चालक गाडी न थांबवता घटनास्थळावरून भरधाव वेगाने पसार झाला.

या घटनेनंतर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल आशिष अशोक भालेकर (वय ४०, ब.नं. १११२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४(ब)/१७७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या संबंधित वाहनाचा आणि चालकाचा शोध पोलीस घेत असून, अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.

Total Visitors :

5468408
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

माकडांच्या वाढत्या उपद्रवावर बंदोबस्तासाठी ग्रामस्थांच्या पुढाकाराने वनविभागाकडून पिंजरा दाखल

Gramin Varta
1 Min Read

मनोज जरांगेंनी ५०० कोटींचा आरोप सिद्ध करून दाखवावा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आव्हान

Gramin Varta
2 Min Read

पोलीस आदेश धाब्यावर बसवून चिपळूण पोलीस ठाण्यासमोर निदर्शने व शांतता भंग; महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या पदाधिकाऱ्यांसह ३० जणांवर गुन्हा

Gramin Varta
2 Min Read

अभ्यासाची स्वप्ने डोळ्यांत घेऊन निघाली, अन् वाटेतच डंपरखाली चिरडून १९ वर्षीय मुस्कानचा दुर्दैवी अंत

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

मालगुंडच्या केशवसुत स्मारकात कोमसापच्या १८ व्या मध्यवर्ती साहित्य संमेलनाची उद्या विशेष नियोजन सभा; लोगो व ध्वजाचे होणार अनावरण

2 Min Read
रत्नागिरी

इस्रोनंतर आता थेट ‘नासा’ची भरारी; मालगुंड शाळेच्या आर्या शिगवणचा १२ नोव्हेंबरपासून अमेरिका दौरा

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत एसटीच्या ताफ्यात १०४ नव्या बसेस दाखल; दोन महिन्यांत ४७ ‘ई-शिवाई’ धावणार : पालकमंत्री डॉ. उदय सामंत

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी : ८,८९० विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षा शुल्क शिक्षण विभाग भरणार, पालकांना २१ लाखांचा आर्थिक दिलासा

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?