ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: पोलीस आदेश धाब्यावर बसवून चिपळूण पोलीस ठाण्यासमोर निदर्शने व शांतता भंग; महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या पदाधिकाऱ्यांसह ३० जणांवर गुन्हा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » पोलीस आदेश धाब्यावर बसवून चिपळूण पोलीस ठाण्यासमोर निदर्शने व शांतता भंग; महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या पदाधिकाऱ्यांसह ३० जणांवर गुन्हा
चिपळूण

पोलीस आदेश धाब्यावर बसवून चिपळूण पोलीस ठाण्यासमोर निदर्शने व शांतता भंग; महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या पदाधिकाऱ्यांसह ३० जणांवर गुन्हा

Gramin Varta
Last updated: October 30, 2026 2:41 pm
Gramin Varta
140 Views
Share

चिपळूण: पोलीस प्रशासनाने दिलेल्या कायदेशीर आदेश व नोटीसचे उल्लंघन करून चिपळूण पोलीस ठाण्याच्या गेट क्रमांक २ जवळ मुख्य रस्त्यालगत विनापरवानगी बेकायदेशीर जमाव जमवून घोषणाबाजी करत शांतता भंग केल्याप्रकरणी महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सुमारे २५ ते ३० जणांविरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल संकेत विजय गुरव (ब. नं. ५१५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी पावणेबारा ते पावणेएक वाजण्याच्या सुमारास आरोपी अनिकेत साळवी (वय ३४, रा. खेर्डी, चिपळूण), मुजफ्फर ऊर्फ राजेश मुल्लाजी (वय ४२, रा. सावर्डे, उत्तर जिल्हाध्यक्ष), ॲड. प्रसाद करंदीकर (वय ४०, अध्यक्ष, महाराष्ट्र लोकाधिकार समिती), योगेश भारत वाघमारे (वय ४६, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र लोकाधिकार समिती), अनंत शिंदे (वय ३६, रा. अलोरे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष) यांच्यासह सुमारे २५ ते ३० लोकांनी समान उद्देशाने एकत्र येत महाराष्ट्र लोकाधिकार समिती नावाचे फलक लावून आंदोलन छेडले.

पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश व रीतसर नोटीस बजावली असतानाही त्याचे थेट उल्लंघन करत आंदोलकांनी चिपळूण पोलीस ठाण्याच्या डाव्या बाजूकडील गेट क्रमांक २ च्या मुख्य रस्त्यालगत बेकायदेशीरपणे धरणे निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी पोलिसांविरोधात मोठमोठ्याने निषेध घोषणा देत सार्वजनिक शांततेचा भंग केला. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी २९ ऑक्टोबर रोजी रात्री पावणेआठच्या सुमारास संबंधितांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २२३, १८९, १९० सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११०/११७ व ११२/११७ अन्वये गुन्हा नोंद क्रमांक ३४५/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Total Visitors :

5468411
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरीतील बेपत्ता व्यापारी सज्जन ऊर्फ ‘पापा ओसवाल’ कोलकात्यात सुखरूप; एटीएम व्यवहारावरून ट्रेस झाले लोकेशन

Gramin Varta
1 Min Read

लोटे एमआयडीसीतील एम.आर. स्पेशालिटी केमिकल्स कंपनीत भीषण आग; लाखो रुपयांची वित्तहानी, वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांमुळे नागरिकांत संताप

Gramin Varta
1 Min Read

पाली येथे भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; पत्नी गंभीर जखमी

Gramin Varta
2 Min Read

वैशाली हेगिष्टे हत्या प्रकरणासह जुन्या संशयास्पद मृत्यू व चोऱ्यांची सखोल चौकशी करा; वेरवली खुर्दच्या ग्रामस्थांचे लांजा पोलिसांना निवेदन

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

चिपळूण

कोयनेचे समुद्रात वाहून जाणारे पाणी कोकणासह दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला द्या; माजी खासदार हुसेन दलवाईंची मागणी

1 Min Read
चिपळूण

नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या राजकीय नेत्यांना दिवाळीनिमित्त सदिच्छा भेटी; भास्कर जाधवांसोबत फराळाचा आनंद

1 Min Read
चिपळूण

दुष्काळावर मात करण्यासाठी पालवण ग्रामपंचायतीचा आदर्श उपक्रम; जलजीवन मिशनसह ‘मिशन बंधारा २०२६’ मोहिमेला गती

2 Min Read
चिपळूण

चिपळूण: पोट फुगून अचानक प्रकृती बिघडली; चिमुकलीचा रुग्णालयात मृत्यू

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?