गुहागर : चिपळूण तालुक्यातील नांदगाव येथील अवघ्या काही महिन्यांच्या बालिकेची प्रकृती अचानक बिघडल्याने तिला उपचारासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले. या घटनेची नोंद गुहागर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
निर्वी निलेश भुवड या बालिकेला पोटात गॅसचा त्रास होत असल्याने चिपळूण येथील डॉक्टरांकडे उपचारासाठी नेण्यात आले होते. त्यानंतर आई-वडील तिला तळवली आगरवाडी, ता. गुहागर येथील आजोळी घेऊन गेले होते.
तेथे रात्रीच्या सुमारास अचानक तिचे पोट फुगले आणि ती रडू लागली. तिची प्रकृती पाहता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कुटुंबीयांनी तिला तातडीने कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
मात्र १७ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे सुमारे १.३० वाजता कामथे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निर्वी हिची तपासणी करून तिला मृत घोषित केले.
निर्वीचे वडील निलेश यशवंत भुवड यांनी दिलेल्या माहितीवरून, चिपळूण पोलिसांकडून प्राप्त झालेल्या कागदपत्रांच्या आधारे गुहागर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक ४०/२०२६, बी.एन.एस.एस. कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.
चिपळूण: पोट फुगून अचानक प्रकृती बिघडली; चिमुकलीचा रुग्णालयात मृत्यू
Leave a Comment





