ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: खेड एसटी स्थानकातील अस्वच्छतेविरोधात भाजपा आक्रमक; ‘चिंपाट व टमरेल’ आंदोलनानंतर ॲड. वैभव खेडेकर यांचा प्रशासनाला चार दिवसांचा अल्टिमेटम
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » खेड एसटी स्थानकातील अस्वच्छतेविरोधात भाजपा आक्रमक; ‘चिंपाट व टमरेल’ आंदोलनानंतर ॲड. वैभव खेडेकर यांचा प्रशासनाला चार दिवसांचा अल्टिमेटम
खेड

खेड एसटी स्थानकातील अस्वच्छतेविरोधात भाजपा आक्रमक; ‘चिंपाट व टमरेल’ आंदोलनानंतर ॲड. वैभव खेडेकर यांचा प्रशासनाला चार दिवसांचा अल्टिमेटम

Gramin Varta
Last updated: October 27, 2026 2:28 pm
Gramin Varta
226 Views
Share

खेड : तालुक्यातील अत्यंत वर्दळीचे केंद्र मानल्या जाणाऱ्या खेड एसटी स्थानकातील शौचालयांमध्ये निर्माण झालेली कमालीची अस्वच्छता आणि असह्य दुर्गंधी याविरोधात भारतीय जनता पार्टीने आक्रमक पवित्रा घेत ‘चिंपाट व टमरेल’ आंदोलन छेडले. दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असणाऱ्या या प्रमुख आगारात प्रवाशांना प्राथमिक व मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी एसटी महामंडळाच्या ढिसाळ कारभारावर जोरदार ताशेरे ओढले. सार्वजनिक ठिकाणी प्रवाशांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण पुरवणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असतानाही त्याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे, ही बाब आंदोलनाच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणण्यात आली.

यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करताना भाजपा नेते तथा माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांनी आगार प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. शौचालयांची तातडीने युद्धपातळीवर स्वच्छता करावी, दुर्गंधी कायमस्वरूपी नष्ट करावी आणि प्रवाशांच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली थांबवावी, अशी ठाम मागणी त्यांनी लावून धरली. तसेच या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एसटी प्रशासनाला चार दिवसांची स्पष्ट मुदत देण्यात आली असून या निर्धारित कालावधीत स्वच्छतेचा प्रश्न निकाली न निघाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा थेट इशारा ॲड. खेडेकर यांनी दिला.

या जनआक्रोशाच्या वेळी भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, ट्रान्सपोर्ट सेल तालुकाध्यक्ष सुयश खेडेकर, रिक्षा सेल तालुकाध्यक्ष राजन खेडेकर, रिक्षा युनिट उपतालुकाध्यक्ष संदीप शेंडगे व तुषार पवार, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विशाल होळकर, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्षा उर्मिला शेट्ये-पाटणे, महिला मोर्चा शहराध्यक्षा आशा सनगरे, शहर उपाध्यक्ष प्रीती चिखले, शहर चिटणीस आर्या कारेकर, शक्तीकेंद्र प्रमुख वैजेश सागवेकर, शहर सरचिटणीस विजय गुप्ता, शहर चिटणीस अमित खेडेकर व अनिकेत पवार, नंदू शिर्के, तळे-सोंडे विभाग बूथ अध्यक्ष दत्तात्रय मोरे, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, ओवैस चौगुले, अक्षय सनगरे, बाळु वर्मा आणि प्रदीप भोसले यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Visitors :

5469526
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

ब्रेकिंग: रत्नागिरीत सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचा चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न

Gramin Varta
3 Min Read

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी गुवाहाटीत तरुणाला अटक

Gramin Varta
1 Min Read

विधानपरिषद निकालानंतर महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर; भाजप आणि शिंदेसेनेच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक फैरी

Gramin Varta
2 Min Read

हर्दखळे ग्रामपंचायतीतील कथित गैरप्रकारांवरून लांजा BDO संशयाच्या भोवऱ्यात; किरण चव्हाण यांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना थेट जाब

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

खेड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या जनसेवेनिमित्त खेडमध्ये ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न

2 Min Read
खेड

खेडच्या चंदुलाल शेट प्रशालेत ‘विकसित भारत’ चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद; कलेच्या माध्यमातून राष्ट्रभक्तीचे दर्शन

1 Min Read
खेड

खेडमध्ये महाडनाक्यावरील ‘स्मार्ट बाजारा’ला मध्यरात्री भीषण आग; भाजीपाला खाक, अग्निशमन दलाच्या तत्परतेने टळला मोठा अनर्थ

1 Min Read
खेड

खेड शहरात मोकाट श्वानांचा वाढता उच्छाद; निर्बीजीकरण मोहीम कागदावरच असल्याने नागरिकांची सुरक्षा धोक्यात

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?