ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ब्रेकिंग: रत्नागिरीत सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचा चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Sunday, Oct 4, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ब्रेकिंग: रत्नागिरीत सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचा चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न
रत्नागिरी

ब्रेकिंग: रत्नागिरीत सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचा चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न

Gramin Varta
Last updated: September 27, 2026 7:56 pm
Gramin Varta
3.9k Views
Share

पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा

रत्नागिरी : सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून ३२ वर्षीय विवाहितेने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी शहरातील राजीवडा परिसरात घडली. या घटनेत विवाहिता गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशना इम्रान सुवर्णदुर्गकर (वय ३२, रा. राजीवडा, रत्नागिरी) असे गंभीर जखमी झालेल्या विवाहितेचे नाव आहे. पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, एप्रिल २०२६ ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आशना यांना सासरच्या मंडळींकडून सातत्याने शारीरिक व मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे. ‘तू फुकट आली आहेस, माहेरून फ्लॅट घेण्यासाठी पैसे आण, अन्यथा आमच्या मुलाचा दुसरा विवाह करून देऊ,’ अशा प्रकारचे टोमणे मारून त्यांचा छळ केला जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारीनुसार, घराबाहेर जाताना आशना यांच्या पर्सची तपासणी करणे, त्यांना किंवा त्यांच्या मुलांना कौटुंबिक कार्यक्रमांसाठी बाहेर जाऊ न देणे, तसेच त्यांना घरातील एका खोलीत कोंडून ठेवणे, असे प्रकारही करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यांच्या दोन्ही लहान मुलांना स्वतःकडे ठेवून आशना यांना एकटीलाच माहेरी पाठवून दिले जात असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. गेल्या आठ दिवसांपासून त्या आपल्या मुलांची मागणी करत होत्या; मात्र त्यांना मुले देण्यास नकार दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या कथित त्रासाला कंटाळून २६ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे ३ वाजता आशना यांनी आपला मोबाईल घरातच ठेवून राजीवडा येथील घर सोडले. त्यानंतर सायंकाळी सुमारे ७.३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी अलहमपार्क, मांडवी, रत्नागिरी येथील अपार्टमेंटच्या ‘आय’ विंगमधील चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारली. या घटनेत त्यांच्या उजव्या हाताला, उजव्या पायाला तसेच शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली.

घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी चिंतामणी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी आशना यांच्या तक्रारीवरून पती इम्रान खलील सुवर्णदुर्गकर, सासरे खलील सुवर्णदुर्गकर, सासू नसिरो सुवर्णदुर्गकर तसेच आत्या सरवरी सुवर्णदुर्गकर आणि परवीन मुनाब सुवर्णदुर्गकर (सर्व रा. राजीवडा, रत्नागिरी) यांच्याविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदेश वसंत चव्हाण करीत आहेत.

Total Visitors :

5435573
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

१९ जिल्ह्यांत पाऊस लांबल्याने राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर; पंचनाम्यांपूर्वीच बळीराजा हवालदिल

Gramin Varta
2 Min Read

खेडमध्ये १७ सार्वजनिक तर १ हजार ५३० घरगुती गणपतींचे शिस्तबद्ध वातावरणात विसर्जन

Gramin Varta
2 Min Read

देवरूख पंचायत समितीचे लिपिक रोहित राजापूरकर यांचे निधन

Gramin Varta
1 Min Read

खेड: कळंबणी बुद्रुक येथे बंद घराची खिडकी फोडून घरफोडी; टीव्हीसह स्वयंपाकाची भांडी पळवली

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरी: बोटीवर स्वयंपाक करताना गॅसचा भडका; गंभीर भाजलेल्या खलाशाचा उपचारादरम्यान मृत्यू

1 Min Read
रत्नागिरी

आंतरराष्ट्रीय परिषद व केंद्रीय संमेलनाच्या नियोजनासाठी मालगुंड ‘कोमसाप’ची उद्या विशेष सभा

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ ठरतेय वरदान

2 Min Read
रत्नागिरी

‘स्कील इज फ्युचर’; तंत्रज्ञानाच्या युगात युवकांनी कौशल्ये सातत्याने अपग्रेड करावीत: जिल्हाधिकारी मनुज जिंदल

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?