ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: १९ जिल्ह्यांत पाऊस लांबल्याने राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर; पंचनाम्यांपूर्वीच बळीराजा हवालदिल
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » १९ जिल्ह्यांत पाऊस लांबल्याने राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर; पंचनाम्यांपूर्वीच बळीराजा हवालदिल
महाराष्ट्र

१९ जिल्ह्यांत पाऊस लांबल्याने राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर; पंचनाम्यांपूर्वीच बळीराजा हवालदिल

Gramin Varta
Last updated: September 16, 2026 9:20 am
Gramin Varta
21 Views
Share

मुंबई : राज्यातील तब्बल १९ जिल्ह्यांमधील ८३ तालुक्यांत पावसाने सलग २० दिवसांपेक्षा अधिक काळ दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके पूर्णपणे संकटात सापडली आहेत. अनेक पट्टे दुष्काळाच्या उंबरठ्यावर पोहोचल्याची वस्तुस्थिती समोर आल्यानंतर मंगळवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपस्थित मंत्र्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. बैठकीत शेतकऱ्यांच्या मदतीबाबत तात्काळ कोणताही ठोस निर्णय झाला नसला, तरी संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने सतर्क राहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. एनडीआरएफच्या प्रचलित निकषांनुसार पिकांच्या नुकसानीचे अधिकृत पंचनामे ५ ऑक्टोबरनंतरच करावे लागतात, त्यापूर्वी केलेल्या पंचनाम्यांच्या आधारे नियमानुसार मदत पात्र ठरत नाही. त्यामुळे आताच पंचनामे करण्याची घाई केली तर नुकसानीचा नेमका आकडा समोर येणार नाही आणि प्रत्यक्ष मदतीबाबत स्पष्टता राहणार नाही, असे स्पष्ट करत शेतकऱ्यांच्या साहाय्यासाठी आवश्यक उपाययोजनांची यादी तयार करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

दुसरीकडे पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्यामुळे मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. मराठवाड्यात बीडमधील ३७.२१ टक्के, जालन्यातील २७.८३ टक्के तर छत्रपती संभाजीनगरमधील ७.०६ टक्के पेरणी क्षेत्र बाधित झाले असून लातूर, धाराशिव आणि परभणी परिसरात हलक्या जमिनीवरील सोयाबीन, मूग, उडीद व कापूस सुकू लागला आहे, त्यातच सोयाबीनवर पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिममध्ये दोन ते तीन आठवड्यांच्या खंडामुळे सोयाबीन कोमेजले असून केवळ सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी पिकांना संरक्षक सिंचनाचा आधार दिला आहे; तसेच नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोलीत पावसाअभावी भात लागवड लांबली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, सांगली व अहिल्यानगरच्या कोरडवाहू पट्ट्यात मूग, उडीद, सोयाबीन, मका आणि बाजरीला तीव्र पाण्याचा ताण बसल्याने उत्पादनात २० ते २५ टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि नंदुरबारमध्ये मका व कापसाची वाढ खुंटली असली, तरी धुळे आणि जळगावमध्ये झालेल्या पावसामुळे पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे; मात्र जळगावातील केळी बागांना फटका बसला आहे. कोकणात भाताची स्थिती बऱ्यापैकी समाधानकारक असली तरी सावंतवाडी-वसई परिसरात पावसाची गरज असून काही ठिकाणी नाचणीवर शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव झाल्याने चिंतेचे सावट पसरले आहे.

Total Visitors :

5427497
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दिव्यांगत्वावर मात करत गरुडाच्या वेशात गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग

Gramin Varta
3 Min Read

रत्नागिरी पोलिसांच्या ‘मिशन प्रबोधन’ अंतर्गत खरवते येथे सायबर गुन्हेगारी व सुरक्षिततेबाबत जनजागृती

Gramin Varta
1 Min Read

भारताचा जपानवर ८ विकेट्सनी दणदणीत विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश

Gramin Varta
2 Min Read

‘दुःखी कसं राहायचं?’ केतनच्या मृत्यूनंतर सियाचा ChatGPTला सवाल; चार्जशीटमधील उल्लेखाने खळबळ

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

गोव्यातील आलिशान व्हिलामधून चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश; ४०० कोटींच्या फसवणूक प्रकरणात सात जणांना अटक

2 Min Read
महाराष्ट्र

गोकुळच्या ४९२ दूध संस्थांचे सभासदत्व रद्द करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

2 Min Read
महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणात ७० वर्षीय नराधमाला फाशीची शिक्षा

2 Min Read
महाराष्ट्र

यूपीआयच्या शुल्करचनेमुळे डिजिटल व्यवहारांना ब्रेक; ग्राहक आणि व्यापाऱ्यांचा पुन्हा रोखीकडे कल

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?