ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: सतेज पाटलांच्या नेतृत्वाचा झंझावात! ‘गोकुळ’ दूध संघ निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे ऐतिहासिक वर्चस्व; महायुतीला जोरदार धक्का
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » सतेज पाटलांच्या नेतृत्वाचा झंझावात! ‘गोकुळ’ दूध संघ निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे ऐतिहासिक वर्चस्व; महायुतीला जोरदार धक्का
महाराष्ट्र

सतेज पाटलांच्या नेतृत्वाचा झंझावात! ‘गोकुळ’ दूध संघ निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे ऐतिहासिक वर्चस्व; महायुतीला जोरदार धक्का

Gramin Varta
Last updated: October 19, 2026 6:34 pm
Gramin Varta
296 Views
Share

कोल्हापूर: संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या ‘गोकुळ’ दूध संघाच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील ‘राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी’ने ऐतिहासिक आणि देदिप्यमान विजय संपादन केला आहे. सतेज पाटील यांच्या कुशल राजकीय रणनीती आणि नेतृत्वाच्या जोरावर या पॅनलने तब्बल १४ जागांवर दणदणीत विजय खेचून आणत ‘गोकुळ’वरील आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे, तर सत्ताधारी महायुतीच्या पॅनलला केवळ ११ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये महायुतीने सर्वसाधारण गटात आघाडी घेत चुरस निर्माण केली होती, मात्र जसजशा मतमोजणीच्या पुढील फेऱ्या पुढे सरकल्या, तसतसा सतेज पाटील यांच्या आघाडीने जोरदार मुसंडी मारली. या निवडणुकीत महायुतीला मोठा हादरा बसला असून, सुरुवातीला आघाडीवर राहिलेल्या शौमिका महाडिक यांच्यासह माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, विश्वास पाटील आणि नाविद मुश्रीफ या दिग्गज उमेदवारांना पराभवाची धूळ चाखावी लागली. दिग्गजांच्या पराभवाने महायुतीची गणिते पूर्णपणे कोलमडली असून सतेज पाटील यांच्या आघाडीने एकहाती सत्ता काबीज केली आहे.

निकालाचे चित्र स्पष्ट होताच कोल्हापुरातील सतेज पाटील यांच्या ‘अजिंक्यतारा’ या निवासस्थानी आणि पक्ष कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत प्रचंड जल्लोष साजरा केला. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि सतेज पाटलांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला. या ऐतिहासिक विजयानंतर सतेज पाटील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असून, दोन्ही बाजूंनी अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या लढतीतील सतेज पाटील यांच्या दिमाखदार यशाचे राजकीय वर्तुळातून आणि सहकार क्षेत्रातून प्रचंड कौतुक होत आहे.

Total Visitors :

5468407
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

स्वच्छ सर्वेक्षणात रत्नागिरी पालिकेचा राज्यात चौथा क्रमांक

Gramin Varta
1 Min Read

रत्नागिरी-सिंधुदुर्गात ९,५०० कोटींचा ग्रीन स्टील प्रकल्प; ४ हजार रोजगारांची निर्मिती

Gramin Varta
3 Min Read

आमदार किरण सामंत यांच्या इशाऱ्यानंतर अखेर आंबा घाट घटस्थापनेच्या मुहूर्तावर अवजड वाहतुकीसाठी खुला

Gramin Varta
1 Min Read

आरोग्य शिबिरांसह वृक्षारोपणाने उद्यापासून रत्नागिरीत ‘सेवा संकल्प अभियाना’ला सुरुवात

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

पुण्यातील एमपीएससी आंदोलनाप्रकरणी १५ जणांसह इतरांविरोधात गुन्हा दाखल

1 Min Read
महाराष्ट्र

दुष्काळाचं संकट विचित्र; योजना, विकास प्रकल्पांचा निधी दुष्काळासाठी वापरावा – उद्धव ठाकरे

4 Min Read
महाराष्ट्र

येत्या दोन दिवसांत दुष्काळाबाबतचा शासन निर्णय; निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री

5 Min Read
महाराष्ट्र

‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’मधील सुबोध भावे यांच्या राजकीय व्यक्तिरेखेचा लूक चर्चेत

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?