ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: आमदार किरण सामंत यांच्या इशाऱ्यानंतर अखेर आंबा घाट घटस्थापनेच्या मुहूर्तावर अवजड वाहतुकीसाठी खुला
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » आमदार किरण सामंत यांच्या इशाऱ्यानंतर अखेर आंबा घाट घटस्थापनेच्या मुहूर्तावर अवजड वाहतुकीसाठी खुला
संगमेश्वर

आमदार किरण सामंत यांच्या इशाऱ्यानंतर अखेर आंबा घाट घटस्थापनेच्या मुहूर्तावर अवजड वाहतुकीसाठी खुला

Gramin Varta
Last updated: October 12, 2026 7:26 am
Gramin Varta
42 Views
Share

साखरपा: रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा आंबा घाट घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर अखेर जड वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पावसाळ्यातील अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे घाटातील रस्ता खचून एक बाजू कोसळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने गेले अनेक महिने येथील अवजड वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली होती. याचा मोठा फटका स्थानिक व्यापारी वर्गाला बसत असल्याने जनजीवन आणि व्यापार विस्कळीत झाले होते. साखरपा येथे आयोजित नागरिकांच्या समस्या निवारण सभेत स्थानिक आमदार किरण सामंत यांनी या गंभीर समस्येची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाला धारेवर धरले होते. पाऊस थांबून उन्हाची चाहूल लागल्यामुळे आता घाट कोसळण्याचा धोका टळला आहे, त्यामुळे घटस्थापनेच्या मुहूर्तावर आंबा घाटातील अवजड वाहतूक तातडीने पूर्ववत सुरू करा, अन्यथा स्वतः मैदानात उतरून रस्ता खुला करावा लागेल, असा निर्वाणीचा इशारा आमदार सामंत यांनी भरसभेत दिला होता.

आमदारांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर प्रशासकीय यंत्रणा तातडीने कामाला लागली आणि घटस्थापनेच्या दिवशीच आंबा घाटातून अवजड वाहनांची वाहतूक औपचारिकरीत्या सुरू करण्यात आली. आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांचा “शब्द म्हणजे वचन” याचा नवा प्रत्यय या निमित्ताने रत्नागिरीकरांना आला असून, प्रदीर्घ काळानंतर मार्ग मोकळा झाल्याने व्यापारी वर्गासह संपूर्ण जिल्ह्यातील जनतेने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर वाहतूक सुरळीत झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमधून आमदार किरण सामंत यांचे आभार मानले जात आहेत.

Total Visitors :

5468411
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदल, २४ नेत्यांना नवीन जबाबदाऱ्या

Gramin Varta
2 Min Read

मुंबई – मडगांव आणि मुंबई – नागपूर दरम्यान ८ साप्ताहिक विशेष गाड्या

Gramin Varta
2 Min Read

पोलीस कोठडीतील छळ आणि मारहाणीमुळे मृत्यू झाल्यास नातेवाईकांना ५ लाखांची भरपाई

Gramin Varta
1 Min Read

विद्युत अपघातात जनावरे दगावल्यास आता ५० हजारांची मदत; महावितरणकडून नुकसानभरपाईच्या रक्कमेत घसघशीत वाढ

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

पुर्ये गावात अवघ्या दोनच दिवसात बंधारा वाहून गेला; निकृष्ट दर्जा आणि चुकीच्या नियोजनावर ग्रामस्थांचा तीव्र आक्षेप

2 Min Read
संगमेश्वर

संगमेश्वर : देवळे येथे गणेशोत्सवासाठी  गावी आलेल्या चाकरमान्यांची पाण्यासाठी वणवण

2 Min Read
संगमेश्वर

संगमेश्वर पोलीस ठाण्यात नवरात्रोत्सवानिमित्त कर्तव्यावर असणाऱ्या महिला पोलिसांचा गौरव

1 Min Read
संगमेश्वर

आरवलीच्या राजाला आज भावपूर्ण निरोप; ‘उत्कर्ष तरुण मित्र मंडळा’च्या वतीने महाप्रसाद आणि विसर्जन सोहळ्याची जय्यत तयारी

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?