ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’मधील सुबोध भावे यांच्या राजकीय व्यक्तिरेखेचा लूक चर्चेत
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’मधील सुबोध भावे यांच्या राजकीय व्यक्तिरेखेचा लूक चर्चेत
महाराष्ट्र

‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’मधील सुबोध भावे यांच्या राजकीय व्यक्तिरेखेचा लूक चर्चेत

Gramin Varta
Last updated: October 28, 2026 8:29 am
Gramin Varta
64 Views
Share

मुंबई: सत्तेच्या पडद्याआड शिजणारी कटकारस्थाने, राजकारण आणि गुन्हेगारी यांच्यातील अभद्र युती, व्यवस्थेला पोखरणाऱ्या प्रवृत्ती आणि त्यातून उलगडणाऱ्या धक्कादायक रहस्यांचा वेध घेणारा ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ हा आगामी मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

राजकीय आणि सामाजिक विश्वातील कथित वादग्रस्त घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गुंफलेल्या या वास्तवदर्शी थरारनाट्यात सत्तेचा गैरवापर, गुन्हेगारीचे जाळे आणि न्यायासाठीचा संघर्ष पाहायला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी सरसावलेली यंत्रणा आणि सत्तेच्या बळावर सत्य दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्ती यांच्यातील संघर्षाची झलक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आता अष्टपैलू अभिनेते सुबोध भावे यांनी या चित्रपटात साकारलेल्या महत्त्वपूर्ण राजकीय व्यक्तिरेखेचा करारी लूक रिव्हील करण्यात आला आहे. २० नोव्हेंबर २०२६ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

आनंदी पिक्चर्स अमरावती आणि सचिन रोडे पाटील प्रस्तुत ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या चित्रपटाची निर्मिती मातोश्री एन्टरटेन्मेंट वर्ल्डच्या बॅनरखाली देवेंद्र भट, सूर्यकांत भुंडे आणि प्रशांत कदमपुरे यांनी केली आहे. सामाजिक वास्तवाला रहस्य आणि थराराची जोड देत पडद्यावर प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनी केला आहे. सत्तेच्या सावलीत दडलेल्या गुन्हेगारी प्रवृत्ती आणि त्यांना आव्हान देणाऱ्या व्यवस्थेतील संघर्षाला संजय नवगिरे यांनी कथा, पटकथा आणि संवादांच्या माध्यमातून धार दिली असून, चित्रपटाची संकल्पना सागरकुमार एस. जैन यांची आहे. भोंदूबाबाचा पर्दाफाश करणारा हा चित्रपट घोषणेपासूनच विविध कारणांमुळे प्रकाशझोतात राहिला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या फर्स्ट लूकमध्ये सुबोध भावे यांचा रुबाबदार आणि करारी अवतार विशेष लक्ष वेधून घेत आहे. पांढराशुभ्र कुर्ता, त्यावर काळ्या रंगाचे बंद गळ्याचे जॅकेट आणि नजरेतील भेदक गांभीर्य यांमुळे सुबोध एका वजनदार, मुरब्बी आणि तत्त्वनिष्ठ राजकीय नेत्याच्या रूपात समोर आले आहेत. ‘मंत्री असो की आमदार असो… जो कोणी दोषी असेल, त्याला कायद्याच्या चौकटीत यायलाच लागेल. त्याची गय केली जाणार नाही…’ हा त्यांच्या तोंडी असलेला खणखणीत संवाद व्यवस्थेतील गैरप्रवृत्तींना दिलेला निर्वाणीचा इशाराच ठरतो. गुन्ह्याच्या तपासाचे फलक, घटनास्थळाभोवती लावलेल्या पोलिसांच्या पिवळ्या पट्ट्या, पत्रकारांच्या प्रश्नांचा भडिमार, कॅमेऱ्यांच्या प्रकाशझोतांसह विविध पात्रांच्या चेहऱ्यांवरील भीती आणि संशय यांमुळे फर्स्ट लुकमधील गूढ अधिकच गडद झाले आहे. सुबोध यांच्या व्यक्तिरेखेमागे नेमके कोणते राजकीय रहस्य दडले आहे, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

या चित्रपटात सुबोध भावे यांच्यासह दीपाली सय्यद, उदय टिकेकर आणि अक्षय टंकसाळे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. विविध व्यक्तिरेखांच्या माध्यमातून राजकारण, समाजकारण आणि गुन्हेगारी विश्वातील गुंतागुंतीचे पदर उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपटातील रहस्यमय वातावरण, राजकीय घडामोडी आणि नाट्यमय प्रसंगांना कॅमेऱ्यात प्रभावीपणे टिपण्याची जबाबदारी छायाचित्रकार आकाश काकडे यांनी सांभाळली आहे. कथानकातील प्रसंगांना वास्तवाचा स्पर्श देणारी आणि राजकीय तसेच गुन्हेगारी विश्वाचा बाज अधोरेखित करणारी कलात्मक मांडणी कलादिग्दर्शक अक्षय आंबेकर यांनी केली आहे. व्यक्तिरेखांचे स्वभावविशेष, सामाजिक स्थान आणि कथानकातील त्यांचे महत्त्व लक्षात घेऊन अपेक्षा गांधी सोनी यांनी वेशभूषेची जबाबदारी पार पाडली आहे. चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेतील विविध विभागांमध्ये समन्वय साधत नियोजनाची धुरा प्रॉडक्शन कंट्रोलर नेहा घोडके यांनी सांभाळली असून, प्रॉडक्शन हेड सचिन घनवट यांनी निर्मिती व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडली आहे. लाईन प्रोड्युसर यश सणस आहेत तर विजय म्हस्के यांनी प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून काम पाहिले आहे.

Total Visitors :

5469136
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

चिमुकल्या मोदकांवर अवतरले साक्षात अष्टविनायक; विलास राहटे यांचा सूक्ष्म कलाविष्कार गणेशभक्तांच्या पसंतीस

Gramin Varta
2 Min Read

खेड : शिव बुद्रुक-भोईवाडी परिसरात रेल्वेच्या धडकेत ४२ वर्षीय कामगाराचा मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

पाचलचे गायक शरद जाधव उर्फ ज्युनिअर आनंद शिंदे यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र कला भूषण’ पुरस्कार प्रदान

Gramin Varta
2 Min Read

चिपळूणच्या डॉ. यतीन जाधव व डॉ. वैशाली जाधव यांना प्रतिष्ठेचा ‘एबीपी माझा आरोग्यरत्न’ पुरस्कार प्रदान

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

शहरात वाढलेल्या एका Gen Z तरुणाच्या नजरेतून गाव, माणसं आणि ‘घर’ शोधणाऱ्या ‘मॅगझिन’चा टीझर प्रदर्शित

3 Min Read
महाराष्ट्र

सोन्याच्या दरातील घसरणीला ब्रेक; महिन्याच्या पहिल्याच दिवशी भावात वाढ

3 Min Read
महाराष्ट्र

युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये भांडारकर संस्थेच्या महाभारत हस्तलिखिताचा समावेश

2 Min Read
महाराष्ट्र

फडणवीसांना अंधारात ठेऊन प्लॅन आखला, एकनाथ शिंदेंचं करिअर उद्ध्वस्त करण्याचा डाव होता? – मनोज जरांगे

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?