ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: शहरात वाढलेल्या एका Gen Z तरुणाच्या नजरेतून गाव, माणसं आणि ‘घर’ शोधणाऱ्या ‘मॅगझिन’चा टीझर प्रदर्शित
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » शहरात वाढलेल्या एका Gen Z तरुणाच्या नजरेतून गाव, माणसं आणि ‘घर’ शोधणाऱ्या ‘मॅगझिन’चा टीझर प्रदर्शित
महाराष्ट्र

शहरात वाढलेल्या एका Gen Z तरुणाच्या नजरेतून गाव, माणसं आणि ‘घर’ शोधणाऱ्या ‘मॅगझिन’चा टीझर प्रदर्शित

Gramin Varta
Last updated: September 23, 2026 8:09 am
Gramin Varta
32 Views
Share

मुंबई: शहरात वाढलेला एक तरुण, आयुष्यात काहीतरी ‘ड्रामा’ घडावा या शोधात आपल्या पूर्वजांच्या गावाकडे निघतो आणि तिथे त्याला माणसं, नाती आणि स्वतःकडे नव्याने पाहण्याची संधी मिळते.

याच अनोख्या प्रवासाची झलक दाखवणाऱ्या शुभम संजय शेवडे लिखित-दिग्दर्शित आगामी मराठी चित्रपट ‘मॅगझिन’चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यातील काही खास दृश्यांनी आणि एका शब्दाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. टीझरच्या माध्यमातून ‘मॅगझिन’ शहरापासून महाराष्ट्राच्या मातीतल्या जगापर्यंत आणि तिथून ‘घर’ या संकल्पनेला नव्याने समजून घेण्याच्या प्रवासाची ओळख करून देतो. घर म्हणजे केवळ चार भिंतींची जागा, की आपल्या माणसांशी, आठवणींशी आणि मुळांशी जोडलेली भावना? या प्रश्नाभोवती फिरणारा तरुण नायकाचा प्रवास टीझरमधून हळूहळू उलगडत जातो.

टीझरमध्ये निसर्गाच्या सान्निध्यातील क्षण, तरुणाई, मैत्री, गावाकडचं जगणं आणि काही अनपेक्षित प्रसंगांची सांगड पाहायला मिळते. एका संवादातून समोर येणारा एक शब्द नायकाचं लक्ष वेधून घेतो आणि त्याच्या प्रवासाबद्दल उत्सुकता निर्माण करतो. मात्र या प्रवासात त्याला नेमकी कोणती माणसं भेटणार आहेत, गावाशी त्याचं नातं कसं बदलणार आहे आणि हा अनुभव त्याला स्वतःकडे नव्याने कसं पाहायला लावणार आहे, याची उत्तरं चित्रपटात मिळणार आहेत.

‘मॅगझिन’च्या टीझरचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नव्या पिढीतील कलाकारांसोबत अतुल परचुरे, शिवाजी साटम आणि किशोर कदम या अनुभवी कलाकारांची झलक. त्यांच्या व्यक्तिरेखा तरुण नायकाच्या आयुष्याशी नेमक्या कशा जोडल्या आहेत, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, दिवंगत अभिनेते अतुल परचुरे यांचा मोठ्या पडद्यावरील हा शेवटचा चित्रपट ठरणार असल्याने त्यांच्या चाहत्यांसाठी ‘मॅगझिन’ची ही बाजू विशेष भावनिक आहे. टीझरमधील भव्य दृश्यरचना आणि वातावरण पाहता, ‘मॅगझिन’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावरच अनुभवण्याचा सिनेमॅटिक अनुभव देण्याचं आश्वासन देतो. चित्रपटाचं विश्व महाराष्ट्राच्या संस्कृतीशीही जोडलेलं आहे. गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळीची झलक टीझरमध्ये दिसते. हे सण केवळ दृश्यात्मक भव्यतेपुरते मर्यादित न राहता कुटुंब, समाज आणि वेगवेगळ्या पिढ्यांना जोडणाऱ्या भावनेचा भाग बनतात. त्यामुळे या प्रसंगांचा नायकाच्या प्रवासाशी नेमका काय संबंध आहे, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

शुभम संजय शेवडे यांचा हा पहिला मराठी फीचर चित्रपट आहे. लॉस एंजेलिसमध्ये फिल्ममेकिंगचं शिक्षण घेतलेल्या शेवडे यांना महाराष्ट्रातील दत्तवाड येथील अनुभवातून ‘मॅगझिन’ची प्रेरणा मिळाली. समकालीन Gen Z दृष्टिकोन, मराठी संस्कृतीशी असलेली नाळ आणि गावाकडे पाहण्याचा उबदार दृष्टिकोन यांची सांगड चित्रपटातून घालण्यात आली आहे. Gen Z ची vibe, ‘घर’, नाती, नव्या-जुन्या पिढीची सांगड आणि मोठ्या पडद्यावर अनुभवता येणारा वेगळा मराठी सिनेमा ‘मॅगझिन’ २३ ऑक्टोबर २०२६ रोजी चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.

दिग्दर्शक शुभम संजय शेवडे म्हणाले, “‘मॅगझिन’मधून आम्हाला आजच्या तरुणाईकडे त्यांच्या नजरेतून पाहायचं होतं. पण त्याच वेळी त्यांच्या आयुष्यात असलेली माणसं, नाती आणि मुळं यांच्याशी असलेला संवादही मांडायचा होता. नव्या आणि जुन्या पिढीतील कलाकारांना एकत्र घेऊन हा प्रवास पडद्यावर आणता आला, ही आमच्यासाठी खूप खास गोष्ट आहे.”

Total Visitors :

5427497
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

Traversing the Wonders of Earth’s Diverse and Complex Ecosystems

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

किल्ले रायगड रोपवे सेवा तात्पुरती ठप्प; प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त

Gramin Varta
2 Min Read

10 Tech Innovations Set to Reshape the World As We Know It

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

नेपाळच्या पूरग्रस्तांसाठी अमेरिकेची ३१ दशलक्ष डॉलरची मदत जाहीर ; पूल, निवारा आणि ड्रोनसाठी निधी

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

महिला शेतकऱ्यांना अधिकृत सन्मान; राज्यभरात प्रमाणपत्र नोंदणी व वितरणाची धडक मोहीम सुरू, १७ ऑक्टोबरपर्यंत संधी

2 Min Read
महाराष्ट्र

सरकारी रुग्णालयांतील औषधांची होणार गुणवत्ता तपासणी; बनावट औषध रोखण्यासाठी आठ परिमंडळांना अत्याधुनिक तपासणी उपकरणे

2 Min Read
महाराष्ट्र

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘द वन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

1 Min Read
महाराष्ट्र

मुंबई पोलिसांनी मनोज जरांगेंचा दुसरा अर्जही फेटाळला

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?