ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: आरोग्य शिबिरांसह वृक्षारोपणाने उद्यापासून रत्नागिरीत ‘सेवा संकल्प अभियाना’ला सुरुवात
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » आरोग्य शिबिरांसह वृक्षारोपणाने उद्यापासून रत्नागिरीत ‘सेवा संकल्प अभियाना’ला सुरुवात
रत्नागिरी

आरोग्य शिबिरांसह वृक्षारोपणाने उद्यापासून रत्नागिरीत ‘सेवा संकल्प अभियाना’ला सुरुवात

Gramin Varta
Last updated: September 16, 2026 3:35 pm
Gramin Varta
18 Views
Share

१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर महिनाभर विविध लोककल्याणकारी उपक्रम; प्रत्येक ग्रामपंचायतीत २०० रोपांची लागवड

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घटनात्मक पदावरील सेवेची २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तसेच ‘सेवा परमो धर्मः’ हा विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यभरात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या अभियानाचा शुभारंभ गुरुवारी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये २०० रोपांची लागवड आणि आरोग्य शिबिरांच्या आयोजनातून होणार आहे. अभियानांतर्गत महिनाभर विविध लोककल्याणकारी आणि जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार असून, सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करून अभियान यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ‘सेवा संकल्प अभियाना’च्या नियोजनाबाबत आयोजित विशेष आढावा बैठकीत जिल्हाधिकारी जिंदल यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील, प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रविण बिरादार यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

अभियानाचा मुख्य उद्देश सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुकर करणे आणि त्यांना विविध शासकीय सेवांचा थेट लाभ मिळवून देणे हा असल्याचे जिल्हाधिकारी जिंदल यांनी सांगितले. शासनाच्या योजनांची माहिती आणि त्यांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ‘सेवा सेतू’ उपक्रमांतर्गत तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर विशेष शिबिरे आयोजित करून प्रलंबित दाखले व विविध शासकीय सेवा नागरिकांना तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अभियानाच्या कालावधीत नगरपरिषदा आणि पंचायत समित्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे, नदीघाट तसेच ऐतिहासिक बारवांच्या स्वच्छतेसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत तरुण, नवउद्योजक आणि ग्रामीण भागातील कल्पक संशोधकांना एकत्र आणण्यासाठी ‘इनोव्हेशन चॅलेंज’ आयोजित केले जाणार आहे. शिक्षण विभागाकडून शासकीय आणि खासगी शाळांमध्ये ‘विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून महिलांसाठी आरोग्य व पोषणविषयक शिबिरे, तर लहान मुलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि ग्रामपंचायतींमध्ये कलापथक तसेच पथनाट्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन ‘आशीर्वादाचा दीप’ प्रज्वलित करण्याबरोबरच जनजागृतीसाठी ‘मानवी रांगोळी’चे आयोजनही करण्यात येणार आहे.

गुरुवारपासून सुरू होणाऱ्या या महिनाभराच्या अभियानाच्या माध्यमातून शासकीय सेवा, आरोग्य, पर्यावरण, शिक्षण, स्वच्छता, रोजगार आणि जनजागृती अशा विविध क्षेत्रांतील उपक्रमांना चालना देण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. समाजातील प्रत्येक घटकाने या अभियानात सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करावे आणि समन्वयातून रत्नागिरी जिल्ह्याचा ठसा उमटवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

सावर्डे : माहेरून पैसे आणण्यास नकार देताच पत्नीला दांडक्याने मारहाण करून पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी

Gramin Varta
1 Min Read

काळाचौकी महागणपती मंडपाजवळ विजेचा झटका लागून दोघांचा मृत्यू, चौघे जखमी

Gramin Varta
2 Min Read

सेवा संकल्प अभियानाचा शुभारंभ; कोकणनगर आरोग्य केंद्रात आरोग्य शिबिरासह वृक्षारोपण

Gramin Varta
2 Min Read

Latest Trends and Insights in Shaping Industries for the Future

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

भाट्ये समुद्रकिनारी स्वच्छता अभियानात मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचा उत्स्फूर्त सहभाग

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी: बाथरूममध्ये पाय घसरून पडलेल्या नाचणे येथील ८० वर्षीय वृद्धाचा उपचारापूर्वी मृत्यू

1 Min Read
रत्नागिरी

दीड दिवसांच्या बाप्पांना आज निरोप

1 Min Read
रत्नागिरी

आधीच्या कर्जातून मुक्ती; नव्या कर्जासाठी मात्र अडसर

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?