ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: राजापूर: नाणार खाडी दुर्घटनेने भाटकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर; तीन चिमुरड्यांचा दफनविधी, चौथ्या मुलीचा शोध सुरूच
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » राजापूर: नाणार खाडी दुर्घटनेने भाटकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर; तीन चिमुरड्यांचा दफनविधी, चौथ्या मुलीचा शोध सुरूच
राजापूर

राजापूर: नाणार खाडी दुर्घटनेने भाटकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर; तीन चिमुरड्यांचा दफनविधी, चौथ्या मुलीचा शोध सुरूच

Gramin Varta
Last updated: October 12, 2026 5:33 pm
Gramin Varta
1k Views
Share

राजापूर : नाणार इंगळवाडी येथील खाडीपात्रात बुडून मृत्युमुखी पडलेल्या भाटकर कुटुंबातील तीन बालकांचा सोमवारी सकाळी शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आला. रविवारी रात्री उशिरा शोधमोहिमेदरम्यान या तिघांचे मृतदेह हाती लागले होते. दरम्यान, या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या माहिरा जुनेद भाटकर (वय १५) या मुलीचा शोध अद्याप लागलेला नसून, पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांकडून तिचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे नाणार इंगळवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

रविवारी दुपारी नाणार इंगळवाडी येथील खाडीपात्रात कालवे काढण्यासाठी गेलेल्या जुनेद भाटकर यांच्या कुटुंबातील पाच मुले खोल पाण्यात बुडाली होती. खाडीतील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली. यावेळी एका मुलीला वाचवण्यात यश आले; मात्र अन्य चार बालकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर सुरू करण्यात आलेल्या शोधमोहिमेत रविवारी रात्री उशिरा मोहम्मद जुनेद भाटकर (वय ६), जुहेरिया जुनेद भाटकर (वय ९) आणि बुशिरा जुनेद भाटकर (वय ११) या तीन बालकांचे मृतदेह आढळून आले.

सोमवारी सकाळी नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत तिन्ही बालकांचा दफनविधी पार पडला. लहानग्यांच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, अंत्यविधीच्या वेळी उपस्थितांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत. एकाच कुटुंबातील तीन चिमुरड्यांना अशा प्रकारे निरोप द्यावा लागल्याने संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत आहे.

दरम्यान, दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या माहिरा जुनेद भाटकर हिचा शोध सोमवारी सकाळपासून पुन्हा सुरू करण्यात आला. नाटे सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक, स्थानिक ग्रामस्थ आणि मच्छीमार खाडीपात्रात शोधमोहीम राबवत आहेत. पाण्याचा प्रवाह आणि खाडीची खोली यांमुळे शोधकार्यात अडचणी येत असल्या, तरी बेपत्ता मुलीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

आपल्या डोळ्यांसमोर मुलांना खाडीत बुडताना पाहण्याची वेळ आल्याने जुनेद भाटकर आणि त्यांची पत्नी हिना भाटकर यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. तीन बालकांच्या मृत्यूने आणि चौथ्या मुलीच्या बेपत्ता असण्याने भाटकर कुटुंबावर दुःखाचा असह्य प्रसंग ओढवला आहे. या हृदयद्रावक दुर्घटनेने नाणार इंगळवाडी परिसरातील वातावरण सुन्न झाले असून, बेपत्ता मुलीचा शोध लागण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Total Visitors :

5468469
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

राजापूर–चुनाकोळवण–दसूरकोंड–साटवली बसफेरी पुन्हा पूर्ववत सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची पायपीट थांबली

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी जिल्ह्यातील ५० धरणांची सुरक्षितता ऐरणीवर; पारदर्शकतेसाठी स्वतंत्र संस्थेकडून होणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’

Gramin Varta
1 Min Read

मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात रत्नागिरीचे प्रथमेश गवाणकर उच्च न्यायालयात; कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल

Gramin Varta
1 Min Read

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी दीड लाख राजपत्रित अधिकारी सरसावले; एक दिवसाचे वेतन देणार ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ला

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

राजापूर

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीत राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका मोलाची: डॉ. विकास पाटील

2 Min Read
राजापूर

राजापुरात एटीएस आणि आयबीची संयुक्त धडक कारवाई; एकाच घरातील पती-पत्नीसह मुलीची कसून चौकशी

2 Min Read
राजापूर

राजापूरमध्ये बेकायदा दारू विक्रीवर कारवाई; दोघांविरोधात गुन्हा

1 Min Read
राजापूर

राजापूर तालुक्यात गोवा बनावटीच्या दारूविक्रीविरोधात भाजप आक्रमक; उत्पादन शुल्क अधिकाऱ्याच्या कथित गैरवर्तनामुळे लांजात ठिय्या आंदोलन

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?